Adhalrao Patil Amol Kolhe

शिपायाच्या नावावर ९५ लाखाचं कर्ज, मॅनेजरच्या नावावरही कोटींचं कर्ज भैरवनाथ पतसंस्थेत नेमकं चाललंय काय…?

शिरुर (तेजस फडके) शिरुर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार आणि महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या भैरवनाथ सहकारी पतसंस्थेत चाललेल्या गैरप्रकारांचा पाढा खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी वाचून पतसंस्थेच्या ठेवीदारांना सावध केले आहे. पतसंस्थेत शिपायाची नोकरी करणाऱ्या आणि आढळराव पाटलांचा सोशल मीडियावर प्रचार करणाऱ्या एका व्यक्तीच्या नावावर तब्बल ९५ लाखांचं कर्ज त्यांच्याच संस्थेतून दिल्याच्या चर्चा असल्याचे […]

अधिक वाचा..

मला दम देण्यापेक्षा दादांनी कांद्याला आणि दुधाला चांगला बाजारभाव द्यावा; अशोक पवारांचं प्रत्युत्तर

शिरुर (तेजस फडके) अजित पवार हे फार मोठे नेते आहेत. मी फार छोटा कार्यकर्ता आहे. मला दम देण्यापेक्षा अजित पवारांनी कांद्याला चांगला बाजार द्यावा. दुधाचे दर वाढवुन द्यावेत. मी शरद पवार साहेबांवर प्रेम करणारा कार्यकर्ता आहे. मी साहेबांसोबत गेलो म्हणुन जर तुम्ही या थराला जात असाल तर ते योग्य आहे का…? हे जनता ठरवेल असं […]

अधिक वाचा..

‘अरे पठ्या तु आमदारचं कसा होतो ते बघतो’… अजित पवारांचं अशोक पवारांना खुलं आव्हान

न्हावरे (तेजस फडके) महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच पुण्याचे पालकमंत्री अजित पवार हे सध्या शिरुर लोकसभा मतदारसंघांचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ वेगवेगळ्या ठिकाणी सभा घेत असुन आज (दि 8) रोजी दुपारी शिरुर आणि त्यानंतर न्हावरे येथील सभेत त्यांनी शिरुर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्यावर सडकून टिका केली. तसेच घोडगंगा साखर कारखाना बंद पाडायला मला […]

अधिक वाचा..

जागरुक आणि चांगल काम करणारा लोकप्रतिनिधी असेल तर प्रश्न सुटतात; शरद पवार

शिरुर (तेजस फडके) राजकारण करत असताना सत्ता आवश्यक असते असे नाही. सत्ता नसताना ही जागरुक पणे काम करणारा लोकप्रतिनिधी असेल तर प्रश्न सुटतात. विकास कामांसाठी निधी आणण्यासाठी सत्तेत जावे लागते असे काही जण म्हणतात. पण चांगलं काम करणारा व जागरुक लोकप्रतिनिधी असेल तर प्रश्न सुटत असतात असे प्रतिपादन शरदचंद्र पवार राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते व माजी […]

अधिक वाचा..

आढळरावांनी बाळासाहेबांशी गद्दारी केली, शिवसैनिक त्यांना माफ करणार नाही; सचिन अहिर

वाघोली (प्रतिनिधी) शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मजबूत असुन या दोन्ही तालुक्यात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचे जाळे पसरलेले आहे. त्यामुळे शिरुर-हवेलीत एकनिष्ठ, स्वाभिमानी पदाधिकारी, कार्यकर्ते आहेत. या कार्यकर्त्यांनी आता जागृत राहून गद्दारांना त्यांची जागा दाखवण्याची वेळ आली असल्याची टिका शिवसेना (उबाठा) पक्षाचे नेते तथा पुणे जिल्हा संपर्कप्रमुख सचिन अहिर यांनी केली. . दरम्यान आढळरावांनी […]

अधिक वाचा..

इंडिया आघाडी अतिरेक्यांची भाषा बोलू लागली; देवेंद्र फडणवीस

शिरुर (तेजस फडके) शिरुर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारासाठी शिरुर येथे मंगळवार (दि 7) आयोजित केलेल्या सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इंडिया आघाडी आता अतिरेकी कसाबची भाषा बोलू लागली असल्याचे म्हटले आहे अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वडेट्टीवारांना टोला लगावला. वडेट्टीवार हे पाकिस्तानची भाषा बोलत आहेत. आमची महायुती मात्र कसाबला फाशीची […]

अधिक वाचा..

Video; गेले दहा वर्ष तुम्ही आम्हाला फसवताय, पाबळच्या युवकाने आढळराव यांना पाणी प्रश्नावर घेरलं…

शिरुर (तेजस फडके) ‘गेले दहा वर्ष तुम्ही आम्हाला फसवत आहात. तुम्ही १५ वर्षे खासदार असताना आमच्या गावाला पाणी मिळण्यासाठी काय केलं याचं उत्तर द्या’ असं म्हणत पाबळ (ता. शिरुर) येथील अजित जाधव या युवकाने माजी खासदार आढळराव पाटील यांना भर चौकात चांगलच घेरलं. माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे पाबळ (ता. शिरुर) गावात प्रचारासाठी गेले […]

अधिक वाचा..

शिरुर ग्रामीण मध्ये डॉ अमोल कोल्हे यांच्या प्रचारासाठी कार्यकर्ते मैदानात

शिरुर (तेजस फडके) शिरुर लोकसभेचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ शिरुर ग्रामीण, बाबुरावनगर तसेच रामलिंग या भागात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे कार्यकर्ते जोरदार प्रचार करत असुन मतदारांच्या प्रत्यक्ष गाठीभेटी घेण्यावर त्यांनी भर दिला आहे. डॉ अमोल कोल्हे हे उच्चशिक्षित असुन सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नासाठी त्यांनी सातत्याने संसदेत आवाज उठवला आहे. सध्या […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात पोलिसांनी छापा टाकत दोन गांजा विक्रेते तसेच गांजा ओढणाऱ्या दोन जणांवर केली कारवाई

कारेगाव (तेजस फडके) रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन हद्दीतील औ‌द्योगीक वसाहतीमध्ये काही ठिकाणी अवैधरीत्या गांजाची चोरुन विक्री होत असल्याबाबत माहिती पोलीस निरक्षक महादेव वाघमोडे यांना प्राप्त झाली होती. त्यानुसार रांजणगाव तसेच कारेगाव या दोन ठिकाणी छापा टाकुन पोलिसांनी दोन गांजा विक्री करणाऱ्या व्यक्ती तसेच दोन गांजा ओढणाऱ्या व्यक्तीवर कारवाई केली आहे.   रांजणगाव MIDC पोलिस स्टेशन […]

अधिक वाचा..
crime

शिरुर तालुक्यात एका व्यक्तीस आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल

शिक्रापुर (योगेश शेंडगे) शिरुर तालुक्यातील निमगाव म्हाळुंगी येथील शेतकरी संतोष सुभाष चौधरी यांनी विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या केली असुन या प्रकरणी शिक्रापुर पोलिस स्टेशन येथे आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी नऊ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत शिक्रापुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार निमगाव म्हाळुंगी येथील नवनाथ शिवाजी भोरडे याने शिक्रापुर पोलिस स्टेशनला एक फिर्याद दिली होती. […]

अधिक वाचा..