आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कुटुंबियांना आलेल्या धमकीप्रकरणाची कारवाई तीव्रतेने करावी

महाराष्ट्र

मुंबई: आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कुटुंबियांना धमकी प्रकरणाचा मुद्दा विशेष बाब अंतर्गत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी परिषद सभागृहात उपस्थित करत याप्रकरणाची कारवाई तीव्रतेने करावी, अशी मागणी केली.

या प्रकरणात धमकी देणाऱ्या पालिकेतील अधिकाऱ्यास मुख्यमंत्री यांचे सुरक्षा कवच आहे. ही बाब योग्य नाही. संबंधित त्या अधिकाराच्या मालमत्तेची चौकशी करावी अशी मागणी देखील दानवे यांनी सभागृहात केली. तसेच या प्रकरणाची चौकशी होईपर्यंत त्या अधिकाऱ्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे निर्देश उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दिले.

त्यावर सरकारकडून उत्तर देण्यात आले की, ही अतिशय गंभीर बाब असून निषेधार्ह आहे. या प्रकरणात त्या अधिकाऱ्याची स्थानिक पोलिसांशी ओळख असल्याने सीआयडी अधिकारी देऊन त्याची चौकशी केली जाईल. तसेच एक ऑडिओ सीडी तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबला पाठवली आहे. या प्रकरणी कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही.