मी संस्थानिकांचा, राजा महाराजांचा मुलगा नाही; जयकुमार गोरे

सातारा: प्रत्येक जण आपला पक्ष वाढवण्यासाठी काम करत असतो. मी माझा पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न करतोय तसाच ते देखील करत आहेत. मात्र, कोणी असुरक्षित वाटून घेण्याचे कारण नाही. कोण किती मतांनी निवडून आले आहे ते निवडणूक आयोग व तुम्हालाही माहीत आहे. मी संस्थानिकांचा मुलगा नाही, मी राजा महाराजांच्या कुटुंबातून आलेलो नाही, सामान्य शेतकर्‍याचा पोरगा म्हणून मी […]

अधिक वाचा..

जमीन विकण्यास विरोध केल्याने आईचा खून करून मुलानेही संपवले जीवन

लातूर: जमीन विकून मुलीच्या लग्नाचे कर्ज फेडण्यासाठी विरोध करणाऱ्या वयोवृद्ध आईची ६ जुलै रोजी हत्या केल्यानंतर मृतदेह पोत्यात बांधून स्वतःच्या शेतातील उसाच्या फडात पुरला. त्यानंतर मुलानेही गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी (दि.७) रेणापूर पिंपळफाटा येथे घडली होती. या प्रकरणी रेणापूर पोलिसांनी गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या मयताविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, त्या अनुषंगाने रेणापूर पोलिस […]

अधिक वाचा..

शिरूरमध्ये महिला व तीन वर्षांचा मुलगा बेपत्ता; पतीने दिली शिरूर पोलीस ठाण्यात तक्रार

शिरूर ( अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील शिवरत्न सोसायटी, शिक्षक कॉलनी येथून एका महिलेने आपल्या तीन वर्षांच्या मुलासह कोणतीही पूर्वसूचना न देता घर सोडल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात मिसिंगची नोंद करण्यात आली असून, पोलीस तपास सुरु आहे. शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुजा मंगेश जौंजाळ (वय २६) व तिचा मुलगा सम्यक मंगेश […]

अधिक वाचा..

एकनाथ खडसेंवर मुलाच्या हत्येचे आरोप; निखील खडसेंनी स्वत:वर गोळी झाडली तेव्हा नक्की काय घडल

पुणे: राज्याच्या राजकारणातील बडे नेते, माजी मंत्री असलेले एकनाथ खडसे यांच्यावरती सातत्याने त्यांच्या मुलाच्या म्हणजेच निखिल खडसेंच्या हत्येचे आरोप होत असतात. पण वडिलांवरच मुलाला संपवल्याचे का आरोप का होतात. निखील खडसेंसोबत त्या दिवशी काय घडलं होतं? याबाबतचे खुलासे राष्ट्रवादी काँग्रेस शरददचंद्र पवार पक्षाच्या नेत्या रोहिणी खडसेंनी केले आहेत. निखिल दादा बेडवरती पडला होता, रक्त वाहत […]

अधिक वाचा..

लेकाच्या मृत्यूबद्दल बोलताना नाना पाटेकर म्हणाले

नाना पाटेकर यांचा मोठा मुलगा दुर्वासा अडीच वर्षांचा असताना गेला. डोळ्यांच्या समस्येमुळे मुलाचं जगणं कठीण होतं, तरी नाना पाटेकर लोक काय म्हणतील याचा विचार करत राहिले. अभिनेते नाना पाटेकर यांचा मोठा चाहतावर्ग आहे. त्यांनी आपल्या अभिनयातून चाहत्यांच्या मनात एक वेगळीच छाप पाडली आहे. ते त्यांच्या वयक्तिक आयुष्याबद्दल नेहमीच स्पष्ट बोलताना पहायला मिळतात. यावेळी त्यांनी त्यांच्या […]

अधिक वाचा..

माजी पोलिस पाटलांचा मुलगा; पण एका घटनेमुळे सूरज चव्हाणांच्या राजकारणाला ‘ब्रेक’

मुंबई: कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंचा निषेध करत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्यापुढे पत्ते फेकणारे छावा संघटनेचे पदाधिकारी विजय घाटगे यांना बेदम मारहाण करणारे सूरज चव्हाण यांच्याकडून राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा घेण्यात आला आहे. या मारहाणीनंतर सूरज चव्हाण कोण आहेत, त्यांची राजकीय वाटचाल याबाबत उत्सुकता आहे. एका माजी पोलिस पाटलांचा मुलगा… निरंजन डावखरेंच्या माध्यमातून […]

अधिक वाचा..

शेतकरीपुत्राने तयार केल ऊसभरणी यंत्र; अवघ्या ४५ मिनिटांत उसाचा एक ट्रेलर भरणार

सातारा: दरवर्षीच गाळप हंगामात उसाच्या वाहतुकीची मोठी समस्या असते. कारण, कामगार टंचाईमुळे ऊस वाहतूक वेळेत होत नाही. परिणामी साखर कारखान्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. ही समस्या लक्षात घेऊन सातारा तालुक्यातील रामकृष्णनगरच्या सनी दिलीप काळभोर या शेतकरीपुत्रानेऊस भरणी यंत्राची निर्मिती केली आहे. या यंत्राद्वारे दिवसात ७० ते ७५ टन ऊस भरला जात आहे. सातारा जिल्ह्यात १५ […]

अधिक वाचा..

विळ्याने वार करून सावत्र आईचा खून करून मुलाचा आत्महत्येचा प्रयत्न…

संभाजीनगर: कौटुंबिक शेतजमिनीच्या वादातून ४८ वर्षीय सावत्र आईची ३३ वर्षांच्या मुलाने धारदार विळ्याने गळा चिरून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी सकाळी अगरसायगाव येथे घडला. आशाबाई घमाजी जाधव (रा. अगरसायगाव, ता. वैजापूर) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. रागात आईची विळ्याने हत्या केल्यानंतर मुलाने विहिरीत उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, नागरिकांनी त्याला सुखरूपपणे बाहेर […]

अधिक वाचा..

शिक्रापूर ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा मुलगा बनला पोलीस

भटक्या समाजातील युवकाने दिला युवकांना अनोखा संदेश शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथे अनेक दिवसांपूर्वी भटक्या समाजातून वास्तव्यास आलेल्या परिवारातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा मुलगा रोहित तुळजाराम माने परिस्थितीवर मात करत पोलीस दलात भरती झाला, तर भटक्या समाजातील युवकाने जिद्दीचा अनोखा संदेश दिला असल्याने त्याच्यावर परिसरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथे भटक्या गोंधळी […]

अधिक वाचा..

तुझ्या मुलाला मारुन टाकेन अशी धमकी देत महीलेवर केला बलात्कार

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर येथील एका महीलेशी लगट करुन तिला तुझ्या नव-याला आपल्यातील संबंध सांगेन, तुझ्या मुलाला मारुन टाकेन, अशी धमकी देवून तिच्यासोबत इच्छेविरुध्द जबरदस्तीने वारंवार शारीरिक संबंध ठेवून बलात्कार केला आहे. या प्रकरणीआरोपी आकाश हिवाळे रा. बुलढाणा याच्यावर शिरुर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत सविस्तर हकीकत अशी की, ऑक्टोंबर, 2022 व […]

अधिक वाचा..