तलाठी भरतीची प्रक्रिया 15 मार्चपासून सुरू होईल

औरंगाबाद: राज्यातील तलाठी भरतीसंदर्भात महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महत्त्वाची माहिती दिली असून राज्यात 15 मार्चपासून तलाठी भरती प्रक्रिया सुरु होणार असं ते म्हणाले. ते अहमदनगरमधील लोणी येथे महसूल परिषदेत बोलत होते. गेल्या काही वर्षांपासून राज्यात तलाठी पदाच्या अनेक जागा रिक्त होत्या. त्यासाठी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांनी तलाठी भरती आणि मंडळ अधिकारी पदोन्नती […]

अधिक वाचा..

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ द्विवार्षिक निवडणुकीची मतदान प्रक्रिया पूर्ण

मुंबई: महाराष्ट्र राज्यातील दोन पदवीधर आणि तीन शिक्षक अशा पाच मतदारसंघात आज शांततेते मतदान झाले असल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिली. नाशिक, अमरावती पदवीधर तर औरंगाबाद, नागपूर आणि कोकण शिक्षक मतदारसंघासाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली. नाशिक विभागात ४९.२८ टक्के, अमरावती विभागात ४९.६७ टक्के, औरंगाबाद विभागात ८६ टक्के, नागपूर विभागात ८६.२३ […]

अधिक वाचा..

मंत्रालयात बोगस भरती प्रक्रियेची चौकशी करुन दोषींवर कारवाई करा…

नागपूर: मंत्रालयात ‘क’ संवर्गातील लिपिकवर्गीय पदांची भरती सुरु असल्याचे खोटे सांगून मंत्रालयातील शिपाई पदावरील काही कर्मचाऱ्यांनी बोगस भरतीप्रक्रिया राबवली. या कर्मचाऱ्यांनी सामान्य प्रशासन विभागाच्या उपसचिवांच्या दालनात उमेदवारांच्या बोगस मुलाखतींचं नाटक घडवून आणलं. यातून अनेक युवकांची लाखो रुपयांची फसवणूक झाली आहे. मंत्रालयात उपसचिवांच्या दालनातंच झालेल्या या बनवेगिरीची सखोल चौकशी करावी. दोषींना शिक्षा करावी आणि फसलेल्या तरुणांना […]

अधिक वाचा..

शिरुरमध्ये निवडणुक प्रक्रियेच्या मतपेट्या वाहण्यासाठी चक्क एका राजकिय पक्षाच्या नेत्याच्या खाजगी वाहनाचा वापर

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर तालुक्यात नुकतेच ४ ग्रामपंचायतीसाठी मतदान प्रकिया पार पडली. सोनेसांगवी, करंजावणे येथील ग्रामपंचायतीच्या मतदान प्रक्रीयेसाठी शिरुर तहसिल कार्यालयातून करंजावणे, सोनेसांगवीपर्यंत मतपेट्या वाहून नेण्यासाठी शासकिय आधिकाऱ्यांनी चक्क शासकिय एस.टी चा वापर न करता चक्क एका राष्ट्रवादी पक्षाच्या बडया नेत्याच्या ट्रॅव्हल्सचा वापर केला आहे. त्या गाडयांचा बोर्डही झाकण्यात आला नव्हता. या ट्रॅव्हलच्या मालकाने सोने […]

अधिक वाचा..

दिवाळी फूड किट निविदा प्रक्रियेत कोट्यवधींचा भ्रष्टाचार!

मुंबई: सामान्य जनतेची दिवाळी गोड करण्याच्या गोंडस नावाखाली सरकारने जाहीर केलेल्या दिवाळी पॅकेजमध्ये मोठया प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. मंत्रीमंडळ निर्णयापूर्वीच निविदा काढण्यात आल्याने हा घोटाळा उघडकीस आला असून या दिवाळी फूड किट निविदा प्रक्रियेची चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे. या […]

अधिक वाचा..