शिक्रापुरात मद्यधुंद टेम्पो चालकाच्या धडकेत व्यक्तीचा मृत्यू

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील बजरंगवाडी येथे हॉटेल तोरणा समोरुन रस्ता ओलांडणाऱ्या मन्सूर निजाम सय्यद या इसमाला मद्यधुंद अवस्थेत आलेल्या टेम्पो चालकाच्या टेम्पोची धडक बसून त्याचा जागीच मृत्यू झाला असून शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे गंगाधर लक्ष्मण जाधव या टेम्पो चालकावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पुणे नगर महामार्गालगत बजरंगवाडी […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातून एका व्यक्तीची चैन हिसकावणारे अखेर जेरबंद

शिक्रापूर (शेरखान शेख): जातेगाव बुद्रुक (ता. शिरुर) येथील व्यंकटेशकृपा शुगर मिल्स या साखर कारखान्याकडे जनावरांसाठी चारा आणण्यासाठी गेलेल्या व्यक्तीच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसकावणाऱ्या दोघांना शिक्रापूर पोलिसांनी जेरबंद केले असताना शिवाजी बाळू शेंडकर व सचिन काळूराम दौंडकर असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे असून त्यांचे दोन साथीदार फरार झाले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. जातेगाव बुद्रुक […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: तुमच्यासाठी आजचा दिवस महत्त्वाचा असेल. कापड व्यवसायात आज चांगला फायदा होईल. भविष्याचा विचार करून तुम्ही गुंतवणूक करू शकता. सासरच्यांशी चांगली चर्चा होईल. नोकरीत यश मिळेल. कोणत्याही जबाबदारीच्या कामात निष्काळजीपणा करू नका. वृषभ: घरातील जबाबदाऱ्या पार पाडण्याच्या दिशेने तुम्ही काही नवीन निर्णय घेऊ शकता. व्यवसाय, नोकरी चांगली राहील. वडिलांच्या कार्यात तुमचे सहकार्य वाखाणण्याजोगे असेल. कामात […]

अधिक वाचा..

आदिवासींना वनवासी बोलणे हा आदिवासींचा अपमान आहे; शरद पवार

मुंबई: आज या देशात आणि राज्यात आदिवासींची संख्या मोठी आहे. त्यांना अजूनही ख-या अर्थाने जीवन जगण्याची अपेक्षा आहे. ती स्थिती अद्यापही पूर्णत्वाला गेली असा निष्कर्ष काढता येत नाही. काही लोक त्यांना वनवासी म्हणतात. वनवासी म्हणणं एकप्रकारे आदिवासींचा अपमान आहे असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. ते आदिवासीच आहेत. जल, जंगल आणि जमीन इथे ते खरे […]

अधिक वाचा..

जनाची नि मनाची दोन्हीची लाज ठेवा, शिवनीती आचरणात कधी आणणार?

मुंबई: भीक नको कुत्रं आवर, नंगे से खुदा भी डरता है! अशा म्हणी वारंवार प्रकर्षाने केवळ महिलाच नाही तर पुरुषांच्या मनातही येत असतील. महिला दिनाच्या पार्श्‍वभूमीवर अनेक सोहळे झाले, विधानसभेत महिला आमदाराच्या लक्षवेधी आल्या. अनेक मंत्री,सत्ताधारी व विरोधी पक्षी आमदार अनुपस्थित असलेले दिसले. चौथे महिला धोरण येण्याचा मार्ग सुकर झाला, पण आपण अजुनही धर्मिय आवरणात […]

अधिक वाचा..

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; संभाजीनगरचे 6 जणांचा जागीच मृत्यू तर 6 जण गंभीर जखमी..

औरंगाबाद: समृद्धी महामार्गावर मोठा अपघात झाला आहे. मेहकर-सिंदखेडराजा दरम्यान (जि. बुलढाणा) लोणार तालुक्यातील शिवणी पिसा नजीक इर्टिगा गाडीला भीषण अपघात झाला आहे. या अपघातात सहाजण जागीच ठार झाले. तर सहाजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात दाखल केले असून, त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. जखमी तसेच मृत हे छत्रपती संभाजीनगरमधील एन-11 मधील रहिवाशी असल्याची माहिती मिळाली […]

अधिक वाचा..

चिंता वाढली! छत्रपती संभाजीनगरात H3N2 विषाणूचा शिरकाव…

औरंगाबाद: देशात H3N2 मुळे दोन रुग्णांचा मृत्यू झाला असून छत्रपती संभाजीनगर शहरात देखील H3N2 विषाणूचा शिरकाव झाला आहे. तर ताप, सर्दी, खोकल्याचे रुग्ण घराघरांत आढळून येत आहेत. त्यामुळे नागरिकांनी मास्क वापरावा, नेहमी हात धुवावेत, गर्दी टाळावी असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. H3N2 विषाणूचे लक्षणे H3N2 हा एक गैरमानवी इन्फ्लूएंझा विषाणू आहे. हा विषाणू सामान्यतः […]

अधिक वाचा..

शिक्रापूरात एटीएम मधून ज्येष्ठाची फसवणूक

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथे ज्येष्ठ व्यक्तीला एटीएम मधून पैसे काढून देण्याच्या बहाण्याने एटीएमची आदलाबदल करुन काही पैसे कधुअन घेऊन फसवणूक केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात व्यक्तीवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील जनसेवा बँकेच्या एटीएम मधून पैसे काढण्यासाठी बाळासाहेब थोरात आलेले असताना त्यांच्या मागे असलेल्या […]

अधिक वाचा..

शिक्रापुरात सोन्याच्या बिस्किटाच्या बहाण्याने आजीची फसवणूक

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पाबळ चौकात एका सत्तर वर्षीय आजीला सोन्याचे बिस्कीट देतो म्हणून आजीचे मंगळसूत्र लंपास करत आजीची फसवणूक केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे दोन अज्ञात व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पाबळ चौकात लक्ष्मी गायकवाड या सत्तर वर्षीय आजी उभ्या असताना दोन इसम […]

अधिक वाचा..

वढू बुद्रुकच्या शिक्षकाचा कारेगावमध्ये अपघाती मृत्यू

सत्तावीस वर्षे शिक्षण देणाऱ्या शिक्षकाच्या मृत्यूने गाव हळहळले शिक्रापूर (शेरखान शेख): शिरुर तालुक्यातील एका शाळकरी विद्यार्थ्याचा वाहनाला धडकून मृत्यू झाल्याची घटना काल घडलेली असताना सकाळच्या सुमारास वढू बुद्रुक येथील शरदचंद्रजी पवार माध्यमिक विद्यालयाच्या शिक्षकाचा पुणेनगर महामार्गावर कारेगाव नजीक अपघाती मृत्यू झाला असून संजय सिताराम कदम असे मयत झालेल्या शिक्षकाचे नाव असून गावात 27 वर्षे ज्ञानदानाचे […]

अधिक वाचा..