शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरुर) येथील राऊतवाडी मधील विद्युत रोहित्रात बिघाड झाल्याने विद्युत पुरवठा खंडित झालेला असल्याने नागरिक अंधारात आलेले असल्याने नागरिकांनी याबाबत आमदार अशोक पवार यांना माहिती दिली असता आमदार अशोक पवार यांच्या मुळे काही तासात विद्युत वितरण विभागाने रोहित्र बसविल्याने नागरिकांनी देखील समाधान व्यक्त केले.
शिक्रापूर (ता. शिरुर) येथील राऊतवाडी मधील विद्युत रोहित्रात बिघाड झाला अन् नागरिकांना अंधारात राहण्याची वेळ आली त्यामुळे येथील नागरिकांनी आमदार अशोक पवार यांना माहिती दिली असता अशोक पवार यांनी विद्युत वितरण विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र एडके यांना तातडीने येथील रोहित्र बसविण्याच्या सूचना केल्या.
दरम्यान शिक्रापूर विभागाचे उपकार्यकारी अभियंता नितीन महाजन यांनी याबाबत पाठपुरावा करुन घेत विद्युत वितरण विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून येथील रोहित्र तातडीने बसवून घेतले. यावेळी उद्योजक अमित राऊत, दत्ता राऊत, पुंडलिक राऊत, शिवाजी राऊत, गोपीचंद राऊत, उमेश राऊत यांसह आदी उपस्थित होते. तर आमदार अशोक पवार व विद्युत वितरण विभागाच्या तत्परतेने काही तासात नवीन रोहित्र बसवण्यात आल्याने राऊतवाडी ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.