सणसवाडीत ८०० लिटर डिझेल चोरीचा पर्दाफाश; बॅरलमध्ये पाणी भरून कंपनीची दिशाभूल, दोन सराईत चोरटे अटकेत

शिक्रापूर: शिरूर तालुक्यातील सणसवाडी येथील झेनिथ बायोकेमिकल इंडस्ट्रीज प्रा. लि. कंपनीतून तब्बल ८०० लिटर डिझेल चोरी करून पुरावे नष्ट करण्यासाठी रिकाम्या बॅरलमध्ये पाणी भरून ठेवणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना शिक्रापूर पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईमुळे सुमारे ७२ हजार रुपयांच्या डिझेल चोरीचा यशस्वी छडा लागला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २ जून ते १० जुलै २०२६ या […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील व्यंकटेश्वरा रिसर्च ब्रोडिंग फार्ममध्ये ट्रान्सफॉर्मरच्या अर्थिंगच्या १२५ किलो तांब्याच्या पट्ट्यांची चोरी 

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील निमोणे येथील व्यंकटेश्वरा रिसर्च ब्रोडिंग फार्ममध्ये अज्ञात चोरट्यांनी तारेचे कंपाउंड तोडून प्रवेश करत विद्युत ट्रान्सफॉर्मरच्या अर्थिंगसाठी बसविण्यात आलेल्या सुमारे १२५ किलो वजनाच्या तांब्याच्या पट्ट्या चोरुन नेल्याची घटना उघडकीस आली आहे. चोरीस गेलेल्या तांब्याच्या पट्ट्यांची किंमत सुमारे ६२ हजार ५०० रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. याबाबत येथील सुरक्षा रक्षक […]

अधिक वाचा..

पिंपरखेड येथील विद्युतरोहित्र व केबल चोरीप्रकरणी आरोपींना तात्काळ अटक करा; प्रफुल्ल बोंबे

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील बेट भागात वाढत्या चोऱ्यांच्या घटनांमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पिंपरखेड (ता. शिरूर) येथे शनिवारी (दि. २७) पहाटे सुमारे २ ते २.३० वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी घोडनदी काठावरील १०० एच.पी. क्षमतेचे विद्युतरोहित्र निकामी करून २५ हून अधिक शेतकऱ्यांच्या कृषीपंपांच्या केबल चोरी केल्याची घटना घडली. या घटनेत शेतकऱ्यांचे सुमारे तीन […]

अधिक वाचा..

जेसीबीच्या काचा फोडून १० हजारांची रोकड लंपास; चोरी की वैयक्तिक वाद

शिरूर (अक्षय टेमगिरे): देविदास बाळासाहेब सातकर यांच्या मालकीच्या उभ्या असलेल्या जेसीबी मशीनची अज्ञात व्यक्तींनी तोडफोड करून आतील रोकड चोरून नेल्याची घटना १९ जूनच्या मध्यरात्री घडली. मिळालेल्या माहितीनुसार, जेसीबी मशीनच्या काचा फोडून मशीनमध्ये डिझेलसाठी ठेवलेली सुमारे १० हजार रुपयांची रोख रक्कम अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून संबंधित मालकाचे आर्थिक नुकसान झाले […]

अधिक वाचा..

बिग बॉस मराठी! चोरीच्या आरोपांवरून घरात रणकंदन; तन्वीचा शो सोडण्याचा इशारा तर…

मुंबई: ‘बिग बॉस मराठी ६’च्या आजच्या भागात घरात पुन्हा एकदा सामान चोरीचा मुद्दा चांगलाच पेटला. दीपालीने सामानाबाबत विचारणा केल्यानंतर विशाल आणि रोशन यांनी प्रभूचा कप्पा तपासला. या कप्प्यातून तांदूळ, पीठ आणि इतर साहित्य सापडल्याने घरात खळबळ उडाली. हे सामान कोणी लपवलं? हा प्रश्न चर्चेचा केंद्रबिंदू ठरला. अनुश्रीने तन्वी आणि रुचिता यांच्यावर संशय व्यक्त केला. राकेशने […]

अधिक वाचा..

रांजणगाव MIDC मधील ITC च्या चमडिया गोडाऊनमधील लाखोंची चोरी उघड; ७२ तासांत आरोपीला अटक

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती रोडवरील आयटीसी कंपनीच्या चमडिया गोडाऊनमधून सिगारेट, बिस्किटे व साबण असा कोट्यवधींचा मुद्देमाल चोरण्याची धाडसी घटना घडली होती. या प्रकरणात रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी अवघ्या ७२ तासांत चोरीचा छडा लावत तब्बल ६८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून एका आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. अन्य दोन आरोपींचा शोध सुरू आहे.   View […]

अधिक वाचा..

शिरूर परिसरात महावितरणच्या चार वेगवेगळ्या वीजचोरी प्रकरणांवर शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल

शिरूर (अरुणकुमार मोटे): महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी गोलगाव (#ता. शिरूर)येथे छापा टाकून थेट विदयुत रोहीत्रामधून विना मीटर वीज वापरणाऱ्या नागरिकांविरुद्ध धडक कारवाई केली असून, चार वेगवेगळ्या वीजचोरी प्रकरणांमध्ये शिरूर पोलीस स्टेशन येथे विद्युत कायदा अन्वये चार जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शिरूर पोलीस स्टेशन येथे फिर्यादी सोनाली समीर टोकेकर (उपकार्यकारी अभियंता, महावितरण) यांच्या फिर्यादीनुसार संजय […]

अधिक वाचा..

खळबळजनक घटना! ‘मंचरमध्ये युवकाची निर्घृण हत्या’:एका तासात तिघांना अटक 

मंचर: मंचर शहरात शनिवारी (दि. २) रोजी रात्री 10 च्या सुमारास भरचौकात घडलेल्या एका खळबळजनक घटनेत प्रशांत रवींद्र गांजाळे (वय ४५), रा. एस कॉर्नर, मंचर या युवकाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. घटनेनंतर अवघ्या एक तासात पोलिसांनी खुनातील तिघा आरोपींना अटक करून मोठी कामगिरी केली आहे. सदर घटना नंदिनी बिअर बारसमोर घडली. शहाजी वामन इंदोरे, […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील पेट्रोल पंपात चोरी; चार कामगारांवर गुन्हा दाखल

न्हावरे (तेजस फडके): निमोणे (ता. शिरुर) येथे निमोणे-गुनाट रोडवर असलेल्या परफेक्ट एच. पी. पेट्रोलपंपावर काम करणाऱ्या चार कामगारांनी मिळुन एकुण ९४ हजार ५२० रुपयांची चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत राजेश्री अनिल काळे (वय ४३) रा. निमोणे, ता. शिरुर, जि. पुणे यांनी शिरुर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. दि २१ जुलै २०२५ रोजी […]

अधिक वाचा..

शिरुर पोलिसांनी ट्रान्सफॉर्मर चोरी करणार्‍या आंतरराज्यीय टोळीचा केला पर्दाफाश

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरुर पोलिसांनी आंतरराज्यीय सराईत चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश करत तब्बल ९ चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. या कारवाईत ३.१५ किलो तांब्याच्या कॉईलसह एकुण ५लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ही कामगिरी शिरूर पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली केली आहे. घटना कशी उघडकीस आली…? दि ४ […]

अधिक वाचा..