शेरखान शेख व अमर गोडांबे यांना राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार

शिरूर तालुका

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार व सर्पमित्र शेरखान शेख व सर्पमित्र अमर गोडांबे यांना मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय गुणीजन गौरव महापरीषद कार्यक्रमात देणारा राज्यस्तरीय आदर्श कार्यगौरव समाजरत्न पुरस्कार २०२३ जाहीर करण्यात आला असल्याची माहिती मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीचे संस्थापक अध्यक्ष ॲड. कृष्णाजी जगदाळे यांनी दिली आहे.

शिक्रापूर (ता. शिरुर) येथील सामाजिक कार्यकर्ते व सर्पमित्र शेरखान सिकंदर शेख तसेच भोसरी येथील सर्पमित्र अमर नारायण गोडांबे यांनी आज पर्यंत वन्य पशु पक्षांच्या रक्षणासाठी विशेष कार्य करत अनेक सर्प, मोर, घुबड, बिबट, कासव यांसह आदी वन्य पशु पक्षांना जीवदान देण्याचे काम केले आहे. तर पशु पक्षांच्या रक्षणाच्या कार्यासाठी स्वतः पुढाकार घेत निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेची स्थापना करत निसर्ग सेवेची इच्छा असणाऱ्या युवकांना व्यासपीठ उपलब्ध करुन दिले आहे.

तर शेरखान शेख यांनी शालेय गरजू मुलांसाठी वही पेन वाटप, उन्हाळ्यामध्ये पक्षांना चारापाणी तसेच गोरगरिबांना कपडे वाटपाचा उपक्रम सुरु ठेवलेला असून त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय गुणीजन गौरव महापरीषद कार्यक्रमात देणारा राज्यस्तरीय आदर्श कार्यगौरव समाजरत्न पुरस्कार २०२३ हा पुरस्कार जाहीर करण्यात आला असून पुणे येथे होणाऱ्या कार्यक्रमात सदर पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे, शेरखान शेख व अमर गोडांबे यांना सदर पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांच्या मित्र परिवाराच्या वतीने त्यांचे कौतुक होत आहे.