तळेगाव ढमढेरे दुय्यम निबंधक कार्यालयात महिलेची फसवणूक

क्राईम

हवेली पंचायत समितीच्या शिक्रापूर पोलिसांत सदस्यावर गुन्हे दाखल

शिक्रापूर (शेरखान शेख): तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील दुय्यम निबंधक कार्यालयात एका महिलेच्या जमिनीचे खरेदीखत करुन घेऊन महिलेला जमिनीचे पूर्ण पैसे न देताना सदर जमिनीची अन्य व्यक्तींना विक्री करुन महिलेच्या पतीने पैसे मागील्याने महिलेच्या पतीला दमदाटी केल्याची घटना घडल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे हवेली पंचायत समितीचे सदस्य शाम गावडे याच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

बाभूळसर खुर्द (ता. शिरुर) येथे हेमलता जासूद यांची असलेली जमीन त्यांनी २०१७ मध्ये हवेली पंचायत समितीचे सदस्य शाम गावडे यांना तळेगाव ढमढेरे दुय्यम निबंधक कार्यालय येथे बावन्न लाख रुपयांना विक्री करत खरेदीखत करुन दिली होती. त्यावेळी गावडे यांनी बत्तीस लाख रुपये दिले होते तर उर्वरित 20 लाख रुपयांचे चेक दिले होते. त्यानंतर काही काळाने जासूद यांनी सदर चेक बँकेत जमा केले असता सर्व चेक रिटर्न झाले. त्यामुळे जासूद हे गावडे यांच्याकडे वारंवार पैशाची मागणी करत होते त्यामुळे गावडे हे काही दिवसांनी पैसे देतो सांगत होते मात्र गावडे यांनी घेतलेल्या जमिनिची नोंद सात बारा वर झालेली नसताना देखील त्यांनी सदर जमिनीचे प्लॉटिंग करुन अन्य लोकांना जमिनीची विक्री केली.

परंतु गावडे यांचे 20 लाख रुपये दिले नाही आणि पैसे देण्यास टाळाटाळ करु लागला. त्यामुळे हेमलता जासूद यांचे पती बाबासाहेब जासूद यांनी गावडे यांच्याकडे पैशाची मागणी केली असता गावडे यांनी त्यांना शिवीगाळ, दमदाटी केली त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने हेमलता बाबासाहेब जासूद (वय ४६) रा. कोणार्क नगर सोसायटी विमाननगर पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी हवेली पंचायत समितीचे सदस्य शाम परिमल गावडे रा. गावडेवाडी वाडेबोल्हाई ता. हवेली जि. पुणे याचे विरुद्ध गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजीत पठारे व पोलीस नाईक अमोल नलगे हे करत आहे.