लसणाचे औषधी गुणधर्म

आरोग्य

लसणाच्या पाकळ्यात अँटिऑक्सिडंट असतात, जे शरीरातून विषारी पदार्थ काढून टाकतात. सूक्ष्मजंतू नष्ट करणारे प्रतिजैविक गुणधर्म आणि विषारी द्रव्ये बाहेर काढणारे अँटीसेप्टिक गुणधर्म असतात.

रक्तदाब: लसूण रक्तदाब कमी करण्यासाठी खूप फायदेशीर आहे. कारण ते नायट्रोजन ऑक्साईड आणि H2S या दोन्ही वासोडिलेटिंग एजंट्सच्या उत्पादनास उत्तेजन देते.

पचनक्रिया सुधारते: लसणाची १ पाकळी रोज खाल्ल्याने गॅस्ट्रिक ज्यूसचे पीएच सुधारते आणि पचनक्रिया व्यवस्थित राहण्यास मदत होते. जुन्या लसणाचा अर्क गॅस्ट्रिक म्यूकोसल अस्तर बरे करण्यास मदत करतो.

कोलेस्ट्रॉल कमी करते: एलडीएल कोलेस्टेरॉलचे ऑक्सिडेशन आणि रक्तवाहिन्या मधील प्लेक रोखून रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यास मदत करू शकते.

किडनी: एलिसिन हे लसणात आढळणारे संयुग आहे. हे किडनीचे संथ कार्य, रक्तदाब, ऑक्सिडेटिव्ह तणाव दूर करण्यास मदत करते. यात अँटीहायपरटेन्सिव्ह, अँटीऑक्सिडंट, नेफ्रोप्रोटेक्टिव्ह प्रभाव आहेत.

नैसर्गिक अँटिबायोटिक: संक्रामणाद्वारे होणाऱ्या रोगांशी लढण्यासाठी लसणाचा वापर खूप काळापासून होत आहे. लसूण नियमितपणे खाल्ल्याने सर्दी, फ्लू, पोटाचे इन्फेक्शन, श्वसन इन्फेक्शन आणि यूटीआय टाळण्यास मदत होते.

प्रतिकारशक्ती वाढवते: लसूण जळजळ कमी करण्यास आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत करते.

पचनक्रिया सुधारते: रोज सकाळी रिकाम्या पोटी लसणाची एक पाकळी खाल्ली तर शरीरातील पचनक्रिया सुधारते, कोलेस्टेरॉलची पातळी कमी होते. तसेच उच्च रक्तदाब आणि मधुमेह टाळता येतो.

(सोशल मीडियावरून साभार)

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत