‘रांजणगाव मॅरेथॉन’ ही तर शिरुर तालुक्यातील आरोग्यप्रेमींसाठी मेजवानी: शोभाताई धारीवाल

मुख्य बातम्या

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात अनेक खेळाडूंच भवितव्य घडत असुन आरोग्य प्रेमींसाठी ‘रांजणगाव मॅरेथॉन’ ने शिरुर तालुक्यात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यामुळेच या स्पर्धेत दरवर्षी हजारो स्पर्धक सहभागी होऊन आरोग्यदायी जीवन जगण्याचा संदेश देतात. यावर्षीही या स्पर्धेची जय्यत तयारी सुरु असून कोरोनानंतर आरोग्यप्रेमी शिरुरकरांना मेजवानीचा एक वेगळा अनुभव मिळेल, असा विश्वास प्रसिद्ध उद्योजिका शोभा धारीवाल यांनी व्यक्त केला.

शिरुर हे विविध खेळांचे विशेषतः ग्रामीण खेळांचे माहेरघर आहे, पण धावपटूंसाठी उत्तम दर्जाची मॅरेथॉन होत नव्हती. ही उणीव २०१८ पासून भरून निघाली आहे. ‘आर एम धारीवाल फाउंडेशन’ शिरुरकरांच्या सहकार्याने ‘रांजणगाव मॅरेथॉन’ अत्यंत भव्य आणि शिस्तबद्ध पद्धतीने भरवली असुन २०१९ मध्येही या स्पर्धेस वाढता प्रतिसाद मिळाला. या दोन्ही स्पर्धांच्या आयोजनात मला सहभाग घेता आला असे ‘महागणपती फाउंडेशन’ चे अध्यक्ष सागर पाचुंदकर यांनी सांगितले.

यावर्षीही 11 डिसेंबर 2022 रोजी रांजणगाव गणपती येथे सकाळी सहा वाजल्यापासून मॅरेथॉनला सुरवात होणार आहे. या स्पर्धेविषयी शिरुरकरांमध्ये मोठी उत्सुकता असुन स्पर्धेत यंदाही हजारोंच्या संख्येने स्पर्धक उपस्थित राहतील असा आम्हाला विश्वास आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या धावपटूंचे जंगी स्वागत करण्यात येणार आहे. ही स्पर्धा शिरुरकरांसाठी अभिमानाची आणि गौरवाची बाब आहे. त्यामुळे ही स्पर्धा पाहण्यासाठी शिरुर तालुक्यातील नागरिक उपस्थित राहतील अशी खास व्यवस्थाही करण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले.

कोरोनानंतर आरोग्याविषयी मोठ्या प्रमाणावर जनजागृती झाली असुन शिरुरकरांनी मोठया धीराने कोरोनाचा सामना केला आहे. दोन वर्षांनंतर ही स्पर्धा होत असल्याने धावपटूंसाठी ती मेजवानी ठरणार आहे. या स्पर्धेसाठी ‘महागणपती फाउंडेशन’ यांचेही सहकार्य राहणार आहे. शिरुर तालुक्यातील विविध शाळांमधील विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी होणार असुन रांजणगाव MIDC पोलिसांचेही याकामी मोठे सहकार्य होणार आहे. हि सर्वसमावेशक स्पर्धा असल्याने या स्पर्धेत शिरुर तालुक्यातील सर्व नागरीकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग राहील, असा विश्वासही शोभाताई धारीवाल यांनी व्यक्त केला.

या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी 9595689696 आणि 9657663383 या नंबरवर संपर्क करावा. तसेच Online Registration साठी https://www.townscript.com/e/ranjangaon-marathon-2022-234204 या लिंकवर क्लिक करा.