केंदूरला डॉ. बापुजी साळुंखे पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी

इतर

शिक्रापूर: केंदूर (ता. शिरुर) येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित सरदार रघुनाथराव ढवळे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे शिक्षण महर्षी डॉ. बापुजी साळुंखे यांची ३५ वी पुण्यतिथी डॉ. बापुजी साळुंखे यांच्या प्रतिमेची पालखीतून मिरवणूक काढून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे.

केंदूर (ता. शिरुर) येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित सरदार रघुनाथराव ढवळे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे शिक्षण महर्षी डॉ. बापुजी साळुंखे यांच्या पुण्यतिथी निमित्ताने शाळेतील विद्यार्थी व पदाधिकाऱ्यांनी बापूजींच्या प्रतिमेचे पूजन करत प्रतिमेची पालखीतून मिरवणुक काढली. याप्रसंगी शिरुर पंचायत समितीच्या उपसभापती सविता पऱ्हाड, सरपंच अविनाश साकोरे, पुणे विभागीय सदस्य रामशेठ साकोरे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्रीहरी पऱ्हाड, बाबुराव साकोरे, पांडूरंग ताथवडे, तुकाराम सुक्रे, जी. बी. थिटे, माजी उपसरपंच भाउसो थिटे, शाहजी साकोरे यांसह आदी पदाधिकारी व विद्यार्थी उपस्थित होते.

दरम्यान उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शिक्षण महर्षी डॉ. बापुजी साळुंखे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी शाळेतील सोनाक्षी सुपेकर, श्रुती साकोरे, अर्णव गावडे यांनी मनोगत व्यक्त केले. शिक्षण महर्षी डॉ. बापुजी साळुंखे यांनी ज्ञान विज्ञान आणि सुसंकार यासाठी शिक्षण प्रसार या संस्थेच्या ब्रीद वाक्य प्रमाणे संस्थेचा विस्तार केला. महाराष्ट्रातील १८ आणि कर्नाटकातील १ अशा एकूण एकोणीस जिल्ह्यांतील खेड्यापाड्यांत, आदिवासी दुर्गम भागांत, उपेक्षित आणि विस्थापित समाज घटकांपर्यंत ज्ञानप्रसार केला असल्याचे सांगत त्यांनी लिहीलेल्या प्रार्थनेचा संपुर्ण अर्थ शाळेचे जेष्ठ शिक्षक अनिल साकोरे यांनी सांंगीतला. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोमनाथ पिचड यांनी केले तर राजु पानमंद यांनी आभार मानले.