रिक्षाचालकाचे शाळकरी मुलींसोबत विकृत चाळे, पालकांनी दिला चोप…

औरंगाबाद: मागील अनेक दिवसापासून महिला अत्याचाराच्या अनेक घटना समोर आल्या आहोत. अशीच एक घटना औरंगाबाद शहरातील नामांकित शाळेत अवघ्या 8 ते 9 वर्षाच्या तीन विद्यार्थींनींसोबत एका रिक्षाचालकाने दुसऱ्याच्या व्हॅनमध्ये बसून अश्लील संवाद साधत विकृत चाळे केल्याची घटना उघडीस आली असून धक्कादायक प्रकारानंतर घाबरलेल्या दाेन मुली तापाने फणफणल्या. या प्रकरणी आरोपीसह त्याच्या साथीदारालाही अटक करण्यात आली […]

अधिक वाचा..

समृध्दी महामार्गावरुन एसटी धावणार सुसाट…!

मुंबई: नागरिकांना जलद प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देणेसाठी (दि. 14) रोजी नागपूर ते मुंबई समृध्दी महामार्ग निर्माण करण्यात येत आहे. (दि. १1) रोजी भारताचे पंतप्रधान मा.श्री.नरेंद्र मोदी यांचे शुभहस्ते सदर महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्याचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. सदर मार्ग नागरिकांच्या प्रवासासाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. प्रवाशांना जलद व आरामदायी प्रवासाची […]

अधिक वाचा..

महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांच्या तारखा निश्चित

मुंबई: राज्यातील शहरी आणि विशेषत: ग्रामीण भागातील क्रीडा क्षेत्रातून जगातील प्रतिष्ठेच्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांच्या दर्जाचे क्रीडापटू तयार व्हावेत, या हेतूने महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांचे आयोजन १ ते १२ जानेवारी या कालावधीत करण्यात येणार आहे, अशी घोषणा महाराष्ट्र राज्याचे क्रीडामंत्री गिरीश महाजन यांनी बुधवारी केली. महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन, महाराष्ट्र शासन आणि क्रीडा व युवक संचालनालय […]

अधिक वाचा..

खसखसचे चे औषधी गुणधर्म आणि आरोग्यासाठीचे फायदे

खसखशीचं कवच खूप कठीण असतं. त्यामुळे ती दुधात किंवा पाण्यात काही तास भिजवून नंतर वाटली जाते. त्यानंतर कढईत कोरडी भाजून तिची पूड केली जाते. पाण्याबरोबर पेस्ट केली जाते. खसखशीत काही प्रमाणात ‘ई’ जीवनसत्त्व, कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह, आयोडिन, मँगनीज, मॅग्नेशिअम, तांबं, पोटॅशिअम आणि जस्त यांचं प्रमाण असतं. खसखशीच्या आवरणातील उपलब्ध तंतूंमुळे पोट साफ होण्यास मदत होते […]

अधिक वाचा..

तुरटी गुणकारी फायदे

तुरटी हिची ओळख आपल्याला लहानपणी शाळेच्या पुस्तकातून झालेली असते किंवा आपल्या घरातील पुरुष मंडळींना बऱ्याचदा दाढी केल्यानंतर अँटी सेपटीक म्हणून तिला गालावरुन फिरविताना पाहिलेले असते. तर कधी पावसाळ्यात गढूळ झालेले पाणी शुद्ध करण्यासाठी तुरटी त्या पाण्यात फिरविली जाते. इतकीच आपल्याला तुरटी विषयी माहिती असते. पण वरवर लहान दिसणारी ही चीज पार डोक्यापासून ते पायाच्या नखापर्यंत […]

अधिक वाचा..

शिरुर तहसिल कार्यालयाच्या सततच्या बंद लिप्टचे श्राद्ध घालून करणार ठिय्या आंदोलन

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर तहसील कार्यालयातील तीन मजली इमारतीमध्ये पहिल्या मजल्यावर तहसील कार्यालयाशिवाय सेतू कार्यालय, पुरवठा विभाग, दुय्यम निबंधक, दुसऱ्या मजल्यावर सामाजिक वनीकरण, अभिलेख कक्ष,सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, कृषी विभाग, संजय गांधी निराधार, अपंग योजना तर तिसऱ्या मजल्यावर ऑनलाईन कामकाज, मिटींग, नागरीकांच्या विविध केसेस चालवल्या जातात. या तीनही मजल्यावर जाण्या येण्यासाठी असणारी लिप्ट (उद्वाहन )गेल्या […]

अधिक वाचा..

देशात जातीधर्माच्या नावाखाली राजकारण सुरु; आनंदराज आंबेडकर

ऐतिहासिक विजयस्तंभाला आनंदराज आंबेडकर यांची भेट शिक्रापूर (शेरखान शेख): महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या भयानक परिस्थिती असून केंद्राचे व महाराष्ट्राचे सत्ताधारी राज्याचे काय करु पाहत आहे असा प्रश्न पडत असून देशामध्ये जातीधर्माच्या नावाखाली राजकारण चालू आहे. तसेच कर्नाटक व महाराष्ट्र राज्यामध्ये सीमावाद सुरु असून त्यामधून राज्यातील लोकांची मने दुभागत असून काही आठवड्या पूर्वी आसाम व मेघालय मध्ये […]

अधिक वाचा..

राज्यात ग्रामसेवक पदासाठी नोकर भरतीचे वेळापत्रक जाहीर…!

मुंबई: ग्रामसेवक भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. ग्रामविकास विभागाअंतर्गत जिल्हा परिषदेमार्फत ग्रामसेवकांच्या तब्बल 10,000 जागांसाठी भरती केली जाणार आहे. तसा शासन निर्णय जारी करण्यात आला असून, या भरतीसाठीचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेअंतर्गत गट-‘क’मधील सर्व संवर्गातील सरळ सेवेच्या कोट्यातील रिक्त पदांच्या 80 टक्के मर्यादेपर्यंत रिक्त पदे भरण्यास मान्यता देण्यात आली आहे. […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात सैनिक पत्नीची जमीन खरेदी करत फसवणूक

तळेगाव ढमढेरे दुय्यम निबंधक कार्यालयात केले होते खरेदीखत शिक्रापूर (शेरखान शेख): तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील दुय्यम निबंधक कार्यालय येथे एका सैनिकाच्या पत्नीला खरेदीखत करुन देत विक्री केलेल्या शेतजमिनीची महिलेच्या परस्पर अन्य व्यक्तीला विक्री करुन फसवणूक करत महिला सदर शेतात गेली असता महिलेला शिवीगाळ, दमदाटी केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे सदाशिव देवराम […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: शेअर बाजार, लॉटरीतून लाभ होण्याची शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणी पदोन्नती होण्याची शक्यता आहे. अविवाहितांना लवकरच चांगली बातमी मिळेल, लग्नासाठी स्थळ चालून येईल. वृषभ: व्यापाराच्या संबंधित व्यक्तींना मोठा लाभ होईल. नोकरीत पदोन्नतीसाठी अधिक मेहनत कराल. प्रेमी जोडीदाराकडून लग्नाचा प्रस्ताव येईल. अविवाहित व्यक्तींना लग्नाचे स्थळ मिळेल. वृषभ राशीच्या व्यक्तींनी सकाळी सूर्यदेवाला जल अर्पण करावे. मिथुन: बऱ्याच […]

अधिक वाचा..