शिरुरमध्ये निवडणुक प्रक्रियेच्या मतपेट्या वाहण्यासाठी चक्क एका राजकिय पक्षाच्या नेत्याच्या खाजगी वाहनाचा वापर

मुख्य बातम्या

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर तालुक्यात नुकतेच ४ ग्रामपंचायतीसाठी मतदान प्रकिया पार पडली. सोनेसांगवी, करंजावणे येथील ग्रामपंचायतीच्या मतदान प्रक्रीयेसाठी शिरुर तहसिल कार्यालयातून करंजावणे, सोनेसांगवीपर्यंत मतपेट्या वाहून नेण्यासाठी शासकिय आधिकाऱ्यांनी चक्क शासकिय एस.टी चा वापर न करता चक्क एका राष्ट्रवादी पक्षाच्या बडया नेत्याच्या ट्रॅव्हल्सचा वापर केला आहे. त्या गाडयांचा बोर्डही झाकण्यात आला नव्हता. या ट्रॅव्हलच्या मालकाने सोने सांगवी गावात त्याच्या कार्यकर्त्याच्या प्रचारही केला होता. या प्रकरणी वरिष्ठ आधिकाऱ्यांनी शासकीय आधिकाऱ्यांची चौकशी करत ताबडतोब कारवाई करण्याची मागणी सोनेसांगवीकरांनी केली आहे.

या बडया नेत्याच्या खाजगी गाडया वापरल्याने याबाबत विरोधकांनी वाद घातल्याने या खाजगी गाडया मतदान केंद्रापर्यंत पोहचवण्यासाठी पोलिस प्रशासणाची चांगलीच दमछाक झाली होती. एस.टी वापर न करता या राजकिय नेत्याच्या गाडया वापरण्यापाठीमागे शासकिय प्रशासनाचे नेमके काय गौडबंगाल आहे याचीही चौकशी होणे महत्वाचे आहे.

ही बाब माजी खाजदार शिवाजी आढळराव यांना समजताच रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनच्या पोलिस निरीक्षकांना शिंदे गटाची सत्ता असताना राष्ट्रवादीच्या दावणीला तुम्ही बांधलेले आहात का? अशा प्रकारे चांगलेच सुनावल्याची चर्चा होत आहे.

याबाबत शिरुरचे तहसिलदार प्रशांत पिसाळ यांना फोनवरुन माहीती दिली असता त्यांनी याबाबत बोलणे टाळले असल्याचे पॅनलप्रमुख मल्हारी काळे यांनी सांगितले आहे. प्रशासन व राजकिय पक्षाच्या ट्रॅव्हल्स मालकाचे या गाडया वापरण्यामागे काय मिलीभगत आहे. हे समजणे महत्वाचे आहे.