सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली; अंबदास दानवे 

मुंबई: शेतकऱ्यांनी कोरोना काळात सरकारला, जनतेला तारलं होतं मात्र शिंदे-फडणविस सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसले असल्याची टीका विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी केली. कांद्याला व कापसाला हमी भाव न देता उलट कृषी मंत्री हे शेतकऱ्यांच्या आत्महत्येच कारण न तपासता त्यावर धक्कादायक वक्तव्य करतात, अशा शब्दात त्यांनी सरकारला धारेवर धरले. भांडवली खर्चामध्ये जास्तीत […]

अधिक वाचा..

फडणविसांचा अर्थसंकल्प म्हणजे ‘बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी’…

मुंबई: शिंदे सरकारचा पहिला अर्थसंकल्प अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर करताना घोषणांचा पाऊस पाडला. या अर्थसंल्पातून केलेल्या घोषणांची वास्तवात पूर्तता होणे कठीण आहे. फडणवीस यांनी केलेल्या अवास्तव घोषणा महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला उध्वस्त करणाऱ्या व भोळ्याभाबड्या जनतेची फसवणूक करणाऱ्या आहेत. तुकाराम महाराजांच्या अभंगात सांगायचे तर हा अर्थसंकल्प म्हणजे, “बोलाचीच कढी, बोलाचाच भात, जेउनियां तृप्त कोण जाला”? असा […]

अधिक वाचा..

प्रत्येक जिल्ह्यात महिलांसाठी ‘महिला विकास व्यासपीठ’ असावे…

मुंबई: राज्याचे चौथे महिला धोरण २०२३ ची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात महिला ‘महिला विकास व्यासपीठ’ असावे, महिला व बालविकास विभागाला वाढीव निधी मिळावा, मनोधैर्य योजना महिला व बालविकास विभागामार्फत राबविण्याच्याबाबत आम्ही सर्व महिला आमदार मागणी करत आहोत, असे प्रतिपादन उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी महिला बालविकास विभागातर्फे आयोजित महिला धोरणाच्या चर्चेच्या बैठकीत केले. राज्याचे […]

अधिक वाचा..

हे सरकार शेतकर्‍यांचे, कष्टकऱ्यांचे, कामगाराचे नाहीय हे सरकार बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टरांचे आहे…

मुंबई: हे सरकार शेतकर्‍यांचं, कष्टकऱ्यांचं, कामगाराचं नाहीय हे सरकार बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टरांचे आहे अशी घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज अर्थसंकल्पावर बोलताना केली. या सरकारची जाहिरातच अशी आहे ‘निर्णय वेगवान महाराष्ट्र गतीमान’ परंतु गतिमान होण्याऐवजी महाराष्ट्र मागे रहायला लागला आहे. महाराष्ट्राची गती कमी व्हायला लागली आहे. आणि महाराष्ट्राची […]

अधिक वाचा..

तळेगाव ढमढेरेतील विद्युत रोहित्राच्या पट्ट्या चोरी

शिक्रापूर (शेरखान शेख): तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील न्हावरा रोड लगत असलेल्या गोविंदधाम येथील विद्युत रोहित्र अज्ञात चोरट्यांनी फोडून त्यातील तांब्याच्या तारा चोरुन नेल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील न्हावरा रोड लगत असलेल्या गोविंदधाम येथील विद्युत पुरवठा खंडित झाल्याने येथील शेतकरी […]

अधिक वाचा..

शिक्रापूरच्या आठवडे बाजारात युवकाला मारहाण

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथे आठवडे बाजारात बटाट्याच्या गोणीवर पाणी सांडल्याने युवकाला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे नाथा बबन उमाप, प्रदीप दगडू उमाप, मंगेश फुलमोगरे, सुमित संपत नरके या चौघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील आठवडे बाजारात एक महिला बटाटे विक्रीसाठी बसलेली असताना […]

अधिक वाचा..

शिक्रापुरात मुरुम उत्खनन करणारा जेसीबी व डंपर जप्त

शिरुरच्या महसूल विभागाची शिक्रापूर पोलिसांच्या मदतीने कारवाई शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील चाकण रोड परिसरात बेकायदेशीरपणे मुरूम उत्खनन होत असलेल्या ठिकाणी महसूल विभागाने कारवाई करत पोलिसांच्या मदतीने जेसीबी व डंपर जप्त केल्याची घटना घडली आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील चाकण रोड लगत जुन्या टोलनाका शेजारी एका जेसीबी व डंपरच्या सहाय्याने काही इसम बेकायदेशीरपणे […]

अधिक वाचा..

शिरूरमध्ये चोरट्यांनी फोर व्हीलरमधील २ लाख रुपये केले लंपास

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील पोस्ट ऑफीस समोर उक्कडगाव ता. श्रीगोंदा येथील लेबर कॉन्ट्रक्टर मंगेश विठठल महाडिक यांच्या पार्क केलेल्या फोर व्हीलर गाडीतून अज्ञात चोरट्याने २ लाख रुपये लंपास केले आहे. याबाबत सविस्तर हकीकत अशी की, (दि. ९) मार्च रोजी दुपारी ३: ३० वा. ते रात्री 9: ४५ वाजल्याच्या दरम्यान शिरूर शहराच्या हद्दीत शिरुर पोष्ट […]

अधिक वाचा..

ऊसतोड कामगार न पुरवता केली चक्क १५ लाख ७० हजारांची फसवणुक

शिरुर (अरुणकुमार मोटे): वडनेर (ता. शिरुर) येथील संपत बळवंत बो-हाडे यांना बाबुराव दगा सोनावणे, गोमा देवचंद्र तलवारे दोन्ही रा. कवळाने, ता. मालेगांव, जि. नाशिक, सोमा टुबडू सोनवणे, सुरेश कोंडाजी सोनावणे, रा. मु.पो. राजमाने, ता. मालेगांव, जि. नाशिक यांनी ऊसतोड कामगार पुरवतो अशी बतावणी करून त्यांना फिर्यादीने वेळोवेळी बॅकेमार्फत पैसे पाठवून सुद्धा कामगार न पुरवल्याने त्यांच्याविरुद्ध […]

अधिक वाचा..

जुनी पेन्शन साठी सर्व कर्मचाऱ्यांचा शिरुर येथे विराट मोर्चा…

शिरुर (अरुणकुमार मोटे): महाराष्ट्र राज्यातील नोव्हेंबर २००५ नंतर चे सर्व कर्मचाऱ्यांना १९८२ व १९८४ ची जुनी पेन्शन योजना पूर्ववत चालू करण्यासाठी शिरुर पंचायत समिती व तहसील कार्यालय येथे धरणे आंदोलन करण्यात आले तसेच नायब तहसिलदार सुवर्णा खरमाटे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. राज्य सरकारी निमसरकारी शिक्षक व इतर कर्मचारी संघटना समन्वय समिती महाराष्ट्र राज्य २००५ […]

अधिक वाचा..