सुप्रीम कोर्टाचा निकाल आमच्या बाजूने लागू दे…

इतर

कर्नाटकाला एक इंच देखील जागा देणार नाही; अजित पवार

नागपूर: सुप्रीम कोर्टाचा निकाल आमच्या बाजूने लागू द्या एक इंच देखील जमीन तुमच्या भागात जाऊ देणार नाही असा स्पष्ट इशारा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना आज दिला.

काल कर्नाटक सरकारचे मुख्यमंत्री बोम्मई एक इंचही जमीन देणार नाही म्हणाले त्यावर आज विरोधी पक्षनेते अजित पवार आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.

माध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी कर्नाटक सरकारला सीमा प्रश्नावरुन निर्वाणीचा इशाराच यावेळी दिला.