दुष्काळाच्या संकटातून बळीराजाची सुटका कर, शेतशिवार पुन्हा हिरवेगार होऊ दे; सुनेत्रा पवार

महाराष्ट्र

मुंबई : राज्यात निर्माण झालेल्या कोरड्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आज सकाळी मुंबईतील प्रसिद्ध लालबागच्या राजाचे सहकुटुंब दर्शन घेतले. यावेळी त्यांनी राज्यातील शेतकरी बांधवांसाठी विघ्नहर्त्या गणरायाच्या चरणी प्रार्थना केली.

राज्यातील बळीराजावर आलेले दुष्काळाचे संकट दूर व्हावे, शेतकऱ्यांच्या पिकांना मुबलक पाणी मिळावे, शेतशिवार पुन्हा हिरवेगार व्हावे आणि शेतकऱ्यांच्या कष्टाला चांगले फळ मिळावे, अशी प्रार्थना सुनेत्रा पवार यांनी केली.

राज्यात समाधानकारक पाऊस पडून पिकांचे नुकसान टळावे आणि शेतकरी बांधवांना या संकटातून बाहेर पडण्याचे बळ मिळावे, अशी मनोकामना त्यांनी लालबागच्या राजाच्या चरणी व्यक्त केली. बळीराजाच्या जीवनात पुन्हा सुख-समृद्धीचे दिवस यावेत, अशीही प्रार्थना यावेळी करण्यात आली.

राज्यातील दुष्काळसदृश परिस्थितीमुळे शेतीसमोर निर्माण झालेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार यांची लालबागच्या राजाच्या चरणी केलेली ही प्रार्थना चर्चेचा विषय ठरली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत