शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील बाबुरावनगर येथे सुयोग विलास कारले राहत असलेल्या फ्लॅटमध्ये छेड काढल्याच्या कारणावरून एका महिलेसह तिघांनी फ्लॅटमध्ये, फ्लॅटच्या खाली पार्कींग मध्ये, तसेच गाडीवर जबरदस्तीने बसवून नेऊन न्हावरा रोडवर जबर मारहाण केली आहे. याबाबत सुयोग विलास कारले (वय २६) यांनी शिरूर पोलिस स्टेशनमध्ये एका महिलेसह तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.
शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक २७ ऑगस्ट रोजी रात्री १०वा. च्या सुमारास सुयोग विलास कारले हे कृष्णा हिरा अपार्टमेंट् बाबुराव नगर शिरूर येथे भोगावडे यांचे फ्लॅट मध्ये असताना १) अक्षय ढेरे, २) अजय कोळेकर (पुर्ण नाव माहीत नाही), दोघे रा. राजणगाव ता. शिरूर, ३ )एक अनोळखी व्यक्ती व एक अनोळखी महिला (नाव व पत्ता माहीती नाही) हे आले व काही कारण नसताना मारहाण करू लागले. सुयोग विलास कारले यांनी त्यांना तुम्ही मला का मारत आहे? असे विचारले असता त्यावेळी त्यांच्यासोबत असलेल्या महिलेने सांगितले कि, तू माझी छेड काढली आहे. असे बोलू लागल्या. त्यावेळी सुयोग विलास कारले बोलले कि, मी तुम्हाला ओळखत नाही तुम्ही कुठे राहता? असे बोललो असता अक्षय डेरे हा सुयोग कारले यांना बोलला की, ही माझी सासु आहे व त्यांनी तु पोलिस स्टेशनला चलं असे म्हणून सुयोग कारले यांना घराचे बाहेर घेऊन आले व बिल्डींगचे खाली पुन्हा अक्षय डेरे याने काठी व अजय कोळेकर याने बेल्टने व अनोळखीने पाईपाने मारहाण केली. त्यानंतर पोलिस स्टेशनला चल असे म्हणाल्याने सुयोग कारले हे त्यांच्यासोबत गाडीवर बसले.
गाडीवर बसल्यानतर न्हावरा फाटा रोडला घेऊन गेले. त्यावेळी पुन्हा वरील लोकांनी मारून दुखापत केली आहे. शिवीगाळ करून तु पोलिस स्टेशनला जर तक्रार केली तर जिवे मारण्याची धमकी देऊन ते निघुन गेले आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलिस हवालदार खेडकर हे करत आहेत.
शिरूर तालुक्यात दगडाने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी…
शिरूर तालुक्यात लाकडी दांडके, लोखंडी पाइप व कुऱ्हाडीच्या साहय्याने मारहाण; कारण…
शिरुर तालुक्यात नराधम बापानेच केला अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार; आरोपी बापाला अटक
शिरुर-तांदळी रस्त्यावर गुनाटजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार
पुणे-नगर महामार्गावर अनोळखी महीलेला अज्ञात वाहनाची धडक, मृतदेहाची ओळख पटवण्याचे पोलिसांपुढे आव्हान