पेट्रोल आणि डिझेल च्या नव्या किमती जाहीर: पहा आजचे दर

इतर

भारतीय तेल कंपन्यांनी देशातील पेट्रोल-डिझेलच्या नव्या किमती जाहीर केल्या आहेत. आज तब्बल 98 दिवसांनंतर देशातील पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. तर दुसरीकडे आज आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती 88 डॉलर्सच्या खाली घसरले आहेत.

आजचे कच्च्या तेलाचे दर काय?
राज्यात सत्तापालट झाल्यानंतर नवनिर्वाचित शिंदे-फडणवीस सरकारनं 14 जुलै रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये अनुक्रमे 5 रुपये आणि 3 रुपयांची कपात केली होती. तेव्हापासून राज्यातही पेट्रोल डिझेलचे दर स्थिर आहेत.

नव्या पेट्रोल-डिझेलच्या दरांनुसार, आजही देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत. देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर दरानं विकलं जात आहे. तर देशातील राजधानीचं शहर असणाऱ्या दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर दरानं विकलं जात आहे.

आजचे पेट्रोलचे दर
मुंबई: 106.25
पुणे: 105
नागपूर: 106.03
नाशिक: 106.74
हिंगोली: 107.29
परभणी: 108.92
धुळे: 106.05
नांदेड: 108.24
रायगड: 105.96
अकोला: 106.05
वर्धा: 106.56
नंदुरबार: 106.99
वाशिम: 106. 37
चंद्रपूर: 106.14
सांगली: 105.96
जालना: 107.76

आजचे डिझेलचे दर
मुंबई: 94.22
पुणे: 92
नागपूर: 92.58
नाशिक: 93.23
हिंगोली: 93.80
परभणी: 95.30
धुळे: 92.58
नांदेड: 94.71
रायगड: 92.47
अकोला: 92.55
वर्धा: 93.10
नंदुरबार: 93.45
वाशिम: 93.37
चंद्रपूर: 92.70
सांगली: 92.54
जालना: 94.22