Shirur Police Station

शिरूर ! Instagramवरून युवकासोबत केलेली ओळख युवतीला पडली महागात…

क्राईम

शिरूर (अरुणकुमार मोटे) : Instagram वरून ओळख झालेल्या मित्रावर विश्वास ठेवून दिलेली सुमारे १.४० लाख रुपयांची सोन्याची चैन घेऊन आरोपी पसार झाल्याची धक्कादायक घटना शिरूर शहरातील ओमरूद्रा कॉलनी येथे घडली आहे. याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी शुभांगी विजय काळे (वय २२, रा. ओमरूद्रा कॉलनी, शिरूर) या युवतीने दिलेल्या फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे, तिची इंस्टाग्रामवरून ओळख पवन आंबादास सुरवसे (रा. डिसलेवाडी, जामखेड, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर) याच्याशी झाली होती. ओळखीनंतर पवनने तिला आणि तिच्या मित्र-मैत्रिणींना लोणावळ्याला फिरायला जाण्याचे आमंत्रण दिले.

शुभांगी हिने आपली मैत्रीण साक्षी काळे, दिपिका घोंगडे व शुभम गद्रे यांच्यासोबत २४ जुलै रोजी पवनच्या पोलो गाडीने (MH 17 AH 9900) लोणावळा येथे प्रवास केला. दोन दिवस प्रवासानंतर २६ जुलै रोजी सकाळी ११.३० वाजता ते शिरूरला परत आले. घरासमोर पोहोचल्यावर पवनने शुभांगीच्या गळ्यातील अंदाजे दिड तोळे वजनाची सोन्याची चैन (किंमत सुमारे ₹१,४०,०००/-) ज्यावर गणपतीचे पेंडंट होते ते त्याने पाहण्यासाठी मागितले. शुभांगीने विश्वासाने ती चैन पवनच्या हातात दिल्यावर, त्याने ती आपल्या गळ्यात घालून, “मीही अशीच चैन बनवणार आहे,” असे सांगितले. मात्र, शुभांगी गाडीतून खाली उतरल्यावर पवन गाडी घेऊन तिथून पसार झाला आणि पुन्हा परतलाच नाही.

फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे, शुभांगीने वारंवार फोन करून त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने तिचे फोन उचलले नाहीत आणि तिची चैन परत दिली नाही. परिणामी, हा प्रकार विश्वासघातासह फसवणुकीचा गुन्हा ठरला. या प्रकरणी पोलीस हवालदार शिंदे यांनी गुन्हा नोंदवला असून तपासाची जबाबदारी पो.हवा. जगताप यांच्याकडे देण्यात आली आहे.

शिरूर तालुक्यासह जिल्हयात अशाप्रकारे इंस्टाग्राम, फेसबूक, व्हाटसअप, शेअरचॅट या सोशल मीडियावरून ओळख वाढवून फसवणूक केल्याचे प्रकार वाढीस लागले असून नागरिकांनी सोशल मीडियावर नवीन ओळखींबाबत अत्यंत सतर्कता बाळगणे आवश्यक आहे.

महसुल प्रशासनाची धडाकेबाज कारवाई, आलेगाव पागा येथून १४ बेठविगार मजुरांची दोन वर्षांच्या बंदिवासातून मुक्तता

शिरूर तालुक्यात महिला व तिच्या भावास बेदम मारहाण; विनयभंग, दमदाटी प्रकरणी दोन जणांविरोधात गुन्हा दाखल

करडे येथील बाप-लेकीला अटक करण्यास पोलिसांकडुन टाळाटाळ की वरिष्ठ अधिकाऱ्याचा हस्तक्षेप…?

Video; स्थानिक गुन्हे शाखा करतेय अवैध धंद्यावर कारवाई…परंतु शिरुर उपविभागीय कार्यालयाला कसलीच चिंता नाही

शिरूर तालुक्यात महिला व तिच्या भावास बेदम मारहाण; विनयभंग, दमदाटी प्रकरणी दोन जणांविरोधात गुन्हा दाखल