एमईएस कार्यालयात सीबीआयचा सापळा; दोन अधिकाऱ्यांना दोन लाखांची लाच घेताना अटक

पुणे: खडकी येथील लष्करी अभियांत्रिकी सेवा कार्यालयात (मिलिटरी इंजिनिअरिंग सर्व्हिसेस – एमईएस) कार्यरत असलेल्या दोन अधिकाऱ्यांना केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) पथकाने दोन लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले आहे. या प्रकरणी खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांनाही अटक करण्यात आली आहे. सुनील निकम (असिस्टंट गॅरिसन इंजिनिअर) आणि सुरेश म्हस्के (कनिष्ठ अभियंता) […]

अधिक वाचा..

लोकल प्रवासात ‘परफ्युम’ ठरतोय सापळा! ठाणे स्टेशनवरील तरुणीचा धक्कादायक अनुभव व्हायरल

परफ्युम विक्रीच्या बहाण्याने दागिने व मौल्यवान वस्तू लंपास करणाऱ्या टोळीपासून सतर्क राहण्याचे आवाहन मुंबई: मुंबईत लोकल ट्रेन आणि स्टेशन परिसरात प्रवास करताना फिरते विक्रेते परफ्युम, कपडे, घरगुती साहित्य विकताना सर्रास दिसतात. अनेकदा मदतीच्या भावनेतून प्रवासी अशा विक्रेत्यांशी संवाद साधतात किंवा वस्तू खरेदी करतात. मात्र, हाच दयाळूपणा कधी कधी धोकादायक ठरू शकतो. सध्या सोशल मीडियावर एका […]

अधिक वाचा..

त्या कलाकेंद्रात चालायचा कुंटणखाना; पोलिसांनी फिल्मी स्टाईलने सापळा रचून केला पर्दाफाश

पुणे: पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील चौफुला येथील अंबिका कला केंद्र गोळीबार प्रकरण राज्यभरात गाजले. अशात पोलिसांनी बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील सारूळ पाटीजवळील एका कलाकेंद्रावरील कुंटणखान्याचा भांडाफोड केला आहे. पोलिसांनी अगदी फिल्मी स्टाईल सापळा रचून हा प्रकार उघडकीस आणला. यात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या पथकाने दोन पीडितांची सुटका केली. यातील एक पीडिता गुजरातमधील आहे. दरम्यान, […]

अधिक वाचा..

म्हणून पुणे पोलिसांनी रात्री तीन वाजता पार्किंगमध्ये रचला सापळा अन् पहाटे…

महिलेला फसवून शरीरसंबंध ठेवले; दोनदा गर्भपात, खुनाचाही आरोप पुणे: पुण्यात मागील दोन वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या खून आणि बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपीला बंडगार्डन पोलिसांकडून शुक्रवारी अटक करण्यात आली आहे. आरोपी पुण्यात आल्याची माहिती मिळाल्यानंतर बंडगार्डन पोलिसांच्या तपास पथकाने दोनशेपेक्षा अधिक सीसीटीव्ही तपासले आणि आरोपीचा शोध घेतला. त्यानंतर तीन रात्री जागून वीसपेक्षा अधिक सोसायट्यांच्या पार्किंगची तपासणी करून […]

अधिक वाचा..

त्यानं लाल दिव्याचं जाळं टाकलं, त्या फसत गेल्या

जळगाव: जळगावच्या धरणगाव येथील एका तरुणाने नायब तहसीलदार, क्लास वन ऑफिसर असल्याचे सांगून लग्नाच्या नावाने अनेक तरुणींची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. धरणगाव येथील निनाद विनोद कापुरे असे तरुणींची फसवणूक करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. मॅट्रिमोनियल साइटवरून तरुणींचे संपर्क क्रमांक मिळवून त्याने फसवणूक केल्याचे समोर आले आहे. तरुण जळगाव जिल्ह्यातील असल्याने याप्रकरणी नाशिक व […]

अधिक वाचा..

शिक्रापूर पाबळ रस्ता बनतोय मृत्यूचा सापळा

स्थानिक प्रशासन व पदाधिकाऱ्यांसह पुढाऱ्यांचे दुर्लक्ष शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथून शिक्रापूर पाबळ रस्त्याने जाणारा बेल्हा जेजुरी महामार्ग रस्ता नव्याने बनवण्यात आलेला असून सध्या सदर रस्ता मृत्यूचा सापळा बनला असून स्थानिक पदाधिकाऱ्यांसह पुढाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने अनेकांना जीव गमवावा लागत आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथून गेलेला बेल्हा जेजुरी महामार्ग नव्याने झालेला असल्याने […]

अधिक वाचा..