पुढील तीस वर्षांचा विचार करून कोरेगाव तालुक्यातील रस्त्यांची कामे दर्जेदार पद्धतीने करावीत

मुंबई: कोरेगाव शहरासह तालुक्यात सातत्याने होणारी वाहतूककोंडी, संभाव्य रस्तेअपघात टाळण्यासाठी ल्हासुर्णे ते कुमठे बाह्यवळण रस्ता, तसेच ल्हासुर्णे-कुमठे-वडाचीवाडी बाह्यवळण रस्त्यांची कामे पुढील तीस वर्षांचा विचार करून दर्जेदार पद्धतीने करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. कोरेगाव ते फलटण अंतर कमी करणाऱ्या रेडेघाट मार्गाची तातडीने पाहणी करून आराखड्यासह खर्चाचे अंदाजपत्रक तयार करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. कोरेगाव (जि. […]

अधिक वाचा..

ऑल इंडिया स्टेट रोड ट्रान्सपोर्ट अंडेरटेकिंग’ यांच्या संकल्पनेतून केला ‘चालक दिन’ साजरा

मुंबई: ‘ऑल इंडिया स्टेट रोड ट्रान्सपोर्ट अंडेरटेकिंग’ यांच्या संकल्पनेतून प्रतिवर्षी २४ जानेवारी हा दिवस सार्वजनिक परिवहन संस्थेतील अविभाज्य घटक असलेल्या ‘चालक’ या पदाला योग्य सन्मान व कौतुकाची थाप देण्याच्या उद्देशाने ‘चालक दिन’ म्हणून साजरा करून वास्तवतील या नायकांना सन्मानित करण्यात येते. बेस्ट व्यवस्थापनाद्वारे देखील सदर दिनाचे औचित्य साधून काल शुक्रवार, (दि. २४) जानेवारी २०२५ रोजी […]

अधिक वाचा..

शेतकऱ्यांनो कोणीच तुमचा रस्ता अडवू शकणार नाही

मुंबई: शेती ही भारताची सर्वात मोठी संपत्ती आहे. मात्र, शेतकऱ्यांना आपल्या शेतात जाण्यासाठी योग्य रस्ता नसल्यामुळे मोठ्या समस्या येतात. या अडथळ्यांना संपवण्यासाठी कायदेशीर उपायांचा फायदा घ्या आणि तुमचा शेत रस्ता मिळवा. शेत रस्ता नसल्यामुळे पिकांची वाहतूक करता येत नाही. शेतीला वेळेत आवश्यक कामे करता येत नाहीत. आर्थिक नुकसान वाढत जाते. यावर उपाय म्हणजे शेत रस्ता […]

अधिक वाचा..

शेतावरचा रस्ता रोखणाऱ्यांची ‘वाट’ लागली, वहीवाटीत वाहनानुसार रस्ता द्यावाच लागणार….

मुंबई: शेतकऱ्यांच्या शेतावरील वहीवाटीचा रस्ता काही कारणास्तव अडवला गेलेला आहे, त्यांना दिलासा देणारी बातमी आहे, तर ज्यांनी शेतीवरच्या वाटा रोखून धरल्या आहेत, अशांना मोठा दणका मिळणार आहे. कारण वहीवाटीत वाहन वापरानुसार रस्ता द्यावा लागणार आहे. रस्ता तयार करण्यासंबंधीचा निर्णय तहसीलदारांना घेता यावा यासाठी ‘गाइडलाइन्स’ प्रसिद्ध करण्याच्या सूचना सूचना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केल्या आहेत. […]

अधिक वाचा..

शेतात जायला रस्ता नाही, कायदेशीर पद्धतीने रस्ता कसा मिळवायचा? जाणून घ्या…

मुंबई: ‘शेती’ म्हंटली की छोटे मोठे भांडणे आलीच त्यातील बहुतांश भांडणे हे शेत रस्त्यावरून होताना दिसून येतात. एक शेतकरी दुसऱ्या शेतकऱ्याला शेत रस्ता देत नसतो. त्याचा तोटा हा संबंधीत शेतकऱ्याला होत असतो. शेतात जाण्यासाठी रस्ता न मिळाल्यामुळे शेतीचे मोठे नुकसान होते. मग अशा वेळेस कायदेशीर पद्धतीने शेत रस्ता कसा मिळवायचा हेच आपण जाणून घेणार आहोत. […]

अधिक वाचा..
kanhur-road

कान्हूर मेसाई-मिडगुलवाडीचा रस्ता उखडला अवघ्या दोन महिन्यातच…

कान्हूर मेसाई (सुनिल जिते): कान्हूर मेसाई येथे डांबरीकरण पूर्ण होऊन केवळ तीनच महिने झालेले असताना कान्हूर ते मिडगुलवाडी दरम्यान जागोजागी उखडला आहे. रस्त्याच्या कामाच्या नावाखाली अनेक महिने स्थानिकांसह नोकरदारांची झालेली गैरसोय व रस्त्याचे काम झाल्यानंतर अवघ्या तीन महिन्यांत पुन्हा नशिबी आल्याने संताप व्यक्त होत आहे. ठेकेदार मात्र उडवाउडवीची उत्तर देत आहे. रस्त्याचे ज्या ठिकाणी काम […]

अधिक वाचा..

शिरुरच्या पुर्व भागात रस्त्यांची दुरावस्था; सार्वजनिक बांधकाम खात्याचे दुर्लक्ष…?

शिंदोडी (तेजस फडके) शिरुरच्या पुर्व भागात रस्त्यांची दुरावस्था झाली असुन सार्वजनिक बांधकाम खात्याचे दुर्लक्ष झाल्याने काही ठिकाणी झालेली रस्त्यांची कामे दर्जाहीन असल्याचे दिसत असुन शिरुर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात अधिकारीही कधी जागेवर सापडत नाहीत. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सावळ्या गोंधळामुळे रस्त्याच्या कामाकडे कोण लक्ष देणार असा प्रश्न वाहनचालक विचारत आहेत. गुनाट ते शिंदोडी हा […]

अधिक वाचा..
shirur-pabal-road

शिरूर-पाबळ रस्त्यावरील पुलावर खड्ड्यांचे साम्राज्य…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर-पाबळ रस्त्यावरील अण्णापूर ते आमदाबाद फाटा (माशेरेवस्ती) नजीकच्या ओढ्यावरील पुलाच्या डांबरीकरणाचे काम गेल्या काही महिन्यांपासून रखडले आहे. पुलावर खडीचे ढिग अस्ताव्यस्त पसरले असल्याने येथे वारंवार छोटे-मोठे अपघात घडत आहे. काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली असल्याने याठिकाणी मोठ्या प्रमाणात धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. रस्त्यावरील उडणा-या धुळीमुळे वाहनचालक, पादचारी त्रस्त झाले आहेत. पुलावर […]

अधिक वाचा..
fakate-youth

शिरूर तालुक्यातील युवकांनी रस्त्याच्या कामासाठी उगारले उपोषणाचे अस्त्र…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील बेट भागात दळणवळण, उसवाहतूक व दुग्धवाहतूक आणि शालेय विद्यार्थ्यांच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या अनेक रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात यावे, या मागणीसाठी फाकटे (ता. शिरूर) येथील युवकांनी थेट उपोषणाचे अस्त्र उगारले आहे. दोन दिवसांपासून या रस्त्यांचे डांबरीकरण करण्यासाठी निधी उपलब्ध व्हावा हि आग्रही मागणी या तरुणांची असून पाठपुरावा करूनही जर या विकासकामांबाबत कोणता […]

अधिक वाचा..
grampanchayat

बांधकाम विभागाच्या मुजोर अधिकाऱ्यास तात्काळ निलंबित करा…

शिरूर (अरुणकुमार मोटे): माळवाडी (ता. शिरूर) गावातील रस्त्याचे काम उत्कृष्ट दर्जाचे व्हावे तसेच कामाचे स्वरूप समजून घेण्यासाठी कामाची वर्क ऑर्डर आणि इस्टीमेट मागितले म्हणून सरपंचाविरुध्द गुन्हा दाखल करण्याची धमकी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शाखा अभियंत्याने दिल्याचा धक्कादायक प्रकार शिरूर तालुक्यात घडल्याने ग्रामस्थांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. माळवाडी (ता. शिरूर) येथील माळवाडी-भैरवनाथवाडी-टाकळी हाजी या रस्त्यासाठी सहकारमंत्री […]

अधिक वाचा..