farmer

शिरूर तालुक्यात युरिया टंचाई; शेतकरी हवालदिल; अधिकाऱ्यांना मलई…

शिरुर (अरूणकुमार मोटे): शिरूर तालुक्याच्या विविध भागांमध्ये समाधानकारक पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरण्या केल्या आहेत. पिकांची उगवण चांगली झाली आहे. पिकांना आवश्यकता असताना युरिया खताचा मात्र तुटवडा निर्माण झाला आहे. ऐन खरिपात युरियाची टंचाई निर्माण झाल्याने शेतकऱ्यांवर युरियासाठी गावोगाव फिरण्याची वेळ आली आहे. खरिपाच्या बाजरी, सोयाबीन, मूग अशा पिकांसाठी नत्रयुक्त युरियाची अत्यंत आवश्यकता असते. वेळेत […]

अधिक वाचा..
drone

शिरूर तालुक्यातील गावांमध्ये रात्रीस चाले ‘ड्रोनचा खेळ’; नागरिकांमध्ये भिती…

शिरूर (सुनिल जिते): शिरूर तालुक्यातील कान्हूर, मलठण, पाबळ, मिडगुलवाडी, वाघाळे या गावांसह विविध गावांमध्ये रात्रीच्या सुमारास ड्रोन घिरट्या मारत असल्याचे दिसून येत आहे. चोरट्यांच्या टोळ्यांकडून चोरी करण्यासाठी या ड्रोनचा वापर केला जात असल्याच्या चर्चा देखील ग्रामीण भागात रंगू लागल्या आहेत. परिसरात ड्रोन फिरत असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. एक चोरी झाली की दुसरी चोरी […]

अधिक वाचा..
RANJANGAON

रांजणगाव एमआयडीसीमधील कंपनीत कामगाराचा मृत्यू…

रांजणगाव गणपती (तेजस फडके): रांजणगाव औद्योगिक वसाहतीमधील झामील स्टील कंपनीमध्ये क्रेनच्या सहाय्याने मोठमोठे पार्ट उचलत असताना क्रेनचे हुक तुटून पार्ट अंगावर पडल्याचे कंपनी कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. रांजणगाव एमआयडीसी पोलिस स्टेशन येथे आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेत शिवबाबू कमलेश शाहू (वय २३, सध्या रा. ढोकसांगवी ता. शिरुर जि. पुणे मूळ रा. […]

अधिक वाचा..
chandan-sondekar

‘आंधळ दळतंय आण कुत्रं पिठ खातयं,’ अशी शिरुर-हवेलीत परिस्थिती : चंदन सोंडेकर

शिक्रापुर (प्रतिनिधी) ‘आंधळ दळतंय आण कुत्रं पिठ खातयं,’ अशी शिरुर-हवेलीत परिस्थिती आहे. निवडणुकीच्या तोंडावर नागरीकांचे प्रश्न सुटणार हा देखावा असून, वास्तविक गेले पाच वर्ष नागरकांची प्रशासनाकडून पिळवणूक होत आहे. आमदारांकडून न सुटलेले प्रश्न मी सोडवणार आहे, असे चंदन सोंडेकर यांनी म्हटले आहे. चंदन सोंडेकर हे विधानसभा निवडणूकीसाठी इच्छुक आहेत. श्री. सोंडेकर म्हणाले, ‘आमदारांनी आघाडी सरकार असताना […]

अधिक वाचा..
Beaten

शिरूर तालुक्यातील दांपत्याचे अपहरण करुन उलटे टांगून बेदम मारहाण; गुन्हा दाखल…

शिक्रापूर (प्रतिनिधी) शिरूर तालुक्यात एक धक्कादायक प्रकार घडला असून, यामुळे मोठ्या प्रमाणावर खळबळ उडाली आहे. एका दांपत्याचे अपहरण करीत चारचाकी गाडीत काळूस (ता. खेड) येथे नेऊन दोघांना हातपाय बांधून, उलटे टांगून अमानुषपणे मारहाण केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. सदर मारहाणीचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. याबाबत शिक्रापूर पोलिसांकडून उत्तरसिंग मनावत (राठोड), विकी मनावत […]

अधिक वाचा..
mahaganpati

रांजणगावमध्ये महागणपतीच्या दर्शनासाठी भाविकांनी अलोट गर्दी…

रांजणगाव गणपती (पोपट पाचंगे): अष्टविनायकापैकी एक असलेल्या श्री क्षेत्र रांजणगाव गणपती (ता. शिरुर) येथील महागणपतीच्या दर्शनासाठी भाविकांनी अलोट गर्दी केली होती. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’च्या जयघोषात भाविकांनी महागणपतीचे मनोभावे दर्शन घेतले. भाविकांच्या अलोट गर्दीने रांजणगावला अक्षरशः यात्रेचे स्वरुप आले होते. आज (मंगळवार) अंगारक संकष्टी चतुर्थी असल्याने पहाटे ५ वाजता श्रींचा अभिषेक करुन मंदिर भाविकांना […]

अधिक वाचा..
dilip-walse-patil

राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या अडचणीत वाढ…

नागपूर : राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यावर अवमानना खटला चालवण्यात येणार आहे. या प्रकरणी नागपूर खंडपीठाने दिलीप वळसे पाटील यांना सहा आठवड्यात जबाब नोंदवण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाच्या आदेशानंतरही एका सहकार प्रकरणाची सुनावणी न केल्याप्रकरणी उच्च न्यायालयाचे हे आदेश दिले आहेत. महाराष्ट्र सहकार सोसायटी कायद्याच्या अंतर्गत याचिकातर्ता हरिभाऊ मोहोड यांनी सहकारिता विभागाकडे अपील दाखल […]

अधिक वाचा..
yash-gaikwad

शिरुर तालुक्यात वन्य प्राण्याच्या हल्ल्यात मुलाचा मृत्यू; मात्र अधिकारी म्हणतात…

शिक्रापूर (योगेश शेंडगे): शिरुर तालुक्यातील दहिवडी गावच्या मांजरेवस्ती शिवारात शुक्रवारी (ता. २१) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास वन्य प्राण्याच्या हल्ल्यात यश शरद गायकवाड (वय १०) मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. परंतु, हा हल्ला बिबट्यानेचं केलाय की अन्य वन्यप्राण्याने केलाय याबाबत खात्रीलायक माहिती उपलब्ध झालेली नाही. यश गायकवाड याचा शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे खरे कारण […]

अधिक वाचा..
bhagwan-karpe

तळेगाव-न्हावरे रोडवर अपघातात जेष्ठ नागरिकाचा मृत्यू…

शिक्रापूर (योगेश शेंडगे) : शिरूर तालुक्यातील तळेगाव-न्हावरे रोडवर घोलपवाडी येथे शुक्रवारी (ता. २१) सकाळी नऊ च्या सुमारास दुचाकीला पाठीमागून वेगात येणाऱ्या दुचाकीची धडक बसल्याने झालेल्या अपघातात भगवान रामभाऊ कर्पे (वय ६५, रा.कर्पे वस्ती, टाकळी भीमा) या ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सविस्तर माहिती अशी की, तळेगाव-न्हावरे रस्त्यावर घोलप वाडी येथे पाठीमागून वेगात दुचाकीवर […]

अधिक वाचा..
suhas-maid

शिरूर येथील डॉ. सुहास महेंद्र मैड यांची ‘वैद्यकीय अधिकारी वर्ग-१’ पदाला गवसणी…

सविंदणे (अरुणकुमार मोटे): महाराष्ट्र शासनाच्या स्वतंत्र निवड मंडळातर्फे महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट अ संवर्गात नियुक्तीसाठी निवड प्रक्रिया राबवण्यात आली होती. यामध्ये शिरूर येथील डॉ. सुहास महेंद्र मैड यांनी उज्वल यश प्राप्त करून ‘वैद्यकीय अधिकारी वर्ग-१’ पदाला गवसणी घातली आहे. डॉ. सुहास यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मलठण येथे तर माध्यमिक शिक्षण […]

अधिक वाचा..