महापालिका, नगरपरिषद, नगरपंचायतीत तुकडेबंदी नाही; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

औरंगाबाद: महत्वाचा निर्णय* महानगरपालिका, नगरपरिषदा आणि नगरपंचायत यांच्या हद्दीत तुकडेबंदी कायदा लागू होणार नाही. असा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. हा निर्णय महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यस्तरीय सेवा पंधरवडा अभियानावेळी जाहीर केला. काय सांगितलं महसूलमंत्र्यांनी तुकडेबंदी कायद्यातील तरतुदींविरोधात पडलेल्या तुकड्यांचे नियमितीकरण सुलभ केले जाणार. कार्यपद्धती पुढील १५ दिवसांत जाहीर होईल. या निर्णयामुळे राज्यातील ५० लाख […]

अधिक वाचा..

राष्ट्रवादीच्या मुंबई महानगरपालिका निवडणूक व्यवस्थापन समितीची तिसरी बैठक पार

नवाब मलिकांनी घेतला संघटनेचा आढावा.. मुंबई: मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई महानगरपालिका निवडणूक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष माजी मंत्री नवाब मलिक यांच्या अध्यक्षतेखाली आज उत्तर मुंबईची मालाड येथे बैठक पार पडली. मुंबई महानगरपालिका निवडणूकीची संपूर्ण जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांच्यावर सोपवल्यावर आज तिसरी […]

अधिक वाचा..

राष्ट्रवादीच्या नवाब मलिकांनी मुंबई मनपासाठी कंबर कसली; पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी बैठकांचा धडाका सुरू…

मुंबई: मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसच्या मनपा निवडणूक व्यवस्थापन समितीची दुसरी बैठक आज समितीचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांच्या नेतृत्वाखाली मुंबई प्रदेश कार्यालयात पार पडली. मुंबई महानगरपालिका निवडणूक व्यवस्थापन समितीचे अध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसने दिल्यानंतर नवाब मलिक यांनी पक्षासाठी कंबर कसली आहे. पहिली बैठक व्यवस्थापन समितीची घेतल्यानंतर आज विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसचे सेवादल, महिला, […]

अधिक वाचा..

ढगफुटीसदृश्य पाऊस! महानगरपालिकेतील आपत्कालीन कक्षास भेट देऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आढावा

मुंबई: मुंबईत मागील ६ तासांत २०० मिलामीटर आणि २४ तासांत ३५० मिलीमीटर पाऊस झाला आहे. ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्याने सखल भागात पाणी साचले असून पाण्याचा निचरा करण्यासाठी पालिकेचे ५२५ पंप कार्यान्वित आहेत. पाण्याचा निचरा करण्यासाठी पंप वाढवण्याचे निर्देश देण्यात आल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री व मुंबईचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी मंगळवारी मुंबई महापालिकेतील आपत्कालीन […]

अधिक वाचा..

मुंबई महानगरपालिका ‘एल’ विभागातील नागरी समस्यांवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा जोरदार मोर्चा

मुंबई: आज उत्तर मध्य मुंबई जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने, मुंबई महानगरपालिकेच्या एल विभागातील नागरिकांच्या दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या मूलभूत नागरी समस्या सोडवाव्यात, या मागणीसाठी भव्य व शिस्तबद्ध मोर्चा काढण्यात आला.या विभागात सुमारे ९ ते ११ लाख नागरिक राहतात, परंतु आजही त्यांच्या जीवनात गटारसफाई, पाणीपुरवठा, आरोग्य सेवा, स्वच्छता, शिक्षण व सुरक्षित रस्ते या मुलभूत […]

अधिक वाचा..

छ. संभाजीनगरात दोन दिवसांत १३६४ अतिक्रमणांवर महापालिकेचा बुलडोझर

संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर महापालिकेने शहरातील रस्ते रुंदीकरणासाठी युद्धपातळीवर मोहीम सुरू केली असून, फक्त दोन दिवसांत तब्बल 1३६४अतिक्रमणे हटवण्यात आली आहेत. मुकुंदवाडी ते केम्ब्रिज – २०० फूट रस्त्यासाठी मोठी कारवाई महापालिकेने मुकुंदवाडी ते केम्ब्रिज चौक दरम्यानचा रस्ता ६० मीटर (२०० फूट) रुंद करण्याच्या निर्णयानंतर दोन दिवसांत म्हणजेच शनिवार आणि रविवार (२२-२३ जून) या कालावधीत तब्बल ११३५ […]

अधिक वाचा..

पुणे महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी निधी देणार; उदय सामंत

मुंबई: पुणे महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून या परिसरातील नागरिकांना पाणीपुरवठा करण्यात येईल, असे मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत सांगितले. पुणे महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट केलेल्या गावांना पाणीपुरवठा करण्याबाबतचा प्रश्न सदस्य रवींद्र धंगेकर यांनी उपस्थित केला होता. मंत्री सामंत म्हणाले की, नांदेड किरकीटवाडी व नांदोशी या गावांना 3 हजार […]

अधिक वाचा..