छ. संभाजीनगरात दोन दिवसांत १३६४ अतिक्रमणांवर महापालिकेचा बुलडोझर

महाराष्ट्र

संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर महापालिकेने शहरातील रस्ते रुंदीकरणासाठी युद्धपातळीवर मोहीम सुरू केली असून, फक्त दोन दिवसांत तब्बल 1३६४अतिक्रमणे हटवण्यात आली आहेत.

मुकुंदवाडी ते केम्ब्रिज – २०० फूट रस्त्यासाठी मोठी कारवाई

महापालिकेने मुकुंदवाडी ते केम्ब्रिज चौक दरम्यानचा रस्ता ६० मीटर (२०० फूट) रुंद करण्याच्या निर्णयानंतर दोन दिवसांत म्हणजेच शनिवार आणि रविवार (२२-२३ जून) या कालावधीत तब्बल ११३५ अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली.

त्याआधी २० जून रोजी २२९ अतिक्रमणांवर कारवाई करून रस्त्याच्या कामास प्रारंभ करण्यात आला होता.

शहर विकास आराखड्यानुसार नियोजन

महावीर चौक ते सेव्हन हिल – ४५ मीटर

सेव्हन हिल ते केम्ब्रिज चौक – ६० मीटर

आजची कारवाई – पैठण रोडवर जोर

महापालिकेने आज सोमवार, २४ जून रोजी सकाळी ९:०० वाजता महानुभाव आश्रम ते नक्षत्रवाडी या रस्त्यावर ६० मीटर रुंदीकरणासाठी मोठी कारवाई सुरू केली आहे.

बहुतांश नागरिकांनी स्वतःहून आपली मालमत्ता आणि साहित्य बाजूला केले असून, कारवाई शांततेत पार पडत आहे.

पथक आणि कर्मचारी तत्पर

जे पथक मुकुंदवाडी परिसरात कार्यरत होते, तेच पथक आजही पैठण रोडवर तैनात आहे.

पोलिस बंदोबस्तही ठोस असून, मनपाचे कर्मचारी नियोजनबद्धपणे कारवाई करत आहेत.