शेरखान शेख व अमर गोडांबे यांना राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार व सर्पमित्र शेरखान शेख व सर्पमित्र अमर गोडांबे यांना मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय गुणीजन गौरव महापरीषद कार्यक्रमात देणारा राज्यस्तरीय आदर्श कार्यगौरव समाजरत्न पुरस्कार २०२३ जाहीर करण्यात आला असल्याची माहिती मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीचे संस्थापक अध्यक्ष ॲड. कृष्णाजी जगदाळे यांनी दिली आहे. […]

अधिक वाचा..

जनावरांसाठी चारा आणण्यासाठी गेलेल्या व्यक्तीच्या गळयातील चैन हिसकावली अन…

शिक्रापूर (शेरखान शेख): जातेगाव बुद्रुक (ता. शिरुर) येथील व्यंकटेशकृपा शुगर मिल्स या साखर कारखान्याकडे जनावरांसाठी चारा आणण्यासाठी गेलेल्या व्यक्तीच्या गळ्यातील अडीच तोळे वजनाची सोन्याची चैन अज्ञात युवकांनी हिसकावून नेल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात 3 युवकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. जातेगाव बुद्रुक (ता. शिरुर) येथील व्यंकटेशकृपा शुगर मिल्स या साखर कारखान्याकडे […]

अधिक वाचा..

सोनसाखळी चोऱ्यांनंतर आता शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारींच्या केबलची चोरी

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर शहरात सोनसाखळी चोरांनी धुमाकुळ घातलेला असताना चोरटयांनी आण्णापूर येथील घोडनदी पात्रात असणाऱ्या अनेक शेतकऱ्यांच्या विदयुत मोटारींच्या महागड्या केबलची चोरी केली आहे. याबाबत शिरुर पोलिस स्टेशनला संजय रामदास कुंरदळे यांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत सविस्तर हकीकत अशी की, (दि. 1) फेब्रुवारी रोजी सकाळी ८.३० वाजल्याच्या सुमारास फिर्यादी संजय कुंरदळे यांनी घोडनदीवरील […]

अधिक वाचा..

लोणी – पाबळ रस्त्यावरती दुसऱ्यांदा बिबट्याच्या बछड्याचा अपघाती मृत्यू…

वाघोली: लोणी (ता. आंबेगाव) जि. पुणे मंगळवार (दि. 2) रोजी येथील हद्दीतील सकाळी 7 वाजता बेल्हा -जेजुरी महामार्गावर लोणी -पाबळ रस्त्यावर दुसऱ्यांदा बिबट्याच्या बछड्याचा अपघाती मृत्यू झाला आहे. संग्राम हॉटेलच्या जवळ अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे अंदाजे 7 ते 8 महिन्याचा बिबट्याचा बछडा मृत अवस्थेत आढळून आला. रस्त्याने जाणाऱ्या वाहन चालक नागनाथ सुक्रे यांनी ही माहिती […]

अधिक वाचा..

अर्थसंकल्प सर्वसामान्य माणसाच्या समजण्यापलीकडचा…

मुंबई: अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी सादर केलेला अर्थसंकल्प हा सर्वसामान्य माणसाच्या समजण्यापलीकडचा असून अर्थसंकल्पातून केवळ काल्पनिक परिणामांवर समाधान मानावे लागेल अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केली आहे. आज केंद्रीय अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी सादर केला मात्र यातून सर्वसामान्य जनतेच्या पदरी निराशाच आली आहे, असा हल्लाबोलही महेश तपासे यांनी […]

अधिक वाचा..

कर रुपाने सर्वाधिक महसूल देणाऱ्या महाराष्ट्रासह मुंबईच्या तोंडाला पाने पुसली…

मुंबई: लोकसभेसह देशातील नऊ राज्यांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन तयार केलेला हा फसवा आणि चुनावी जुमला असलेला अर्थसंकल्प आहे. देशातील मध्यमवर्गीयांना खुश करण्यासाठी वरकरणी प्राप्तीकराची सूट मर्यादा वाढविण्याचा दिखावा करण्यात आला आहे. प्रत्यक्षात मध्यमवर्गीयांच्या सामाजिक सुरक्षेसाठी कोणतीही ठोस तरतुद अर्थसंकल्पात करण्यात आलेली नाही. त्यामुळे ‘वेलफेअर स्टेट’ची संकल्पना मोडीत काढणारा हा अर्थसंकल्प आहे. सन २०१८ ते २०२२ […]

अधिक वाचा..

हा तर दगाबाज सरकारचा अर्थ संकल्प!

मुंबई: सामान्य शेतकरी, कष्टकरी आणि मध्यमवर्ग यांचा केवळ मते मिळविण्यापुरता विचार करून प्रत्यक्ष अर्थसंकल्प सादर करताना मात्र त्यांना दगा देणारे मोदी सरकार हे दगाबाज आणि घोषणाबाज असल्याची टीका विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. आजचा अर्थसंकल्प हा सर्वसामान्य, शेतकरी व महिलांच्यादृष्टीने निराशाजनक असल्याची प्रतिक्रिया अंबादास दानवे यांनी व्यक्त केली. आजच्या अर्थसंकल्पात शेतीच्या […]

अधिक वाचा..

मुष्टीयुद्धामध्ये देविकाचे पदक निश्चित…

खेलो इंडीया युथ गेम्स २०२२-२३ मुंबई: मुष्टीयुद्धामध्ये महाराष्ट्राच्या देविका घोरपडे हिने उपांत्य फेरीत स्थान मिळवित पदक निश्चित केले आहे. ५२ किलो गटात तिने हरियाणाच्या अंजली कुमारी हिचा सहज पराभव केला. तिने प्रारंभापासूनच या लढतीत आपले वर्चस्व राखले होते. महाराष्ट्राच्या अभिषेक जांगिड, कुणाल घोरपडे यांनी आगेकूच कायम राखली. भोपाळ येथील तात्या टोपे क्रीडा नगरीत सुरू असलेल्या […]

अधिक वाचा..

शेजारी राज्याला मिळाले आमच्या महाराष्ट्राला मिळत नाही…

मुंबई: या बजेटने लोकांचा भ्रमनिरास झाला असून महाराष्ट्रासाठी आणि मुंबईसाठी या बजेटने काय दिले असा प्रश्न राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी व उपमुख्यमंत्र्यांनी केंद्रसरकारला विचारण्याची आवश्यकता आहे. शेजारी राज्याला मिळाले आमच्या महाराष्ट्राला मिळत नाही याचे शल्य मात्र महाराष्ट्रातील जनतेला कायम राहिल अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी या अर्थसंकल्पावर नाराजी व्यक्त केली […]

अधिक वाचा..

अकृषी विद्यापीठे व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी यांच्या मागण्या बाबत सकारात्मक निर्णय घेऊ…

मुंबई: राज्यातील अकृषी विद्यापीठे व अशासकीय अनुदानित महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या बाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत चर्चा करून सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी सांगितले. मंत्रालयात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली अकृषी विद्यापीठे व अशासकीय अनुदानित महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या […]

अधिक वाचा..