शेतकऱ्यांची वीज कनेक्शन तातडीने पूर्ववत करा शिवसेनेची मागणी

मुख्य बातम्या

शिक्रापुर (शेरखान शेख) सध्या शेतकऱ्यांच्या शेतात पिके उभी राहत असताना विद्युत वितरण विभागाकडून कोणतीही पूर्वकल्पना न देता शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन बंद करण्यात आलेले असल्याने शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तातडीने पूर्ववत करण्याची मागणी बाळासाहेबांची शिवसेना गटाने विद्युत वितरण विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देत केली आहे.

शिक्रापूर येथील उपकार्यकारी अभियंता कार्यालयात आज बाळासाहेबांची शिवसेना गटाचे उपजिल्हा प्रमुख अनिल काशीद, शिरुर तालुका प्रमुख रामभाऊ सासवडे, उप तालुका प्रमुख संतोष वर्पे, शिवाजी नवले, शरद नवले संपत कापरे, तेजस फलके , गणेश कोतवाल, आनंदा हजारे, रोहिदास शिवले, बापूसाहेब मासळकर, सागर दरेकर, युवा सेना सोशल मिडीया तालुका प्रमुख मोहन घोलप, युवा सेना जिल्हा सरचिटणीस वैभव ढोकले, हरिदास डफळ, सत्यवान पावसे, दत्तात्रय गिलबिले, ज्ञानेश्वर फराटे, यांसह आदी उपस्थित होते. दरम्यान यापूर्वी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना कोणतेही पिक घेता आलेले नसल्यामुळे शेतकऱ्यांना कोणतेही उत्पन्न मिळालेले नाही मात्र सध्या शेतात पिके उभी राहत असताना विद्युत वितरण विभागाने अचानक कोणतीही पूर्व कल्पना न देता शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कट केल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे त्यामुळे विद्युत वितरण विभागाने शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन पूर्ववत करण्याची मागणी करण्यात आली आहे.

शिवसेना पदाधिकाऱ्यांचे निवेदन वरिष्ठ कार्यालयास पाठवून त्यांच्या भावना मांडण्यात येणार आहे मात्र शेतकऱ्यांनी देखील वीजबिल भरुन महावितरणला सहकार्य करणे अपेक्षित आहे असे विद्युत वितरण विभागाचे उपकार्यकारी अभियंता नितीन महाजन यांनी सांगितले.