शिक्रापुर पोलिस ठाण्याच्या हद्दीत पैशांच्या वादातून माय-लेकासह मेहुण्याला मारहाण

शिक्रापुर (अक्षय टेमगिरे) उसने दिलेल्या पैशांच्या व्यवहाराच्या कारणावरुन झालेल्या वादातुन एका तरुणासह त्याच्या आई व मेव्हण्याला मारहाण केल्याची घटना निमगाव म्हाळुंगी (ता. शिरुर) येथे घडली असून, याप्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिक्रापुर पोलीस ठाण्यात फिर्यादी नाना सर्जेराव दगडे (वय ३३, व्यवसाय मेंढपाळ, रा. अरणगाव, ता. शिरुर, जि. पुणे) यांनी दिलेल्या […]

अधिक वाचा..

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शिक्रापूर पोलिसांचा पुढाकार; मुख्याध्यापकांसोबत महत्त्वपूर्ण बैठक

शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): विद्यार्थ्यांना सुरक्षित, निर्भय आणि सुसंस्कृत शैक्षणिक वातावरण मिळावे या उद्देशाने शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या वतीने विद्यार्थी सुरक्षा विषयक महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या बैठकीस जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयांचे सुमारे १०० ते ११० मुख्याध्यापक व शाळा प्रतिनिधी उपस्थित होते. दि. २४ […]

अधिक वाचा..

शिक्रापूर पोलिसांच्या जाळ्यात दुचाकीचोर; चार चोरीच्या मोटारसायकली जप्त

शिक्रापूर (ओमकार भोरडे): शिक्रापूर परिसरात सातत्याने वाढत असलेल्या दुचाकी चोरीच्या घटनांना आळा घालण्यात शिक्रापूर पोलिसांना मोठे यश आले आहे. पोलिसांनी एका सराईत दुचाकीचोराला अटक करून त्याच्याकडून सुमारे ९५ हजार रुपये किमतीच्या चार चोरीच्या मोटारसायकली जप्त केल्या आहेत. याप्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादी मनोज युवराज टेमगिरे (रा. बुरूजवाडी, […]

अधिक वाचा..

आठवडे बाजारातील चोऱ्यांवर शिक्रापूर पोलिसांचा वचक; दोन महिला रंगेहात जेरबंद

तळेगाव ढमढेरे : शिरूर तालुक्यातील शिक्रापूर, कोरेगाव भीमा व तळेगाव ढमढेरे येथील आठवडे बाजारांमध्ये वाढत्या मोबाईल चोरी, पाकीटमारी आणि सोन्याचे दागिने चोरण्याच्या घटनांवर आळा घालण्यासाठी शिक्रापूर पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली असून या मोहिमेला यश मिळाले आहे. बाजार परिसरात गस्त घालत असताना पोलिसांनी दोन संशयित महिलांना रंगेहात ताब्यात घेतले. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली […]

अधिक वाचा..
shikrapur-malthan-road

शिक्रापूर-मलठण रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात आला वेग!

संतोष धायबर, santosh.dhaybar@gmail.com शिरूर : शिक्रापूर ते मलठण रस्त्याच्या दयनीय अवस्थेबाबत सामाजिक कार्यकर्ते अशोक सोनवणे आणि www.shirurtaluka.comने आवाज उठवत सातत्याने बातम्यांची मालिका सुरू ठेवली आहे. संबंधित घटनेची वरिष्ठ पातळीवरून दखल घेण्यात आल्यानंतर रस्त्याच्या कामाला कागदोपत्री नव्हे तर आता प्रत्यक्षात वेग आला आहे. शिक्रापूर ते मलठण दुरुस्तीचे काम सुरू होऊन दोन अडीच महिने उलटूनही रस्त्याच्या कामामध्ये […]

अधिक वाचा..

शिक्रापुरमध्ये दिवसाढवळ्या घरफोडी; ८० हजारांचा ऐवज लंपास

शिक्रापुर (अक्षय टेमगिरे) शिक्रापुर परिसरात घरफोडीच्या घटनांमध्ये पुन्हा वाढ होत असून, पाबळ फाटा येथील सिद्धी अपार्टमेंटमध्ये अज्ञात चोरट्यांनी दिवसाढवळ्या घरफोडी करुन तब्बल ८० हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी भोपेंद्रसिंग सुदामसिंग पाटील (वय ३२) रा. रिद्धी-सिद्धी अपार्टमेंट, पाबळफाटा, शिक्रापुर, ता. शिरुर, जि. […]

अधिक वाचा..

पुणे-नगर महामार्गावर तीन वाहनांचा विचित्र अपघात; प्रसंगावधानाने मोठा अनर्थ टळला

शिक्रापुर (अक्षय टेमगिरे) पुणे-नगर महामार्गावर अपघातांची मालिका काही केल्या थांबत नसुन शिक्रापुर (ता. शिरुर) येथील हॉटेल तिरंगा समोर आज (दि 18) रोजी पहाटे 5 च्या सुमारास तीन वाहनांचा एक विचित्र अपघात घडल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात काही जण जखमी झाले असून सुदैवाने मोठी जीवितहानी टळली आहे.   View this post on Instagram   […]

अधिक वाचा..
sanjay-travel-bus-fire

शिरूर! पुणे-नगरमहामार्गावर कारला धक्का लागल्याने कंटेनरच पेटवला…

शिरूर : पुणे-नगर महामार्गावरील शिक्रापूर येथील ‘जीत ढाब्या’समोर कारला कंटेनरचा धक्का लागल्याच्या रागातून कारमधील दोघांनी कंटेनर चालकाला बेदम मारहाण करत दोघांनी मालाने भरलेला कंटेनर पेटवल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी दोन अज्ञात कार चालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. कंटेनर चालक अंकुश मस्तराम शर्मा (वय ३३, रा. जम्मू-काश्मीर) हे ३ एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास अहिल्यानगरकडून […]

अधिक वाचा..
shirkrapur-malthan-road

शिक्रापूर ते मलठण रस्त्याच्या कामांबाबत नागरिकांनी वाचला तक्रारींचा पाढा…

(संतोष धायबर santosh.dhaybar@gmail.com) शिरूर : शिरूर तालुक्यातील शिक्रापूर ते मलठण दरम्यान सुरू असलेल्या रस्ता नुतनीकरणाच्या कामामुळे स्थानिक नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. रस्त्याचे काम संथ गतीने सुरू असल्याने तसेच कामादरम्यान उडणाऱ्या धुळीमुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून केल्या जात आहेत. शिक्रापूर ते मलठण रस्त्याच्या नुतनीकरणासाठी सध्या मोठ्या प्रमाणात मातीचा वापर […]

अधिक वाचा..
shikrapur-traffic

Video: पुणे-नगर महामार्गावरील वाहतूक कोंडीविरोधात शिक्रापूरकर उतरले रस्त्यावर…

शिक्रापूर : पुणे-नगर महामार्गावरील शिक्रापूर (ता. शिरुर) येथे होणारी वाहतूक कोंडी दिवसेंदिवस वाढत असून, अनेकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने वाहतूक कोंडी व खड्ड्यांच्या समस्येबाबत स्थानिकांनी आक्रमक होऊन सोमवारी (ता. ६) जनआंदोलन केले. प्रशासनाने वाहतूककोंडी सोडवण्याबाबत लक्ष न घातल्यास व उपाययोजना न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ट्रॅफिक मुक्त शिक्रापूर […]

अधिक वाचा..