तृतीयपंथीना समाजात स्थान मिळणे गरजेचे; लुसि कुरियन

शिरूर तालुका

शिक्रापूर (शेरखान शेख): तृतीयपंथी लोकांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टीकोण वेगळा असून तृतीयपंथीना देखील समाजात स्थान मिळून त्यांना ताठ मानेने जगता आपले पाहिजे, असे मत माहेर संस्थेच्या संस्थापिका लुसि कुरियन यांनी व्यक्त केले आहे.

वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथील माहेर संस्थेच्या वतीने नुकतेच तृतीयपंथी लोकांसाठी स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना माहेर संस्थेच्या संस्थापिका लुसि कुरियन बोलत होत्या. याप्रसंगी माहेर संस्थेच्या अध्यक्षा हिराबेगम मुल्ला, व्यवस्थापक रमेश दुतोंडे, विजय तवर, सर्पमित्र अभिजित वाघमारे, तृतीयपंथी संघटनेच्या माधुरी बन, रिया, विजया, वैशाली, रिया शिंदे, राजकुमारी, आकांक्षा, हरिष अवचर, आनंद सागर, सुमित इंगळे, रमेश चौधरी, अमोल त्रिभुवन, वृषाली चव्हाण, वर्षा भुजबळ, रुपाली त्रिभुवन, मिनी चेची, प्रशांत गायकवाड, रेश्मा अदमाने, मनीषा शिंदे, दिपाली निकुरे, लीना माथेव यांसह आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना तृतीयपंथी व्यक्तींमधून देखील अनेक जण सध्या वेगवेगळ्या पदांवर कार्यरत आहेत, तसेच आपल्या परिसरातील अशा लोकांना आपण पाठबळ दिल्यास ते देखील उत्तम प्रकारे स्वतःचे अस्थित्व निर्माण करुन स्वावलंबी बनू शकतात व त्यासाठी आपण माहेरच्या माध्यमातून पुढील काळात प्रयत्नशील राहणार असल्याचे देखील माहेर संस्थेच्या संस्थापिका लुसि कुरियन यांनी सांगितले.

यावेळी बोलताना आमच्या सारख्या तृतीयपंथी व्यक्तींना माहेरच्या वतीने सन्मानित करण्यात आल्याचा आनंद होत असून समाजात अशी प्रेरणा मिळाल्यास आम्हाला स्फूर्ती मिळू शकते असे मत माधुरी बन यांनी व्यक्त केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश दुतोंडे यांनी केले तर प्रास्ताविक हिराबेगम मुल्ला यांनी केले आणि विजय तवर यांनी आभार मानले.