Shirur Police Station

शिरूर पोलिस स्टेशनमधील पोलिसावर धारदार शस्त्राने वार…

शिरूर (शेरखान शेख): शिरूर पोलिस स्टेशनमधील पोलिस कॉन्स्टेबल दीपक नागरे हे नेमणूकीस असताना दोघांनी त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले आहेत. या घटनेत ते गंभीर जखमी झाले असून, उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शिरूर मधील जोशीवाडी, गवळी वीट भट्टी जवळ, शिरूर, तालुका शिरूर, जिल्हा पुणे या ठिकाणी रोडवर मंगळवारी (ता. २७) रात्री पावणे आठच्या […]

अधिक वाचा..

रांजणगाव MIDC पोलिसांनी गावठी कट्टा बाळगल्याप्रकरणी केली एकास अटक 

शिरुर: रांजणगाव MIDC त गावठी कट्टा बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी एका युवकास अटक केली असुन त्याच्याकडुन एक गावठी कट्टा तसेच एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले असुन ओंमकार संजय डांगे (वय २० वर्षे) रा. यादववाडी, वाडेगव्हाण, ता. पारनेर, जि. अहमदनगर असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असुन याबाबत रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनचे पोलिस कॉन्स्टेबल विजय शिंदे यांनी फिर्याद […]

अधिक वाचा..

शिक्रापूर पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळालेल्या आरोपीला बीड मधून घेतले ताब्यात

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये विनयभंग प्रकरणी गुन्हे दाखल असलेल्या आरोपीला शिरुर पोलीस स्टेशनच्या कोठडीत ठेवण्यासाठी नेले असताना पोलिसाच्या हाताला हिसका देऊन बेडीसह पळून गेलेल्या धनराज मधुकर डोंगरे शिक्रापूर पोलिसांच्या पथकाने बीड जिल्ह्यातून नुकतेच ताब्यात घेतले आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील एका महिलेचे अश्लील चित्रीकरण करत महिलेला दमदाटी केल्याने महिलेच्या तक्रारी […]

अधिक वाचा..

पोलिस कर्मचारी आत्महत्येप्रकरणी पत्नी, सासरा व मेव्हणा यांच्यावर गुन्हा दाखल…

रांजणगाव गणपती (तेजस फडके): शिक्रापुर येथे नेमणूकीस असलेले पोलिस कर्मचारी जितेंद्र ऊर्फ हरिभाऊ केशव मांडगे (वय 36) यांनी (दि 15) मार्च रोजी सांयकाळी 7 च्या सुमारास कारेगाव येथील नवलेमळा येथे एका शेतात असणाऱ्या विहीरीवरील लोखंडी राहटाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यानंतर मांडगे यांनी नक्की आत्महत्या का…? केली याबाबत चर्चाना उधाण आले होते. त्यांच्या […]

अधिक वाचा..

पोलिसांना पुढे करून राहुलजींचा आवाज दडपण्याचा नरेंद्र मोदींचा प्रयत्न यशस्वी होणार नाही

मुंबई: उद्योगपती गौतम अदानींचा हजारो कोटींचा महाघोटाळा आणि त्याचे नरेंद्र मोदींशी असलेले संबंध राहुलजी गांधी यांनी लोकसभेत उघड केल्यामुळेच घाबरलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी पोलिसांना पुढे करून राहुलजींचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहेत पण राहुल जी गांधी आणि काँग्रेस पक्ष हुकूमशाही वृत्तीच्या मोदी सरकारच्या दडपशाहीला भीक घालत नाही. अदानी मोदींच्या महा घोटाळ्याविरोधात राहुलजींसह आम्ही आवाज उठवत […]

अधिक वाचा..

शिरुरमधून चोरीला गेलेला जेसीबी २४ तासात चोरांसह पोलिसांनी घेतला ताब्यात

शिरुर (अरुणकुमार मोटे): करडे (ता. शिरूर) येथील पेट्रोलपंपावरुन चोरीला गेलेला जेसीबी तांबाराजूरी ता. पाटोदा जि. बिड येथे पळवून नेऊन त्याची दोन लाखाला चोरी करून विक्री केल्याप्रकरणी जेसीबी सह तीन आरोपींना २४ तास अथक प्रयत्न करून शिरूर पोलिसांनी गजाआड केल्याने शिरूर पोलिसांचे नागरीकांकडून कौतुक होत आहे. याबाबत सविस्तर माहीती अशी की, (दि. १७) मार्च रोजी करडे […]

अधिक वाचा..

राज्यातील पोलीसांवर हल्ल्याचे प्रमाण वाढल्याने पोलीसांनाच संरक्षण देण्याची वेळ

मुंबई: राज्यातील नागरिकांच्या संरक्षणासाठी पोलीस 24 तास कार्यरत असतात. अनेकवेळा जिवाची पर्वा न करता ते आपले कर्तव्य बजावत असतात. मात्र कर्तव्य बजावत असताना त्यांच्यावरच हल्ले होत आहेत. गेल्या तीन महिन्यात तीसहून अधिक हल्ले पोलीसांवर झाल्याच्या घटना घडल्या आहेत. पोलीसांवर हल्ल्याची प्रवृत्ती बळावू नये म्हणून असे गुन्हे करणाऱ्यांवर न्यायालयात त्वरित दोषारोपपत्र दाखल करण्याची आवश्यकता आहे. या […]

अधिक वाचा..
body

शिरूर एसटी स्टॅण्डमध्ये आढळला अज्ञात पुरुषाचा मृतदेह; पाहा वर्णन…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील बस स्टॅण्ड येथे अंदाजे ५०ते ६० वयाच्या अज्ञात पुरुषाचा मृतदेह रविवारी (ता. १२) आढळला आहे. मयत व्यक्ती ची अदयाप ओळख पटलेली नाही. शिवाय, हत्या की आत्महत्या याचे गुढ अद्याप कायम आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, शिरूर येथील निंबा खेवजी लांडे यांनी शिरूर पोलिस स्टेशनला याबाबत खबर दिली आहे. शिरूर […]

अधिक वाचा..

शिक्रापुरात धुलीवंदन दिनी मद्यपींना पोलिसांचा दणका

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) पोलीस स्टेशन हद्दीमध्ये धुलीवंदन दिनी दारु पिऊन वाहन चालवणाऱ्या वीस मद्यपी वाहन चालकांवर कारवाई करत गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांनी दिली आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दारु पिऊन वाहन चालवल्याने होणारे अपघात टाळण्यासाठी पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांनी अनोख्या पद्धतीने कारवाई […]

अधिक वाचा..

जागतिक महिला दिनानिमित्त महिलांनी सांभाळला शिक्रापूर पोलीस स्टेशनचा कारभार

शिक्रापूर पोलीस स्टेशन मध्ये महिला दिन उत्साहात साजरा शिक्रापूर (शेरखान शेख): सर्वत्र जागतिक महिला दिन साजरा होत असताना शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे पोलीस स्टेशनचा संपूर्ण कारभार देखील महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी सांभाळला असून आम्ही देखील पुरुषांप्रमाणे कोणत्याही कामात कमी नाही हे यावेळी महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी दाखवून दिले आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) पोलीस स्टेशन येथे आज जागतिक […]

अधिक वाचा..