शिक्रापुर-वाघाळे-मलठण रस्त्याची दुर्दशा; संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष, ग्रामस्थांतून तीव्र संताप

मुख्य बातम्या शिरूर तालुका

रांजणगाव गणपती (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील शिक्रापुर-वाघाळे-मलठण या प्रमुख दळणवळणाचा मार्ग असलेल्या रस्तावर प्रचंड मोठया प्रमाणात खड्डे पडले असुन रस्त्यात खड्डे आहेत की खड्यात रस्ता आहे. हे समजणे कठीण झाले आहे. हा रस्ता खड्ड्यांनी भरलेला असुन या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे.

या रस्त्यावर जागोजागी मोठमोठे खड्डे पडल्याने वाहन चालकांना तारेवरची कसरत करत प्रवास करावा लागत आहे. या रस्त्याचा वापर शेतकरी, कामगार, विद्यार्थी, व्यापारी अशा सर्वच घटकांकडून मोठ्या प्रमाणावर होतो.

शिक्रापुर वरुन मलठणकडे जाताना गणेगाव येथील घाट, कामिनी नदीवरील अर्धवट पूल, वाघाळे येथील बढे वस्ती परिसरात खड्ड्यांची संख्या अधिक असून त्यामुळे अपघातांची संख्या वाढली आहे. रात्रीच्या वेळी या रस्त्यावर प्रवास करणे अधिकच धोकादायक ठरत असून अनेकवेळा या ठिकाणी छोटे मोठया अपघातात नागरिक जखमी होत आहेत. तसेच वाहनांचे मोठे नुकसान होत आहे.

या मार्गावर असलेल्या सर्वच गावच्या ग्रामस्थांकडून सातत्याने या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी होत आहे. या मागणीला वाघाळे गावचे सामाजिक कार्यकर्ते अशोकराव सोनवणे, माजी उपसरपंच दिलीपराव थोरात, वाघाळे वि का सो चे अध्यक्ष विजय शेळके यांचाही पाठिंबा मिळत आहे.

शिक्रापुर-वाघाळे-मलठण हा रस्ता मंजुर झालेला असुनही अद्यापही काम सुरु न झाल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे. प्रशासनाने तातडीने लक्ष घालून रस्ता दुरुस्त करावा, अन्यथा जनआंदोलन अटळ आहे. हे काम लवकरात लवकर सुरु करावे अन्यथा वाघाळे ग्रामस्थ तीव्र आंदोलन छेडतील असा इशाराही अशोकराव सोनवणे यांनी दिला आहे.

रांजणगाव येथील तिहेरी खून प्रकरणाचा अवघ्या १२ दिवसांत उलगडा पुणे ग्रामीण पोलिसांची कामगिरी

शिरुर तालुक्यात निवडणुकीत पराभव झाल्याच्या रागातुन तलवारीने हल्ला; गुन्हा दाखल

शिरुर तालुक्यात किरकोळ वादातून तिघांकडून हल्ला; गुन्हा दाखल

शिरुर तालुक्यात ग्रामपंचायत निधीचा अपहार; तत्कालीन सरपंचांसह दोघांवर गुन्हा दाखल