pranavi-parth-rajguru

मांडवगण फराटा येथील प्रणवी व पार्थ राजगुरू यांचे परिक्षेत घवघवीत यश…

शिरूर तालुका

शिरूरः एव्हरेस्ट अबॅकस अकॅडमी तर्फे अहमदनगर येथे घेण्यात आलेल्या नॅशनल लेवल परीक्षेमध्ये मांडवगण फराटा (ता. शिरूर) येथील अकॅडमीचे विद्यार्थी प्रणवी प्रमोद राजगुरू हिचा ४ था नंबर, तर पार्थ प्रमोद राजगुरू याचा ३ रा नंबर आला आहे. या मुलांना माधुरी पवार यांनी मार्गदर्शन केले आहे.

कार्यक्रमास एशियान नोबेल मॅगेसेसे पद्मश्री पुरस्कार विजेत्या नीलिमा मिश्रा, राज्याचे शिक्षण उपसंचालक रमाकांत काठमोरे, जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे विश्वस्त वसंतराव कापरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी, चित्रपट अभिनेते डॉक्टर सुरेश शिंदे, बाल मनोविकार तज्ञ तेजस्विनी आहेर, उद्योजक संदीप गडाख, जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी संस्थेचे संचालक महेंद्र बनबने यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एव्हरेस्ट अबॅकस अकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष कारले होते.

शिरूर तालुका व मांडवगण परिसरातून मुलांचे शिरूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे सोशल मीडिया सचिव अक्षय हराळ, आबराज थोरात, विशाल थोरात, तुषार जगताप, शरद गव्हाणे, बाबुराव नेटके यांनी कौतुक केले आहे.