शिक्रापुरात धुलीवंदन दिनी मद्यपींना पोलिसांचा दणका

शिरूर तालुका

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) पोलीस स्टेशन हद्दीमध्ये धुलीवंदन दिनी दारु पिऊन वाहन चालवणाऱ्या वीस मद्यपी वाहन चालकांवर कारवाई करत गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांनी दिली आहे.

शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दारु पिऊन वाहन चालवल्याने होणारे अपघात टाळण्यासाठी पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांनी अनोख्या पद्धतीने कारवाई करत गुन्हे दाखल करण्याची मोहीम हाती घेतली असून धुलीवंदन दिली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन अतकरे, पोलीस हवालदार श्रीमंत होनमाने, मिलिंद देवरे, पोलीस शिपाई अंबादास थोरे, जयराज देवकर, किशोर शिवणकर यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पुणे नगर महामार्गावर दारु पिऊन वाहने चालवणाऱ्या संशयित वाहन चालकांची अल्को व्हिसर या अल्कोहोल तपासणी यंत्राच्या माध्यमातून तपासणी केली यावेळी दारु पिऊन आढळून आलेल्या दुचाकीचालकांची वैद्यकीय तपासणी केली.

यावेळी दारु पिवून वाहन चालवणाऱ्या वीस मद्यपी वाहन चालकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल करत त्यांची वाहने पोलीस स्टेशन येथे जमा करुन घेतली असून याबाबत बोलताना महामार्गावर होणारे अपघात टाळण्यासाठी यापुढील काळात सदर मोहीम कायम राबवणार असल्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांनी सांगितले.