श्री संत ज्ञानोबा तुकोबा यांच्या पादुका चालल्या राम भेटीला सातासमुद्रा पार दुबईला

पुणे: जगाचे केंद्रबिंदू असणारी दुबई येथे सर्वात मोठे हिंदूंचे राम मंदिर असलेल्या कार्तिकी एकादशी निमित्त श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज यांच्या पादुका या मंदिरात भेटीस जाणार असल्याची माहिती दिंडीचे कार्याध्यक्ष ॲड. शरद बांदल यांनी दिली आहे. श्री संत ज्ञानोबा तुकोबा विश्व भ्रमण दिंडीचे आयोजन करण्यात आले असुन (दि. २०) ते (दि. […]

अधिक वाचा..

शिरुर विद्याधाम प्रशालेच्या विद्यार्थ्यांची तब्बल 29 वर्षांनी स्नेह संमेलनानिमित्त भरली शाळा

शिरुर (सतिश धुमाळ): आपल्या मैत्रीची यादगार आठवण राहावी. त्याचबरोबर सामाजिक बांधिलकी व पर्यावरण संवर्धनाचा भाग म्हणुन येणाऱ्या पिढीला स्वच्छ हवा व हिरवळ अनुभवता यावी याकरिता तब्बल २९ वर्षांनी निमित्ताने एकत्रित आलेल्या शिरुर येथील विद्याधाम प्रशालाच्या सन १९९३ च्या इयत्ता १० वी च्या तुकडीतील विद्यार्थी-विद्यार्थ्यांनी ५० झाडे शहरातील डोंगरावर लावली. शहरातील शिरुर देवराई सह्याद्रीचा वतीने पुणे […]

अधिक वाचा..

महाराष्ट्रातील महिला अत्याचाराच्या घटनेवर लक्ष घालून कार्यवाही करणार…

मुंबई: महाराष्ट्रातील वसई परिसरात राहणाऱ्या श्रद्धा हत्याप्रकरणी योग्य ते लक्ष घालून कार्यवाही करण्यासाठी निर्देश दिले असल्याची माहिती आज लोकसभेचे अध्यक्ष ओम प्रकाश बिर्ला यांनी महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांना मुंबईत दिली. आज मुंबईमध्ये आलेल्या भेटी दरम्यान या विषयावर त्यांनी चर्चा केली डॉ. गोऱ्हे यांनी लोकसभेच्या अध्यक्षांना आज लेखी निवेदन दिले. तसेच महाराष्ट्रामध्ये […]

अधिक वाचा..

बाळासाहेबांची शिवसेना पुणे युवा जिल्हाप्रमुखपदी बाप्पुसाहेब शिंदे यांची नियुक्ती

रांजणगाव गणपती (तेजस फडके): रांजणगाव गणपती (ता. शिरुर) येथील सुपुत्र बाप्पुसाहेब शिंदे यांची नुकतीच बाळासाहेबांची शिवसेना पुणे युवा जिल्हाप्रमुखपदी निवड झाली असुन शिरुर-हवेली तसेच हडपसर विधानसभा मतदार संघाच्या कार्यक्षेत्रासाठी बाळासाहेबांची शिवसेना पुणे युवा जिल्हाप्रमुख म्हणून त्यांना शिवसेना उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हस्ते लांडेवाडी (ता.आंबेगाव) येथे झालेल्या बैठकीत त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. […]

अधिक वाचा..

भिम आर्मीची कामगारांबाबत डाॅंगकाॅंग कंपनीशी सकारात्मक चर्चा

रांजणगाव गणपती (तेजस फडके): भिम आर्मी भारत एकता मिशन संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सिताराम गंगावणे यांच्या मार्गदर्शनाखाली, शिरूर तालुका प्रभारी संदिप शेलार यांच्या नेतृत्वाखाली मंगळवार (दि 15) रोजी संविधानिक पध्दतीने जन आंदोलन करण्यात आले होते. रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील डाॅंगकाॅंग कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात या संघटनेने आवाज उठवला होता. यावेळी प्रकल्पग्रस्त भूमिपुत्र सामाजिक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सोमनाथ […]

अधिक वाचा..

मुखई आश्रम शाळेच्या मुलांची राष्ट्रीय बेसबॉल स्पर्धेसाठी निवड

शिक्रापूर (शेरखान शेख): मुखई (ता. शिरुर) येथील कै. रा. गे. पलांडे प्राथमिक आश्रम शाळा या शाळेच्या खेळाडूंनी जिल्हा स्तरावर पार पडलेल्या बेसबॉल स्पर्धेत यश मिळविले असल्याने या खेळाडूंची नुकतीच दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील बेसबॉल स्पर्धेसाठी निवड झाली असल्याची माहिती मुख्याध्यापक सुधीर ढमढेरे यांनी दिली आहे. मुखई (ता. शिरुर) येथील कै. रा. गे. पलांडे प्राथमिक […]

अधिक वाचा..

शिक्रापूर स्थानकात वारकऱ्यांच्या मुलभूत गरजांची वाणवा

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील एस टी स्थानकात आळंदी येथे कार्तिकी एकादशी साठी जाणाऱ्या वारकऱ्यांना सुविधा देण्यात येणार असल्याने स्थानकात मंडप टाकण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. मात्र सदर ठिकाणी वारकऱ्यांना पिण्याचे पाणी, स्वच्छता गृह यांसह आदी सुविधांची वाणवा असल्याचे दिसून येत आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथून आळंदीला जाण्यासाठी अनेक जिल्ह्यातील हजारो वारकरी येत […]

अधिक वाचा..

रांजणगाव MIDC पोलिसांनी रात्रीच्या गस्ती दरम्यान पाठलाग करत आरोपीना ठोकल्या बेड्या

रांजणगाव गणपती (तेजस फडके): रांजणगाव MIDC तील कंपनीतून गुरुवार (दि 17) रोजी रात्री 11:30 च्या सुमारास कंपनीतून कामावरून सुटून पायी चाललेल्या कामगाराला विना नंबर असलेल्या दोन दुचाकी वरुन पाच जणांनी फायटरचा धाक दाखवत त्याच्याजवळील मोबाईल चोरुन मारहाण केली होती. त्यानंतर या युवकाने पोलिस ठाण्यात धाव घेत गुन्हा दाखल केला. त्यानंतर रांजणगाव MIDC पोलिस ठाण्याचे कर्मचारी […]

अधिक वाचा..

विद्याधाम प्रशालेतील ऐतिहासिक स्मारक उद्धस्त करणाऱ्यावर कारवाई करा

शिरुर (तेजस फडके): स्वातंत्र्यपुर्व काळातील युध्दात सामिल झालेल्या योध्यांच्या स्मरणार्थ असलेले विद्याधाम प्रशालेच्या समोरील पुरातन ऐतिहासिक स्मारक बेकायदेशीरपणे उद्ध्वस्त केल्यामुळे शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांवर त्वरित गुन्हे दाखल करावे अशी मागणी बहुजन मुक्ती पार्टी शिरूर तालुका अध्यक्ष फिरोज सय्यद आणि सहयोगी संघटनांच्या वतीने तहसीलदार, पोलीस स्टेशन यांना निवेदन देऊन केली आहे. ब्रिटिशांनी पहिल्या महायुद्धामध्ये सहभागी […]

अधिक वाचा..

रांजणगाव पोलिसांचा बेशिस्त वाहनचालकांना दणका अवघ्या ९ महिन्यात ८४ लाखांचा दंड वसूल

रांजणगाव गणपती (तेजस फडके): वाहतूक नियमांचा भंग करणाऱ्या वाहन चालकांना रांजणगाव एमआयडीसी पोलिसांच्या वाहतूक विभागानं मोठा दणका दिला आहे. बेशिस्त वाहनचालकांकडून अवघ्या नऊ महिन्यात पोलिसांनी तब्बल ८४ लाखांचा दंड वसूल केला आहे. रांजणगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बलवंत मांडगे यांनी ही माहिती दिली. वाहन चालकांच्या स्वयंशिस्तीच्या अभावामुळे दिवसेंदिवस वाहन चालकांकडून मोठ्या प्रमाणात वाहतूक नियमांचे उल्लंघन […]

अधिक वाचा..