माहेर संस्थेचे काम समाजाला दिशादर्शक; अशोक पवार

शिक्रापूर (शेरखान शेख): वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथील माहेर संस्था गेल्या 26 वर्षांपासून सामाजिक विकासांचे काम विविध प्रकल्पाच्या माध्यमातून करत असून माहेर संस्थेचे काम समाजाला दिशा देणारे तसेच दिशादर्शक असल्याचे प्रतिपादन शिरुर हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी केले आहे. वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथील माहेर संस्थेच्या सव्वीसव्या वर्षापन दिनाच्या निमित्ताने आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार […]

अधिक वाचा..

शिक्रापुरात इकोग्राम सोसायटीच्या सुरक्षा रक्षकांना मारहाण

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील इकोग्राम सोसायटीच्या सुरक्षा रक्षकांना दोघा युवकांकडून मारहाण करण्यात आल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन संतोष खोमणे व सनी पाटील या दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील इकोग्राम सोसायटीचे सुरक्षा रक्षक अनिल सोनकुसरे हे सोसायटीच्या गेटवर असताना रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास संतोष खोमणे सोसायटीमध्ये […]

अधिक वाचा..

जांबुत सहकारी सोसायटीचे संचालक नाथा जोरी यांचे संचालकपद बरखास्त…

शिरुर (अरुणकुमार मोटे): जांबुत (ता. शिरुर) येथील जांबुत सहकारी संस्थेचे विद्यमान संचालक नाथा देवराम जोरी यांचे पद बरखास्त झाले आहे. तसा आदेश, शिरुर सहकारी संस्थांचे सहाय्यक निबंधक एस. एस. कुंभार यांनी (दि. १२) जानेवारी २०२३ रोजी दिला आहे. या आदेशात दिलेल्या माहितीनुसार, जांबुत सहकारी सोसायटीची सन २०२२ ते २०२७ या पंचवार्षिक कालावधीसाठी काही महिन्यांपूर्वी निवडणूक […]

अधिक वाचा..

शिक्रापूर सोसायटीच्या चेअरमनवर गुन्हा दाखल

शेतकऱ्याचा रस्ता तहसीलदारांचे आदेश डावलून अडवला  शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील शेतकऱ्याच्या शेताचा रस्ता तहसीलदारांचे आदेश डावलून जेसीबीच्या सहाय्याने खोदून अडवल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे शिक्रापूर सोसायटीचे माजी चेअरमन दत्तात्रय रावसाहेब मांढरे व बाळासाहेब आण्णासाहेब मांढरे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील नितीन खेडकर यांनी […]

अधिक वाचा..

तृतीयपंथीना समाजात स्थान मिळणे गरजेचे; लुसि कुरियन

शिक्रापूर (शेरखान शेख): तृतीयपंथी लोकांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टीकोण वेगळा असून तृतीयपंथीना देखील समाजात स्थान मिळून त्यांना ताठ मानेने जगता आपले पाहिजे, असे मत माहेर संस्थेच्या संस्थापिका लुसि कुरियन यांनी व्यक्त केले आहे. वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथील माहेर संस्थेच्या वतीने नुकतेच तृतीयपंथी लोकांसाठी स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना माहेर संस्थेच्या संस्थापिका लुसि कुरियन […]

अधिक वाचा..

दिलीप थोरात यांची चेअरमन तर विश्वनाथ कारकूड यांची व्हाईस चेअरमनपदी निवड!

वाघाळेः वाघाळे विविध विकास कार्यकारी सेवा सोसायटी चेअरमन पदी दिलीप मच्छिंद्र थोरात तर व्हाईस चेअरमनपदी विश्वनाथ कारकूड यांची बिनविरोध निवड झाली आहे. वाघाळे येथे आज (गुरुवार) सोसायटी चेअरमन व व्हाईस चेअरमन पदासाठी निवडणूक घेण्यात आली. चेअरमन बबनराव भोसले व व्हाईस चेअरमन बाळू थोरात यांनी इतरांना संधी मिळावी या हेतूने आपापल्या पदांचे राजीनामे दिले होते. आज […]

अधिक वाचा..

समाजात असलेली अंधश्रद्धा हिच महिलांवरील अत्याचाराचे मूळ: रुपाली चाकणकर

पुणे: महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसांपासून महिलांवर तसेच मुलींवर जादूटोण्याच्या माध्यमातून अत्याचार केल्याच्या घटना घडत आहेत. काही दिवसांपूर्वी मुलीच्या शरीरात दुष्ट आत्म्याने प्रवेश केला आहे असे सांगत एका मांत्रिकाने त्या मुलीलाच जीवे मारण्याचा देखील सल्ला दिला होता. यावरुन पालकांनी आपल्या पोटच्या सहा वर्षीय मुलीची हत्या केली. तसेच औरंगाबाद येथे एक भोंदूबाबा डोक्यावर हात ठेऊन आजार बरे […]

अधिक वाचा..