crime

शिरुर तालुक्यात एका व्यक्तीस आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल

शिक्रापुर (योगेश शेंडगे) शिरुर तालुक्यातील निमगाव म्हाळुंगी येथील शेतकरी संतोष सुभाष चौधरी यांनी विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या केली असुन या प्रकरणी शिक्रापुर पोलिस स्टेशन येथे आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी नऊ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत शिक्रापुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार निमगाव म्हाळुंगी येथील नवनाथ शिवाजी भोरडे याने शिक्रापुर पोलिस स्टेशनला एक फिर्याद दिली होती. […]

अधिक वाचा..

शिरुर; शेतकऱ्याचे महाडीबीटी योजनेतील 24 हजार अनुदान वर्षभरातही सरकारला देता येईना…

शिरुर (तेजस फडके) सध्या राज्यात लोकसभेची रणधुमाळी चालु असुन मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी किती चांगल्या योजना राबविल्या हे भाजपासहीत महायुतीचे मित्रपक्ष सांगत आहेत. परंतु शिरुर तालुक्यातील गुनाट गावातील भाऊसाहेब मच्छिंद्र भगत यांच्या पेरणी यंत्राचे शासकीय अनुदान 353 दिवस म्हणजे जवळपास 12 महिने उलटुन गेले तरी अद्यापपर्यंत जमा न झाल्याने सरकारकडे शेतकऱ्याला देण्यासाठी 24 हजार रुपये नसावेत […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील पिंपरखेड येथे पाण्यातून विषबाधा ९ शेळ्यांसह ५ मेंढ्यांचा मृत्यू…

शिरुर (अरुणकुमार मोटे) एकीकडे दुष्काळाच्या झळा तीव्र होत असताना शिरुर तालुक्यातील पिंपरखेड येथे तहानलेल्या शेळ्या मेंढ्यानी शेतात साचलेले पाणी पिल्याने विषबाधा होऊन मेंढपाळ अंकुश सोमा कोकरे यांच्या ९ शेळ्या व ५ मेंढ्या मृत्युमुखी पडल्याची घटना घडली आहे. तसेच मलठण येथे उष्माघाताने ४ शेळ्यांचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी ( दि ३) घडली होती. या दुर्दैवी घटनेने […]

अधिक वाचा..

शिरुर लोकसभा मतदारसंघात सर्वपक्षीय कार्यकर्त्यांमध्ये निरुत्साह कोणता झेंडा घेऊ हाती अशीच अवस्था

कान्हूर मेसाई (सुनिल जिते) सर्वत्र लोकसभेची धामधूम सुरु असताना चौथ्या टप्प्यात शिरुर लोकसभा मतदारसंघासाठी मतदान होत असुन मतदानाला दहा दिवस शिल्लक आहेत. असे असतानाही शिरुर तालुक्यात निवडणुकीबाबत उत्साह दिसत नाही. प्रचारासाठी बराच कालावधी दोन्ही उमेदवारांना मिळाला असला तरी कार्यकर्ते व मतदारांमध्ये उत्साह नाही. त्याचे एक कारण म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका न होणे हे होय […]

अधिक वाचा..

Video; ट्रेलर बघताच आढळराव पाटलांची बोलती बंद असं का म्हणाले अमोल कोल्हे…?

शिरुर (तेजस फडके) शिरुर लोकसभेच्या मतदारसंघात महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांमध्ये चांगल्याच शाब्दिक चकमकी रंगल्यात. महायुतीचे उमेदवार माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी डॉ. अमोल कोल्हे यांनी केलेल्या आरोपांचे पुरावे सादर करण्याच आव्हान दिलं होतं. त्यावर पुराव्यांचा ट्रेलर दाखवल्यावर आढळराव पाटलांनी हा आपल्याला घेरण्याचा प्रयत्न असल्याचं सांगत, कोल्हेंच्या कोणत्याच आरोपांना उत्तर देणार नसल्याचं सांगितलं. त्यावर […]

अधिक वाचा..

वाघाळे येथे वृद्ध महिलेला लोखंडी रॉडने मारहाण केल्याप्रकरणी एक जणावर गुन्हा दाखल

कारेगाव (प्रतिनिधी) वाघाळे (ता.शिरुर) येथील एका वृद्ध महिलेला मारहाण केल्याप्रकरणी गावातीलच भगवान दत्ताञय दंडवते यांच्यावर लोखंडी राँडने मारहाण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला असुन त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असल्याचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी सांगितले.   याबाबत रांजणगाव एमआयडीसी पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार भगवान दंतोबा दंडवते याने २ मे […]

अधिक वाचा..

Video; केंद्र सरकारने शेतक-याच्या ताटात माती कालवली; अमोल कोल्हे

शिरुर (तेजस फडके) केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी उठवली पण ४० टक्के निर्यातशुल्क आकारुन शेतक-याच्या ताटात माती कालविल्याचे काम सरकारने केलं अशा शब्दात महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार डॉ अमोल कोल्हेंनी केंद्र सरकारच्या कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर हल्लाबोल केलाय. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार खासदार डॉ अमोल कोल्हे आज (दि 3) शिरुर तालुक्याच्या दौऱ्यावर […]

अधिक वाचा..

कवठे येमाई आरोग्य केंद्रात ‘डॉक्टर दाखवा बक्षीस मिळवा’ वैतागलेल्या ग्रामस्थांनी ठोकले आरोग्य केंद्राला टाळे

शिरुर (अरुणकुमार मोटे) कवठे येमाई (ता.शिरुर) येथील आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी नियमितपणे उपलब्ध राहत नसल्याने रुग्णांची मोठ्या प्रमाणावर हेळसांड होत आहे. वारंवार होणाऱ्या या प्रकारामुळे नागरिक पुरते वैतागले आहे. त्यामुळे आरोग्य केंद्रात डॉक्टर दाखवा बक्षीस मिळवा अशी चर्चा नागरीक करत असुन या सर्व प्रकारामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी प्राथमिक आरोग्य केंद्राला टाळे ठोकले आहे.   मंगळवार […]

अधिक वाचा..
Adhalrao Patil Amol Kolhe

करंदी गावातील कार्यकर्त्यांना नोटीसा; शिवाजीराव आढळराव यांच्या आडुन नक्की वार करतंय कोण…?

शिरुर (तेजस फडके) शिरुर लोकसभा मतदारसंघात सध्या लोकसभा प्रचार शिगेला पोहचला असुन कार्यकर्त्यांनी आपल्या सभेत काही गोंधळ घालु नये यासाठी करंदी (ता. शिरुर) येथील डॉ. अमोल कोल्हे यांच्या कार्यकर्त्यांना त्यांच्याच गावात आढळरावांच्या प्रचार दौऱ्यात उपस्थित राहण्यापासून नोटीस देऊन परावृत्त करण्यात आले. त्यामुळे शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या आडून दुसरंच कोणीतरी वार तर करत नाही ना अशा […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील टाकळी हाजी येथे किराणा दुकान आगीच्या भक्ष्यस्थानी तब्बल 26 लाखाचे नुकसान

शिरुर (अरुणकुमार मोटे) टाकळी हाजी (ता.शिरुर) येथे सागर किराणा स्टोअर्स या दुकानाला आज गुरुवार (दि.२) रोजी पहाटेच्या सुमारास शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आग लागली.आग लागल्याने मोठ्या प्रमाणात किराणा माल व दुकानातील साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले असुन या दुर्दैवी घटनेत सुमारे 26 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.   टाकळी हाजी येथील दत्तात्रय नानाभाऊ कांदळकर यांच्या दुकानाला आज […]

अधिक वाचा..