शिक्रापुरात सोन्याच्या बिस्किटाच्या बहाण्याने आजीची फसवणूक

क्राईम शिरूर तालुका

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पाबळ चौकात एका सत्तर वर्षीय आजीला सोन्याचे बिस्कीट देतो म्हणून आजीचे मंगळसूत्र लंपास करत आजीची फसवणूक केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे दोन अज्ञात व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पाबळ चौकात लक्ष्मी गायकवाड या सत्तर वर्षीय आजी उभ्या असताना दोन इसम त्यांच्या जवळ आले. त्यांनी आजीला आमच्याकडे सहा तोळे वजनाचे काही सोन्याचे बिस्कीट आहे तुम्हाला पाहिजे असेल तर आम्हाला 1 लाख रुपये द्या आणि 1 घ्या नाहीतर तुमच्या गळ्यातील मंगळसूत्र द्या, असे म्हणून आजीच्या गळ्यातील 2 तोळे वजनाचे मंगळसूत्र घेत आजीला 1 सोन्याचे बनावट बिस्कीट दिले आणि दोघेजण निघून गेले.

मात्र त्यावेळी सदर बिस्कीट वजनाला जास्त वाटू लागल्याने आपल्याला सोन्याचे बिस्कीट म्हणून आपली फसवणूक केल्याचे लक्षात आल्याने याबाबत लक्ष्मी रघुनाथ गायकवाड (वय ७१) रा. खरपुडी ता. खेड जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी दोन अज्ञात व्यक्तीवर गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार श्रावण गुपचे हे करत आहे.