शिरुर तालुक्यात तलाठी व मंडल अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष; शेतकऱ्यांच्या पडीक जमिनीत कांदा व बाजरी पिकाची नोंद

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील खैरेनगर हद्दीत असणाऱ्या गट क्रं ४६८, ४७५ मधील पडीक जमिनीत काही शेतकऱ्यांनी कांदा, बाजरी व ज्वारी पिकाची नोंद केली असुन तलाठी व मंडल अधिकारी यांनी मात्र सदर ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन पिक पाहणी करणे गरजेचे असताना त्याकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते दादाभाऊ फक्कड खर्डे यांनी केला असुन याबाबत शिरुरचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांच्याकडे लेखी तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शिरुर तालुक्यात सध्या मोठया प्रमाणात प्लॉटिंग व्यवसाय चालु असुन गुंठेवारीची नोंद करण्यासाठी तलाठी व मंडल अधिकारी सर्वसामान्य लोकांची मोठ्या प्रमाणात पिळवणूक करत आहेत. परंतु प्लॉटिंग करणाऱ्या मोठया मोठया बिल्डरांच्या जमिनी वर्षानुवर्षे पडीक असतानाही त्यावर चुकीच्या पद्धतीने पिक पाहणी लाऊन कांदा, बाजरी व ज्वारी या पिकांची नोंद केली जाते. हि गंभीर बाब असुन पाबळ येथील मंडल अधिकारी प्रशांत शेटे यांनी प्रत्यक्ष स्थळ पाहणी न करता कांदा व बाजरी पिकाची चुकीची नोंद केली असल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते दादाभाऊ फक्कड खर्डे यांनी केला आहे.

 

याबाबत खर्डे यांनी तलाठी, मंडल अधिकारी, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी तसेच जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार करुन पाठपुरावा केला आहे. परंतु शिरुरचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांनी गट क्रं ४७५ ची प्रत्यक्ष पाहणी करण्याचा आदेश मंडल अधिकारी प्रशांत शेटे यांना दिलेला असतानाही शेटे यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष करत त्या आदेशाला ‘केराची टोपली’ दाखवली असल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते खर्डे यांनी केला आहे.

 

याबाबत पाबळ येथील मंडल अधिकारी प्रशांत शेटे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, पिक पाहणी हा सर्वस्वी तलाठी आणि शेतकऱ्यांच्या स्तरावरचा विषय आहे. शेतकऱ्यांनी स्वतःचा पिक पेरा हा ऑनलाईन सिस्टीम मध्ये स्वतः नोंद करायचा असतो. त्यानंतर जर त्यावर कोणाची हरकत आली तर आम्ही शहानिशा करुन त्यावर कारवाई करु शकतो.

शिरुर तालुका भुमिअभिलेख तर्फे गावनिहाय शासकिय सनद वाटप होणार; उपअधीक्षक अमोल भोसले

शिरुर तालुक्यात विभागीय कृषी सहसंचालक यांचे बांधावर जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन

शिरुर तालुका म्हणजे महसूल, पोलिस, MIDC तील कंपन्याचे वरिष्ठ अधिकारी यांच्यासाठी भ्रष्टाचाराचे कुरण…?