केंद्रातील योजना नागरिकांपर्यंत पोहोचवाव्यात:- प्रल्हादसिंह पटेल

मुख्य बातम्या

शिक्रापुर (शेरखान शेख) केंद्र सरकारच्या नागरिकांसाठी असंख्य योजना असून केंद्रातील योजना भारतीय जनता पार्टी शक्ती केंद्राच्या पदाधिकाऱ्यांनी नागरिकांपर्यंत पोहोचवाव्यात असे प्रतिपादन केंद्रीय जलशक्ती मंत्री प्रल्हादसिंह पटेल यांनी केले आहे. शिक्रापुर (ता. शिरुर) येथे शिरुर लोकसभा प्रवास योजना दरम्यान भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना केंद्रीय जलशक्ती मंत्री प्रल्हादसिंह पटेल बोलत होते.

 

यावेळी माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, आमदार माधुरी मिसाळ, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, भारतीय जनता पार्टी कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष जयेश शिंदे, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक प्रदीप कंद, भारतीय जनता पार्टीचे शिरुर तालुकाध्यक्ष आबासाहेब सोनवणे, हवेली तालुकाध्यक्ष संदीप भोंडवे, पंचायत समिती सदस्य विक्रम पाचुंदकर, शाम गावडे, घोडगंगा साखर कारखान्याचे संचालक दादा पाटील फराटे, रोहिदास उंद्रे, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष रोहित खैरे, राजेंद्र मांढरे, नवनाथ सासवडे, पंढरीनाथ गायकवाड, मितेश गादिया, दादासाहेब सातव, वडगाव रासाईचे सरपंच सचिन शेलार, शिक्रापूर ग्रामपंचायत सदस्य कृष्णा सासवडे यांसह आदी उपस्थित होते.

दरम्यान यावेळी बोलताना कार्यकर्त्यांनी जबाबदारी घेतल्यानंतर ती जबाबदारी पूर्ण करण्याचा सल्ला कार्यकर्त्यांना देत आपल्या येथील निवडणूक लढायची आहे आणि निवडणूक जिंकायचीच त्या पद्धतीने कामाला लागा असे देखील त्यांनी सांगितले, यावेळी माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, शिरुर तालुकाध्यक्ष आबासाहेब सोनवणे, हवेली तालुकाध्यक्ष संदीप भोंडवे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद यांनीही मनोगत व्यक्त केले.

उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष गायब . . . 

शिरुर तालुक्यात आज केंद्रिय मंत्री आलेले असताना उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष संजय पाचंगे हे गैरहजर होते तर यापूर्वी घोडगंगा साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या प्रचार दरम्यान देखील ते कोठे दिसले नाही त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला मात्र याबाबत त्यांच्याशी संपर्क साधला असताना मी खाजगी कामाने पुण्यात असल्याचे संजय पाचंगे यांनी सांगितले.