जातेगावच्या महाविद्यालया समोर भांडण करणाऱ्या टोळक्यावर गुन्हे दाखल

शिरूर तालुका

शिक्रापुर (शेरखान शेख) जातेगाव बुद्रुक (ता. शिरुर) येथील श्री संभाजीराजे ज्युनियर कॉलेज समोर भांडण करणे एका टोळक्याच्या चांगलेच अंगलट आले असून भांडण करणाऱ्या प्रशांत बाळासाहेब इंगवले, ओंकार रमेश उमाप, ऋतिक बळवंत इंगवले, अमोल अशोक तांबे, संकेत संतोष सुक्रे या युवकांवर शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

शिक्रापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव पवार, पोलीस नाईक राकेश मळेकर, आत्माराम तळोले, किशोर शिवणकर हे पेट्रोलिंग करत असताना त्यांना जातेगाव बुद्रुक येथील संभाजीराजे ज्युनियर कॉलेज समोर रस्त्यावरच सार्वजनिक ठिकाणी काही युवक एकमेकांशी वाद घालून शिवीगाळ करत भांडण करत असल्याचे दिसले. दरम्यान पोलिसांनी सदर युवकांना ताब्यात घेतले. याबाबत शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस शिपाई किशोर उत्तम शिवणकर (वय ३०) रा. शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली.

त्यामुळे शिक्रापूर पोलिसांनी प्रशांत बाळासाहेब इंगवले, ओंकार रमेश उमाप, ऋतिक बळवंत इंगवले तिघेही (रा. जातेगाव बुद्रुक ता. शिरुर जि.पुणे) मयूर रावसाहेब रुके (रा. गणेगाव खालसा ता. शिरुर जि. पुणे) अमोल अशोक तांबे, संकेत संतोष सुक्रे दोघेही (रा. बहुळ ता. खेड जि. पुणे) यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक बापू हडागळे हे करत आहेत.