शिरूर बसस्थानकावरून पर्समधुन ८ तोळे सोने चोरी करणा-या त्या सराईत दोन महीला आरोपींना केले जेरबंद

क्राईम मुख्य बातम्या

स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण व शिरूर पोलीस स्टेशन तपास पथकाची संयुक्त कारवाई

शिरूर (अरुणकुमार मोटे): दिनांक ११ मे रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास शिरूर गावच्या हद्दीत बस स्थानक येथुन यातील फिर्यादी नामे रूपाली अनिल काळेल रा. त्रीमुर्तीनगर भिगवण रोड जळोची बारामती ता. बारामती, जिल्हा पुणे व त्यांची मुलगी नामे तन्वी व भाची साक्षी असे तीघीजनी घरी बारामती येथे जाण्यासाठी बस स्थानक शिरूर येथे न्हावरा केडगाव चौफुला एस स्टी बस क्रमांक एम एच १४ बी टी ४१९३ मध्ये जाण्यासाठी चढत असताना कोणीतरी अज्ञात चोरटयाने १) ३,९०,०००/- एक ६.५ तोळे वजनाचे सोन्याचे गंठण किं अं २) ७८,०००/- एक १.३ तोळे वजनाचे सोन्याचे कानातील झुबे कि अं असे एकुण ४,६८,०००/- किंमतीचे सोन्याचे दागीने चोरून घेवुन गेले आहेत. वगैरे मजकुरावरून शिरूर पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ३१४/२०२५ भारतीय न्याय संहिता कायदा कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा रजिस्टर दाखल करण्यात आला असुन गुन्हयाचा तपास पुढील तपास पोलीस हवालदार नाथसाहेब जगताप हे करीत आहेत.

वरीष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण पोलीस निरीक्षक, शिरूर संदेश केंजळे पोलीस यांनी सदर गुन्हयाची गंभिरता लक्षात घेवुन स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण पथकाचे पोलीस हवालदार तुषार पंधारे, जनार्दन शेळके, संजय जाधव, राजु मोमीन व शिरूर पोलीस स्टेशन तपास पथकाचे पोसई श्री. शुभम चव्हाण, पोसई दिलीप पवार, पोलीस हवालदार नाथसाहेब जगताप, महीला पोलीस हवालदार भाग्यश्री जाधव, महीला पोलीस अंमलदार मोनिका वाघमारे, पोलीस अमंलदार नितेश थोरात, विजय शिंदे, अजय पाटील, रविंद्र आव्हाड, सचिन भोई, निखील रावडे, निरज पिसाळ यांचे तपास पथक तयार करून संयुक्त कारवाई करण्याबाबत आदेशित केले. त्याअनुशंगाने तपास पथकामधील अधिकारी व अंमलदार यांनी शिरूर तालुका तसेच अहिल्यानगर जिल्हयामध्ये श्रीरामपुर तालुकयामधील सुमारे १०० पेक्षा जास्त सी सी टी व्ही फुटेज यांची तपासणी करून तसेच तांत्रीक विश्लेषनाचे आधारे कसोशीने शोध घेवुन सदरचा गुन्हा उघडकीस आणला.

त्याआधारे सदरचा गुन्हा महीला नामे १) मनिषा विजय कसबे २) शोभा शंकर दामोदर रा. संजयनगर श्रीरामपुर ता श्रीरामपुर जि अहिल्यानगर यांनी केल्याचे तपासमध्ये निष्पन्न झाले. त्याअनुशंगाने तपास पथके ही श्रीरामपुर, जिल्हा अहिल्यानगर येथे खाना होवुन महीला आरोपी नामे १) मनिषा विजय कसबे २) शोभा शंकर दामोदर रा. संजयनगर श्रीरामपुर ता श्रीरामपुर जि अहिल्यानगर यांना ताब्यात घेवुन त्यांच्याकडे प्राथमीक चौकशी केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली देवुन त्यांच्याकडुन गुन्हयातील चोरी केलेले १) ३,९०,०००/- एक ६.५ तोळे वजनाचे सोन्याचे गंठण किं अं २) ७८,०००/- एक १.३ तोळे वजनाचे सोन्याचे कानातील झुबे कि अं असे एकुण ४,६८,०००/- किंमतीचे सोन्याचे दागीने जप्त करण्यात आले आहे.

सदरची कारवाई पोलीस अधिक्षक संदीप गिल, अप्पर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा अविनाश शिळीमकर,पोलीस निरीक्षक, शिरूर पोलीस स्टेशन संदेश केंजळे, स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण पथकाचे पोलीस हवालदार तुषार पंधारे, जनार्दन शेळके, संजय जाधव, राजु मोमीन व शिरूर पोलीस स्टेशन तपास पथकाचे पोसई शुभम चव्हाण, पोसई दिलीप पवार पोलीस हवालदार नाथसाहेब जगताप, महीला पोलीस हवालदार भाग्यश्री जाधव, महीला पोलीस अंमलदार मोनिका वाघमारे, पोलीस अमंलदार नितेश थोरात, विजय शिंदे, रविंद्र आव्हाड, अजय पाटील, सचिन भोई, निखील रावडे, निरज पिसाळ यांचे पोलीस पथकाने केली आहे.