शिरुर तालुक्यात सर्व्हर डाऊनमुळे शेतकरी हैराण KYC अभावी शेतकऱ्यांचे दुष्काळी अनुदान रखडले

मुख्य बातम्या शिरूर तालुका

पाबळ (सुनिल जिते) शासनाकडून दुष्काळी आर्थिक मदत मिळण्यासाठी शेतकऱ्यांना केवायसी (KYC) करणे अनिवार्य करण्यात आले आहे. परंतु सर्व्हर डाऊन असल्यामुळे गेल्या दहा दिवसापासून शिरुर तालुक्यात केवायसी लिंक प्रणाली बंद आहे. परिणामी बँक खात्यात दुष्काळ निधी जमा होत नसल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत.

 

शिरुर मधील दुष्काळी सानुग्रह अनुदानासाठी कृषी विभागाकडून अर्ज भरून देण्यासाठी आव्हान केले होते. त्यानुसार शेतकऱ्यांनी अर्ज जमा केले. त्यानंतर शिरुर तालुक्यातील दुष्काळ गावांच्या यादी प्राप्त झाल्या. त्यानंतर ऑनलाइन पोर्टलला विशिष्ट क्रमांक टाकून केवायसी (KYC) करण्याचे काम सुरु झाले होते. परंतु रोजच सर्व्हर डाऊन असल्यामुळे गेल्या दहा दिवसापासून तालुक्यात केवायसी (KYC) लिंक प्रणाली बंद आहे.

 

शिरुर तालुक्यातील शेतकऱ्यांचे अतोनात हाल होताना दिसून येत आहे. शिरुर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आला आहे. शेतकऱ्यांना काही दिवसापूर्वी शासनाकडून दुष्काळी आर्थिक मदत मिळण्यासाठी शेतकयांना ई-केवायसी (EKYC) करणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे शेतकरी पदरचे पैसे खर्च करुन ई-सेवा केंद्राच्या ठिकाणी जात आहेत. मात्र लिंक बंद असल्याने केवायसी न करताच शेतकऱ्यांना परत जावे लागते. त्यामुळे शेतकऱ्याला हेलपाटे मारावे लागत आहेत. केवायसी लिंक सुरु करून लवकरात लवकर खात्यात अनुदान जमा करावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

 

दुष्काळी अनुदानासाठी सर्व्हर चालत नाही.त्यानुसार वरिष्ठ कार्यालयाला कळविले आहे. सध्या शासन स्तरावर काम सुरु असुन लवकरच केवायसी पोर्टल सुरु होईल अशी माहिती दिली आहे.

वैभव थोरात (महाईसेवा केंद्र मलठण )

 

वयाची ८० वर्ष पार करणाऱ्या आम्ही शेतकऱ्यांनी किती हेलपाटे घालावेत. आमचे बोटाचे ठसे उमटत नाही, यात शासनाने काहीतरी मार्ग काढावा.

एक वृद्ध शेतकरी (कान्हूर मेसाई)

शिरुर निकृष्ट पोषण आहार प्रकरण; अमोल कोल्हे म्हणाले, नक्की पोषण कोणाचं सुरु आहे…?