वृद्ध महिलेला मिळाले न्यायाचे मंगळसूत्र; शिरूर पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी

शिरूर (अरुणकुमार मोटे): समाजातील ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी पार पाडताना शिरूर पोलीसांनी पुन्हा एकदा आपली तत्परता व कर्तव्यदक्षता सिद्ध केली आहे. पायी चालणाऱ्या ७७ वर्षीय वृद्ध महिलेच्या गळ्यातील दिड तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून पळ काढणाऱ्या चोरट्यांकडून पोलीसांनी सदर मंगळसूत्र हस्तगत करून ते न्यायालयाच्या आदेशानुसार मूळ मालकिणीच्या सुपूर्त केले आहे. ही घटना दिनांक २७ जानेवारी २०२५ […]

अधिक वाचा..
Shirur Police Station

शिरूर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह? पोलिसांना ‘मलिदा’ मिळाला का…

शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्याच्या बेट भागातील कवठे येमाई गावात एका ४२ वर्षीय सामाजिक कार्यकर्त्याला सात जणांनी जमिनीच्या वादातुन मारहाण केली होती. त्यात एका माजी पंचायत समिती सदस्यावर गंभीर स्वरुपाचा गुन्हा दाखल झाला होता. मारहाणीची घटना घडल्यानंतर शिरुर पोलिसांनी सात पैकी तीन आरोपींना अटकही केली होती. तसेच शिरुर न्यायालयाने त्यांना सात दिवस पोलिस कोठडी दिली […]

अधिक वाचा..
shirur-police

शिरूर शहरातून चोरीस गेलेली मोटारसायकल परजिल्ह्यातून हस्तगत…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर शहरातील मार्केटयार्ड परिसरातून चोरीस गेलेली मोटारसायकल परजिल्ह्यातून हस्तगत करताना शिरूर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने केलेली कामगिरी अत्यंत कौतुकास्पद आहे. शिताफीने केलेल्या या कारवाईत मोटारसायकल चोरी करणारा सराईत चोरटा बापू गजानन थोरात (वय ३५, रा. बोळेगाव, ता. व जि. अहिल्यानगर) यास नागापूर एमआयडीसी परिसरातून अटक करण्यात आली आहे. आरोपीकडून होंडा शाईन […]

अधिक वाचा..

गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसेसह एकजण अटकेत; शिरूर पोलीसांची धडक कारवाई

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर येथील रामलींग परिसरात गावठी बनावटीची दोन पिस्तुले व सहा जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या इसमास शिरूर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अचूक सापळा रचून अटक केली. सदर कारवाईने परिसरात खळबळ उडाली असून, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या विरोधात शिरूर पोलिसांनी उचललेले पाऊल उल्लेखनीय ठरत आहे. दि.१५ जून २०२५ रोजी पोलीस अंमलदार विजय गजानन शिंदे यांना बातमीदारामार्फत माहिती […]

अधिक वाचा..
Shirur Police Station

शिरूर! डॉक्टर पत्नीला मारहाण करणाऱ्या सासरच्या मंडळींविरूद्ध गुन्हा दाखल…

शिरूर : माहेराहून पैसे घेऊन ये, यासाठी डॉक्टर असलेल्या पत्नीकडे तगादा लावत तीला मारहाण करणाऱ्या पतीसह शारीरीक, मानसिक छळ करणाऱ्या सासरच्या मंडळींविरूद्ध शिरूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. डॉ. पूजा महेश शेळके (वय २८, रा. बाबूराव नगर, शिरूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिरूर पोलिसांनी त्यांचे पती महेश सुरेश शेळके, सासू द्वारका सुरेश शेळके, सासरे सुरेश चंदरराव […]

अधिक वाचा..

शिरूर पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; १३ अल्पवयीन मुलींचा शोध घेऊन पालकांच्या ताब्यात सुपूर्द

४५ महिला व ३५ पुरुषांचीही यशस्वी शोधमोहीम शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने अत्यंत संवेदनशील व कौतुकास्पद अशी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. जानेवारी २०२५ ते मे २०२५ या कालावधीत शिरूर पोलीस ठाणे हद्दीतून घरातून निघून गेलेल्या १३ अल्पवयीन बालिकांचा यशस्वी शोध घेण्यात आला असून त्यांना सुखरूप त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. […]

अधिक वाचा..

शिरूर पोलिसांनी गहाळ झालेले ३५ मोबाईल परराज्यातून आणि परजिल्ह्यातून शोधून मूळ मालकांच्या ताब्यात

शिरूर (अरूणकुमार मोटे): शिरूर पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने एक मोठी आणि उल्लेखनीय कामगिरी करत तब्बल ३५ गहाळ मोबाईल फोन शोधून काढत ते त्यांच्या मूळ मालकांच्या ताब्यात दिले आहेत. ही सर्व मोबाईल्स परराज्य व परजिल्ह्यांमधून शोधून काढण्यात आली असून त्यांची एकूण अंदाजे किंमत सुमारे ६ लाख ८६ हजार रुपये इतकी आहे. सन २०२४ ते एप्रिल २०२५ […]

अधिक वाचा..

शिरूर पोलिस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगार तडीपार

शिरूर (अरूणकुमार मोटे): पुणे जिल्ह्यातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांकडून कठोर कारवाई केली जात आहे. त्याअंतर्गत पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्या आदेशानुसार, शिरूर पोलीस ठाणे हद्दीतील कर्डे-सरदवाडी एमआयडीसी परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या आणि विविध गंभीर गुन्ह्यांमध्ये गुंतलेल्या संकेत महामुनी टोळीतील सदस्यांना दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे. या टोळीतील गुन्हेगार घ्या उर्फ अभिषेक हनुमान […]

अधिक वाचा..

शिरुर शहरामध्ये शिरुर पोलिसांचा रूट मार्च 

शिरूर (अरूण कुमार मोटे): शिरूर पोलीस स्टेशनने (दि. २१) मार्च रोजी ०७ :२० वाजण्याच्या सुमारास नागपूर येथे घडलेल्या हिंसाचाराचे घटनेच्या अनुषंगाने शिरूर शहरामध्ये शिरूर पोलीस स्टेशन मधील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी शहरामध्ये रूट मार्च केला आहे. सदरचा रूट मार्च हा पोलिस स्टेशन-बीजे कॉर्नर-पाचकंदील चौक सुभाष चौक – एस स्टॅण्ड -इंदिरा गांधी पुतळा – […]

अधिक वाचा..

…म्हणून ३५ बुलेट सायलेन्सर वर शिरूर पोलिसांनी फिरवला बुलडोझर

शिरूर पोलीस स्टेशन वाहतुक शाखेची धडाकेबाज कारवाई शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरामधील कॉलेज, शाळा, बस स्टैंड व गर्दीचे ठिकाणी बुलेट सायलन्सर मधुन फटाके फोडणा-या, कर्कश आवाज करणा-या चालकांवर व बुलेट सायलेन्सस्वर कारवाई करण्याचे आदेश शिरूर पोलीस स्टेशन वाहतुक शाखेला देवुन त्या अनुशंगाने वाहतुक शाखेचे पोलीस हवालदार राजेंद्र वाघमोडे, महीला पोलीस हवालदार भाग्यश्री जाधव, पोलीस अंमलदार […]

अधिक वाचा..