शिरुर पोलिसांनी गावठी पिस्टल आणि जिवंत काडतुसे बाळगणाऱ्याला घेतले ताब्यात

मुख्य बातम्या

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरूर शहरात आठवडे बाजार परीसरात पेट्रोलिंग करत असताना शिरुर एस.टी स्टॅण्डमध्ये शिरुर पोलिसांना पृथ्वीराज गणपत बेंद्रे (रा. आंबळे) या युवकाने गावठी पिस्टल बाळगलेले आढळून आल्याने त्याला पिस्टल सहीत ताब्यात घेण्यात आले आहे.

याबाबत शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहीतीनुसार शनिवार (दि. १८) रोजी शिरुर आठवडे बाजाराच्या अनुषंगाने शिरुर पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे पोलिस उपनिरीक्षक एकनाथ पाटील, पोलिस नाईक नाथा जगताप, पोलीसअंमलदार सचिन भोई, विनोद काळे, प्रविण पिठले हे बाजारामध्ये पेट्रोंलिंग करीत असताना त्यांना गोपनिय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहिती वरुन शिरुर शहरामध्ये पृथ्वीराज गणपत बेंद्रे (रा.आंबळे ता.शिरुर जि.पुणे ) हा इसम कमरेला विना परवाना गावठी पिस्टल लावुन फिरत असल्याबाबत माहीती मिळाली. त्यानंतर तात्काळ हे सर्वजण त्या ठिकाणी गेले.शिरुर एस टी स्टॅंडमध्ये सदर व्यक्ती दिसल्याने त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला एक गावठी बनावटीचे पिस्टल तसेच दोन जिवंत काडतुसे मिळुन आली.

या शस्त्र परवानाबाबत त्याच्याकडे विचारणा केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देवु लागला त्याला ताब्यात घेवुन पुढील कारवाई करण्यात आली आहे. सदरची कामगीरी ग्रामीणचे पोलीस अधिक्षक अंकीत गोयल, उपविभागिय पोलीस अधिकारी यशवंत गवारी,पोलीस निरीक्षक सुरेश कुमार राऊत, सहायक पोलिस निरीक्षक अमोल पन्हाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक एकनाथ पाटील, पोलिस नाईक नाथाभाऊ जगताप, पोलीस अंमलदार सचिन भोई, विनोद काळे, प्रवीण पिठले यांच्या पथकाने केली आहे.