ठाण्यात बिरेवाडीच्या लेकीने उमटविला ठसा; १३ वर्षांपासून देतायेत प्रशिक्षण

महाराष्ट्र

मुंबई: फोर व्हीलर किंवा टू हिलर वाहन चालवायचं म्हटलं की, काही नियमावली असते. त्यासाठी वाहन चालवायचे धडे चक्क ग्रामीण भागातील महिला शेकडो विद्यार्थी अथवा विद्यार्थ्यांना देण्याच कार्य करत आहेत.

गेल्या १३ वर्षांपासून ड्रायव्हिंग क्षेत्रामध्ये पारंगत असलेल्या ठाणेसारख्खा शहरात वर्षा मोटार ड्रायव्हिंग स्कूलची स्थापना करत शेतकरी कुटुंबातील सबळ व सक्षम महिला कृषीकन्या वर्षा संतोष पारधी यांनी ठसा उमटविला आहे. त्या गेल्या १३ वर्षांपासून टू व्हीलर, फोर व्हीलर वाहने चालविण्याचे विद्यार्थ्यांना शिकवण देत आहे. तसेच आरटीओची सर्व कामे देखील करत आहे. तसेच प्रशिक्षण घेण्यासाठी ठाणे, भांडुप, अंधेरी, कोपरी, मुंबई तसेच आजूबाजूच्या परिसरातील असंख्य विद्यार्थी या ठिकाणी प्रशिक्षण घेण्यासाठी येतात.

नुकतेच वर्षा पारधी यांनी त्यांच्या अथक परिश्रमाच्या जोरावर ठाण्यात शाखा नं २ चा शुभारंभ केला आहे. या शाखेचा शुभारंभ ठाण्याचे जिल्हाप्रमुख तथा महापौर नरेश मस्के, गोकुळ नगर विभागाचे नगरसेवक कृष्णा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी महापौर मिनाक्षीताई शिंदे, आरटीओ अधिकारी तुषार चौधरी, नगरसेविका नंदा कृष्णा पाटील, नगरसेवक रवींद्र पाटील, निशा पाटील, सिद्धार्थ पांडे, सचिन साहेब, योगेश भोईर आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी वर्षा पारधी यांचं भरभरुन कौतुक करत शाबासकीची थाप दिली. तसेच समाजात महिला कुठल्याही क्षेत्रात आज कुठेच कमी नसून पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला काय करु शकते हे नवीन उदाहरण समाजासमोर वर्षा पारधी यांनी आणले आहे.

दरम्यान, वर्षा पारधी यांचे पती संतोष पारधी हे देखील जिद्दीने साथ सोबतीने अहोरात्र मेहनत करत आहेत. वर्षा पारधी यांचं माहेर संगमनेर तालुक्यातील साकूर जवळील बिरेवाडी येथील प्रगतिशील शेतकरी ढेंबरे कुटूंबातील कृषीकन्या आहे. तसेच त्यांचं सासर पारनेर तालुक्यातील वडगाव दर्या आहे. त्यामुळे त्या ग्रामीण भागातील महिला असल्याने लग्नानंतर पतीच्या साथीने ठाण्या सारख्या शहरात धाडसाने वर्षा ड्रायव्हिंग स्कूलच्या माध्यमातून ठाणे नव्हे मुंबईत नावलौकिक मिळविला आहे. तसेच त्या संसाराबरोबर मुलांचे शिक्षण तसेच सर्व जबाबदाऱ्या पार पाडत आगामी वाटचाल करत आहे.

समाजात आज महिला कमी नाही हे वर्षा पारधी यांनी सिद्ध करुन दाखवले आहे. ठाणे शहरात एक उत्कृष्ट ड्रायव्हिंग प्रशिक्षण स्कूल स्थापन करुन ठाणे शहरात ठसा उमटवल्याने त्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.