माहेर संस्थेचे काम समाजाला दिशादर्शक; अशोक पवार

शिरूर तालुका

शिक्रापूर (शेरखान शेख): वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथील माहेर संस्था गेल्या 26 वर्षांपासून सामाजिक विकासांचे काम विविध प्रकल्पाच्या माध्यमातून करत असून माहेर संस्थेचे काम समाजाला दिशा देणारे तसेच दिशादर्शक असल्याचे प्रतिपादन शिरुर हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी केले आहे.

वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथील माहेर संस्थेच्या सव्वीसव्या वर्षापन दिनाच्या निमित्ताने आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार अशोक पवार यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा नियोजन समितिचे माजी सदस्य पंडित दरेकर, सरपंच राहुल गव्हाणे, ग्रामपंचायत सदस्य संजय भंडारे, वंदना गव्हाणे, पोलिस पाटील मालती गव्हाणे, पांडुरंग अरगडे, मीनाक्षी कुमारी, विदेशी पाहुणे उरली के, मरियास, जोहान, डेव्हिड, माहेर संस्थेच्या संस्थापिका लुसी कुरियन, अध्यक्षा हिराबेगम मुल्ला, संचालक योगेश भोर, सहसंचालक रमेश दुतोंडे, हरिश अवचर, प्रकाश कोठावळे, आनंद सागर, मिनी एम जे, अनिता दुतोंडे, संजय इंगळे, वृषभ खडसे, सुमेध ताकसंडे, विजय तवर, विनायक गाडे, नंदू भोर, विशाल सैंदाणे, सुमित इंगळे, सरिता दुपारे, वैशाली कारपे यांसह आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना माहेर संस्थेच्या माध्यमातून कार्य करत असताना लुसि कुरियन यांना अनेक अडचणी आल्या. मात्र त्यावर मात करत त्यांनी संस्थेचे तब्बल 7 राज्यात आणि महाराष्ट्रातील 6 जिल्ह्यात जाळे पसरवून वेगळ्या पध्दतीने काम सुरु ठेवले असताना. त्या संस्था फक्त काम करत नाही तर इतर संस्थाना कश्या पध्दतीने काम करावे या प्रकारचा आदर्श समाजासह इतर संस्था समोर ठेवत असल्याचे देखील आमदार अशोक पवार यांनी सांगितले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र साकोरे यांनी केले तर शार्ली अँथोनी यांनी आभार मानले.