‘दादा… तुम्ही नाही, हे मन आजही मानायला तयार नाही’; सुनेत्रा पवार भावुक

बारामती: “दादा… तुम्ही नाही, असं मन आजही मानायला तयार नाही,” अशा भावनिक शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. सुनेत्रा पवार यांनी आज बारामतीतील विद्या प्रतिष्ठान येथील अजित पवार यांच्या स्मृतीस्थळी जाऊन नतमस्तक होत आदरांजली वाहिली. यावेळी मनात साठलेल्या भावना त्यांनी ‘एक्स’वरील पोस्टद्वारे व्यक्त केल्या. “आठ महिने झाले… […]

अधिक वाचा..

‘मी मराठवाड्याची लेक; तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही’; सुनेत्रा पवार

शेतशिवाराची पाहणी; बळीराजाच्या बांधावर जाऊन जाणून घेतल्या अडचणी नांदेड: ‘मी मराठवाड्याची लेक आहे’… या मातीतल्या शेतकऱ्यांच्या अडचणी मला समजतात…कोणत्याही शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार नाही असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी शेतकऱ्यांना दिला. दरम्यान शेतकऱ्यांच्या लेकरा-बाळांचे शिक्षण… जनावरांचा चारा आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्नही शासनासाठी तितकाच महत्त्वाचा आहे असेही सुनेत्रा पवार यांनी […]

अधिक वाचा..

दुष्काळाच्या संकटामुळे राष्ट्रवादीचे २७ सप्टेंबरचे राज्यव्यापी शिबीर पुढे ढकलले; सुनेत्रा पवार यांचा निर्णय

१९ जिल्ह्यांतील पीक, चारा आणि पाणीस्थिती चिंताजनक; परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर शिबीर घेण्याची भूमिका मुंबई : राज्यातील १९ जिल्ह्यांमध्ये पावसाचा मोठा खंड पडल्याने दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे २७ सप्टेंबर रोजी नाशिक येथे आयोजित करण्यात आलेले एकदिवसीय राज्यव्यापी शिबीर पुढे ढकलण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी […]

अधिक वाचा..

दुष्काळाच्या संकटातून बळीराजाची सुटका कर, शेतशिवार पुन्हा हिरवेगार होऊ दे; सुनेत्रा पवार

मुंबई : राज्यात निर्माण झालेल्या कोरड्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आज सकाळी मुंबईतील प्रसिद्ध लालबागच्या राजाचे सहकुटुंब दर्शन घेतले. यावेळी त्यांनी राज्यातील शेतकरी बांधवांसाठी विघ्नहर्त्या गणरायाच्या चरणी प्रार्थना केली. राज्यातील बळीराजावर आलेले दुष्काळाचे संकट दूर व्हावे, शेतकऱ्यांच्या पिकांना मुबलक पाणी मिळावे, शेतशिवार पुन्हा हिरवेगार व्हावे आणि […]

अधिक वाचा..

दुष्काळसदृश्य परिस्थितीत शेतकऱ्यांच्या बांधावर जा; सुनेत्रा पवारांचे पक्ष पदाधिकाऱ्यांना सक्त निर्देश

मुंबई: राज्यातील दुष्काळसदृश्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांनी पक्षातील सर्व मंत्री, पालकमंत्री, खासदार, आमदार, माजी आमदार तसेच प्रमुख पदाधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष नुकसानाची पाहणी करण्याचे स्पष्ट आणि सक्त निर्देश दिले आहेत. राज्यातील विविध भागांत पावसाअभावी शेतीपिकांवर संकट निर्माण झाले असून, या पार्श्वभूमीवर पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी केवळ कार्यालयीन […]

अधिक वाचा..

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान महाराष्ट्रातील विविध विषयांसह राज्यात सुरू असलेल्या विकासकामांवर सविस्तर चर्चा झाली.यावेळी नितीन नबीन यांनी दिवंगत अजित पवार यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर सुनेत्रा पवार यांच्याशी राज्यातील विविध घडामोडी […]

अधिक वाचा..

शिक्षक हे भविष्याचे खरे शिल्पकार; गुणवत्तापूर्ण शिक्षणातून सक्षम समाजाची उभारणी; सुनेत्रा पवार

पुणे: शिक्षक हे आपल्या भविष्याचे खरे शिल्पकार आहेत. त्यांच्या समर्पित कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देणे, ही सक्षम आणि ज्ञानसमृद्ध समाजाच्या उभारणीची भक्कम पायाभरणी आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी केले. शिक्षक दिनानिमित्त पुण्यातील श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार, अध्यक्ष चषक तसेच शिष्यवृत्ती परीक्षेतील राज्य गुणवत्ता यादीत […]

अधिक वाचा..

अजित पवारांच्या अपघाताचे राजकारण करू नका; सुनेत्रा पवारांचा विरोधकांना इशारा

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी अजित पवारांच्या अपघाताच्या मुद्द्यावरून विरोधकांना सुनावले आहे. “आदरणीय अजितदादांच्या जाण्याने संपूर्ण महाराष्ट्रात निर्माण झालेली पोकळी किती मोठी आहे, हे माझी मुलं आणि माझ्यापेक्षा कुणाला अधिक माहिती असणार? त्यामुळे अजितदादांच्या अपघाताचे राजकारण करू नका,” असे आवाहन त्यांनी केले. अजित पवारांच्या अपघातानंतर याप्रकरणी ठोस निर्णय व्हावा, […]

अधिक वाचा..

हिंजवडीच्या प्रश्नांवर सुनेत्रा पवार ॲक्शन मोडमध्ये; ४२६ कोटींच्या विकास आराखड्याला गती

पुणे: हिंजवडी परिसरातील रस्ते, वाहतूक कोंडी, पाणी, वीज, कचरा व्यवस्थापन आणि मेट्रोसह विविध प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी ठोस कृती आराखडा तयार करून त्याची कालबद्ध अंमलबजावणी करा, असे निर्देश उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी गुरुवारी दिले. हिंजवडीच्या भविष्यातील गरजा लक्षात घेऊन पीएमआरडीएने तयार केलेल्या सुमारे ४२६ कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला गती देण्याची गरज असून, विविध शासकीय यंत्रणांमध्ये […]

अधिक वाचा..

पिंपळवंडीतील पीडित कुटुंबाच्या पाठीशी शासन; सुनेत्रा पवारांकडून मदतीची ग्वाही

पुणे: जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथील पीडित कुटुंबीयांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आज त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेत सांत्वन केले. या प्रकरणातील दोषीवर कठोरात कठोर कारवाई करण्याचे आदेश घटनेच्या दिवशीच पोलीस अधीक्षकांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून दिल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पीडित कुटुंबाला आर्थिक मदत करण्यात आली असून, पीडितेच्या भावंडांच्या […]

अधिक वाचा..