लोणावळा (प्रतिनिधी) आज (दि १५) रोजी भारताच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त अनेकजण पर्यटनासाठी बाहेर पडले आहेत. पुणे-मुंबई जुन्या महामार्गावर लोणावळा येथे अनेक तरुण वेगात स्पोर्ट बाईक चालवत आहेत. तर काही तरुण चारचाकी गाडीत बसुन खिडकीच्या काचा उघडत सेल्फीसाठी जीवघेणा स्टंट करत आहेत. त्यामुळे लोणावळा पोलिसांनी यावर कारवाई करावी अशी मागणी वाहनचालकांनी केली आहे.
लोणावळा परिसरात काही दिवसांपुर्वी पर्यटनासाठी आलेल्या एकाच कुटुंबातील ९ जण पाण्यात वाहुन गेले होते. त्यानंतर लोणावळा परिसरात अनेक ठिकाणी धोकादायक वाटणाऱ्या जागा पर्यटकांसाठी बंद करण्यात आल्या होत्या. परंतु आज (दि १५) रोजी जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर एम एच १५ डि सी ३५३७ या चारचाकी गाडीतील तरुण सेल्फीसाठी जीवघेणा स्टंट करत असल्याचे दिसुन आले. त्यामुळे लोणावळा पोलिसांनी यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी स्थानिक नागरीकांनी केली आहे.
शिरुर तालुक्यात अजुनही पोर्शे पॅटर्न जोरात, पोलिसांचे दुर्लक्ष; कडक उपाययोजना करण्याची गरज
शिरुर तालुक्यातही पोर्शे पॅटर्न जोरात अल्पवयीन मुलांच्या हातात दुचाकी, ट्रॅक्टर अन चारचाकी गाड्या