रांजणगाव MIDC पोलिसांनी गावठी कट्टा बाळगल्याप्रकरणी केली एकास अटक 

क्राईम मुख्य बातम्या

शिरुर: रांजणगाव MIDC त गावठी कट्टा बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी एका युवकास अटक केली असुन त्याच्याकडुन एक गावठी कट्टा तसेच एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले असुन ओंमकार संजय डांगे (वय २० वर्षे) रा. यादववाडी, वाडेगव्हाण, ता. पारनेर, जि. अहमदनगर असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असुन याबाबत रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनचे पोलिस कॉन्स्टेबल विजय शिंदे यांनी फिर्याद दाखल केली आहे.

रांजणगाव MIDC पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार (दि 28) रोजी दुपारी 5:30 च्या सुमारास सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे, पोलिस कॉन्स्टेबल विजय शिंदे, उमेश कुतवळ हे MIDC त पेट्रोलिंग करत असताना विजय शिंदे यांना खबऱ्या मार्फत माहिती मिळाली की एक युवक रांजणगाव MIDC त एका कंपनीजवळ उभा असुन त्याकडे गावठी कट्टा आहे. त्यामुळे विजय शिंदे, उमेश कुतवळ आणि दत्तात्रय शिंदे यांनी त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता. ओमकार डांगे हा त्या ठिकाणी त्याची मोटार सायकल क्रं MH 12 TM 2754 वर बसलेला दिसला. त्यावेळी पोलिसांनी छापा टाकुन त्याला ताब्यात घेतले असता त्याच्याकडे एक गावठी बनावटीचा कट्टा आणि जिवंत काडतुस सापडले.

एक देशी गावठी कट्टा, एक पितळी धातुचे जिवंत काडतूस, एक हिरो कंपनीची मोटार सायकल असा एकुण 75 हजार 100 रुपयांचा ऐवज जप्त केला असुन रांजणगाव MIDC चे पोलिस निरीक्षक बलवंत मांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे पुढील तपास करत आहेत.