MEPL च्या विरोधात खासदार डॉ अमोल कोल्हे यांच्याप्रमाणे विधानसभेत आवाज उठवणार; अ‍ॅड अशोक पवार

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती येथील औद्योगिक वसाहती मधील महाराष्ट्र एन्व्हायरो पावर लिमिटेड (MEPL) या कंपनी विरोधात निमगाव भोगी ग्रामस्थांनी सुरु केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभुमीवर लोकसभेमध्ये संसदरत्न खासदार अमोल कोल्हे यांनी ज्या पद्धतीने आवाज उठवला. तसाच आवाज विधानसभेतही उठवणार असल्याचे प्रतिपादन आमदार अ‍ॅड अशोक पवार यांनी केले. निमगाव भोगी व परिसरात MEPL कंपनीच्या दुषित पाण्यामुळे […]

अधिक वाचा..

शिरुरच्या सामाजिक कार्यकर्त्या राणी कर्डिले यांच्या वाढदिवसानिमित्त माहेरच्या करुणालय शाखेत अन्नदान

शिरुर (किरण पिंगळे-शेलार) शिरुर तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये गेल्या काही वर्षापासुन महिला सक्षमीकरणासाठी काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या तसेच रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या संस्थापक-अध्यक्षा राणी कर्डिले यांनी स्वतःच्या वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च टाळत आगळावेगळा उपक्रम राबवत माहेर संस्थेच्या सणसवाडी येथील माहेर संस्था संचालित करुनालय शाखेतील निराधार ,आजारी आणि वयोवृद्ध लोकांना जेवण देत अन्नदान केले. राणी कर्डीले […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात अल्पवयीन मुली पळुन जाण्याच्या प्रमाणात वाढ; पालकांची चिंता वाढली….

शिंदोडी (तेजस फडके) शिरुर तालुक्यात दिवसेंदिवस अल्पवयीन मुली पळुन जाण्याच्या प्रमाणात मोठया प्रमाणात वाढ झाली असुन मुलींच्या पालकांना यामुळे मोठी डोकेदुःखी वाढली आहे. शाळेत तसेच कॉलेजमध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन मुली पळुन जाण्याचे प्रमाण सध्या शिरुर तालुक्यात वाढले आहे. त्यामुळे पालकांची चिंता वाढली असल्याचे चित्र सगळीकडे दिसत आहे.   शिरुर तालुक्यातील शिरुर, रांजणगाव, शिक्रापुर या पोलिस स्टेशनला […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील महसुल विभाग आपल्याच कामात गुंग अन वाळु माफिया मात्र वाळु चोरण्यात दंग

शिंदोडी (तेजस फडके) शिरुर आणि श्रीगोंदा तालुक्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेल्या चिंचणी येथील घोड धरणातुन दि १५ ऑगस्ट २०२४ रोजी रात्री १० ते १७ ऑगस्ट २०२४ रोजी पहाटे ५ च्या दरम्यान चिंचणी येथील घोड जलाशयाच्या कडेचा गायरान गट क्रं ७५ तसेच गुनाट (कोळपेवस्ती) येथील चिंचणी जलाशयाचे कडेचा जमिन गट क्रं १६३ मधुन घोड धरणातील पाण्यातुन […]

अधिक वाचा..

पुणे ग्रामीणच्या पोलीस अधिक्षकपदी पुन्हा पंकज देशमुख कॅटच्या पुढील आदेशापर्यंत कायम राहणार

पुणे (प्रतिनिधी) पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक पंकज देशमुख यांची बृहन्मुंबई येथे उपायुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागेवर संदीपसिंग गिल यांची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर या बदलीच्या विरोधात पंकज देशमुख यांनी कॅट अर्थात सेंट्रल ॲडमिनीस्ट्रेट ट्रिब्युनलकडे दाद मागितली आहे. या प्रकरणी कॅटमध्ये आज (दि. ६) सुनावणी पार पडली. सुनावणी झाल्यानंतर कॅटने पुढील सुनावणी होईपर्यंत […]

अधिक वाचा..

शिरुर; वाळुंज यांच्या तक्रारी व आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरु…

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर-पाबळ भीमाशंकर रस्ता राज्यमार्ग १०३ यावरील कोंढाण-ओढा पुलावरील झालेली निकृष्ट कामे आणि आमदाबाद ते मलठण पर्यंत झालेले डांबरी रस्त्याचे निकृष्ट कामाबाबत सामाजिक कार्यकर्ते निलेश यशवंत वाळुंज यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली होती. याचीच दखल घेत, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग ,पुणे मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांनी सदर तक्रार अनुषंगाने […]

अधिक वाचा..

शिरुर शहरात गणेशोत्सव व पैगंबर जयंती हे दोन्ही उत्सव डीजे मुक्त करण्यासाठी लवकरच बैठक; प्रशांत ढोले

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर शहरात कायदा आणि सुव्यवस्था टिकवण्यासाठी गणेश उत्सव व पैगंबर जयंती मिरवणुक डीजे मुक्त करायचे असतील तर गणेश मंडळाचे पदाधिकारी तसेच नागरिकांनी पुढाकार घेऊन डीजे मुक्त गणेश उत्सव साजरा करुया. परंतु डीजे वाजला तर डीजे जप्त करुन कडक कार्यवाही केली जाईल असा इशारा शिरुरचे उपविभागीय अधिकारी प्रशांत ढोले यांनी दिला असुन हे […]

अधिक वाचा..

शिक्षकदिनाच्या दिवशी विद्यार्थ्यांची शिक्षिकेला अनोखी भेट, शिक्षिकेला भेट म्हणुन दिली चक्क सोन्याची अंगठी

शिरुर (अरुणकुमार मोटे) कवठे येमाई (ता.शिरुर) येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिका आशा गणेश पवार (शिंदे) यांना शिक्षकदिनी विद्यार्थ्यांनी चक्क सोन्याची आणि मानचिन्ह देवून सन्मानित केले आहे. पुर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (२०२३/२४) मध्ये या शिक्षिकेच्या इयत्ता पाचवीच्या वर्गातील राज्य गुणवत्ता यादीत दोन व जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीमध्ये सात असे एकूण ९ विद्यार्थ्यांनी यश संपादन केले होते.   […]

अधिक वाचा..

शिरुर पोलिसांनी अल्पवयीन मुलीला छेडछाड करणारा आरोपी केला २४ तासाच्या आत गजाआड

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर तालुक्यातील कवठे येमाई येथील एका अल्पवयीन मुलीला शाळेत जात असताना छेडछाड करणारा आरोपी शिरुर पोलिसांनी गजाआड केला आहे. त्याचे पुर्ण नाव व पत्ता माहीत नसतानाही पोलिसांनी जलदरीत्या तपास करून त्याला पारनेर तालुक्यातून गजाआड केले आहे. वैभव राजेंद्र शेळके (वय २१) असे त्याचे नाव असुन तो वाडेगव्हाण ता. पारनेर, जि. अहमदनगर येथील […]

अधिक वाचा..

शिरुर तालुका कुस्ती स्पर्धेत मांडवगण फराटा येथील श्री वाघेश्वर विद्याधाम शाळेचे निर्विवाद वर्चस्व

न्हावरे (तेजस फडके) महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद पुणे यांच्या विद्यमाने महर्षी शिंदे विद्यालय आंबळे आयोजित कुस्ती स्पर्धेमध्ये श्री वाघेश्वर विद्याधाम प्रशालेच्या मल्लांनी निर्विवाद घवघवीत यश मिळवले असुन तब्बल सहा मल्लांची शालेय जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली असुन तीन मल्लांनी द्वितीय क्रमांक तर चार मल्लांनी तृतीय क्रमांक मिळवला आहे. […]

अधिक वाचा..